३.मराठा
सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय / मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय / मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे प्रश्न उत्तर
स्वाध्याय
प्र.१. रिकाम्या जागी कंसातील
योग्य पर्याय लिहा
अ) महाराष्ट्रातील
शूर घराण्यांपैकी वेरूळचे ………… घराणे मोठे पराक्रमी निघाले.
( मोरे , घोरपडे , भोसले )
उत्तर: महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले
घराणे मोठे पराक्रमी निघाले.
(आ)
बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व………… ही दोन मुले होती.
( विठोजी , शहाजी , शरीफजी )
उत्तर: बाबाजीराजे
भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती.
(इ)
निजामशाहाचा ……………. हा कर्तबगार वजीर होता .
( मलिक अंबर , फत्तेखान , शरीफजी )
उत्तर: निजामशाहाचा मलिक अंबर हा
कर्तबगार वजीर होता .
![]() |
मराठा सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
प्र.२.नातेसंबंध लिहा .
(अ)
मालोजीराजे – विठोजीराजे
उत्तर: भाऊ – भाऊ
(आ)
शहाजीराजे – लखुजीराव जाधव
उत्तर: जावई – सासरे
(इ)
शहाजीराजे – शरीफजी
उत्तर: भाऊ – भाऊ
(ई)
बाबाजीराजे – विठोजीराजे
उत्तर: पिता – पुत्र
प्र.३.‘ अ ‘ गट व ‘ ब ‘ गट यांच्या जोड्या लावा.
( हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल (tilt) आडवा करा. )
|
‘अ‘ गट |
उत्तरे |
‘ |
|
(अ) सिंदखेडचे |
जाधव |
(१) निंबाळकर |
|
(आ) फलटणचे |
निंबाळकर |
(२) घोरपडे |
|
(इ) जावळीचे |
मोरे |
(३) भोसले |
|
(ई) मुधोळचे |
घोरपडे |
(४) मोरे |
|
|
|
(५) जाधव |
प्र.४.प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा .
(अ)
घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार
कोणी केला ?
उत्तर: घृष्णेश्वराच्या
मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला.
(आ)
निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या
परगण्यांची जहागीर दिली?
उत्तर: निजामशाहाने
मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली.
(इ)
निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने
लढले?
उत्तर: निजामशाही वाचवण्यासाठी मलिक
अंबर व शहाजीराजे निकराने लढले.
(ई)
आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता किताब
दिला ?
उत्तर: आदिलशाहाने शहाजीराजांना
सरलष्कर हा किताब दिला.
(उ)
शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत
परत का आले?
उत्तर: निजामशाही सावरण्यासाठी
निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, म्हणून शहाजीराजे
आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.











