सातवी इतिहास व नागरिकशास्त्र संविधानाची वैशिष्ट्ये स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7th Standard Sanvidhanachi vaishishtye itihas nagarikshastra swadhyay question answer
१. संघराज्य शासनपद्धतीनुरूप
अधिकारांची विभागणी कशाप्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा.
|
संघराज्य शासन |
राज्यशासन |
दोन्ही शासनांकडे असणारे विषय |
|
१. संरक्षण |
१. शेती |
१. रोजगार |
|
२. परराष्ट्र व्यवहार |
२. कायदा व सुव्यवस्था |
२.पर्यावरण |
|
३. युद्ध व शांतात |
३. स्थानिक शासन |
३.आर्थिक व सामाजिक नियोजन |
|
४. चलन पद्धती |
४. आरोग्य |
४. व्यक्तिगत कायदा |
|
५. आंतरराष्ट्रीय व्यापार |
५. तुरुंग प्रशासन |
५.शिक्षण |
|
६. रेल्वे वाहतूक |
६. राज्यांतर्गत वाहतूक |
|
|
७. टपाल व्यवस्था |
|
|
|
८. आंतरराष्ट्रीय वाहतूक |
|
|
२. योग्य शब्द लिहा.
(१) संपूर्ण देशाचा
राज्यकारभार करणारी यंत्रणा –
उत्तर: संघराज्य (केंद्रशासन )
(२) निवडणुका घेणारी यंत्रणा
–
उत्तर: निवडणूक आयोग
(३) दोन सूचींव्यतिरिक्त
असलेली सूची
उत्तर: समवर्ती सूची
३. लिहिते व्हा.
(१) संघराज्यात दोन स्तरांवर
शासनसंस्था असतात.
उत्तर:
१.मोठा भूप्रदेश आणि खूप
लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे.
२.मोठा भूप्रदेश असल्यास एकाच
ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते, दूरवरच्या प्रदेशांकडे
दुर्लक्ष होते. तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही.
म्हणून संघराज्यात दोन
स्तरांवर शासनसंस्था असतात.
संविधानाची वैशिष्ट्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी संविधानाची वैशिष्ट्ये या पाठाचा स्वाध्याय पाठ तिसरा संविधानाची वैशिष्ट्ये स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र गाईड
(२) शेषाधिकार म्हणजे काय?
उत्तर:
१.भारतीय संघराज्यातील
अधिकारांचे वाटप तीन सूचींमध्ये केलेले आहे.
२. या तीन सूचींमधील
विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा
अधिकार संघशासनाला असतो. हा अधिकार ‘शेषाधिकार’ म्हणून ओळखला जातो.
(३) संविधानाने न्यायमंडळ
स्वतंत्र ठेवले आहे.
उत्तर:
१.
वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात
सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात.
२.
न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून
घेऊन,
त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते. हे काम
निरपेक्षतेने होणे आवश्यक असते.
३.
न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये
म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
४. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे
फायदे व तोटे या विषयावर वर्गात गटचर्चेचे आयोजन करा.
उत्तर:
१……………………..
Sanvidhanachi vaishishtye swadhyay 7vi Sanvidhanachi vaishishtye swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers
५. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र (EVM) वापरल्यामुळे कोणते फायदे होतात, याची माहिती मिळवा.
उत्तर: इलेक्ट्रॉनिक
मतदानयंत्र (EVM) वापरल्यामुळे पुढील फायदे होतात.
१.
EVM चा वापर केल्याने मतपत्रिका छापण्याची गरज
नसल्याने कागदाची मोठ्या प्रमाणावर बचत होते.
२.
मतपत्रिका छापण्याचा खर्च कमी होतो.
३.
छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का
मारताना वर-खाली अस प्रकार होत असे. EVM मध्ये असा प्रकार घडत नाही.
४.
निवडणुकीचा निकाल जलद लागण्यास मदत
होते.
५.
इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रामध्ये
कोणताही घोळ होण्याची शक्यता कमी असते.
**********
हे देखील पहा:
इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा…….
स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा
.webp)










