२.संतांची कामगिरी स्वाध्याय
प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ संतांची कामगिरी स्वाध्याय / संतांची कामगिरी स्वाध्याय / संतांची कामगिरी प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / संतांची कामगिरी प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी संतांची कामगिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
प्र.१.रिकाम्या जागी योग्य शब्द
लिहा .
(अ)
संत नामदेव ………….. निस्सीम
भक्त होते .
उत्तर: संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते .
(आ)
ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ ………………येथे
जिवंत समाधी घेतली.
उत्तर: ज्ञानेश्वरांनी तरुण
वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.
(इ) संत
तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते ……………नदीमध्ये बुडवली.
उत्तर: संत
तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.
(ई) समर्थ
रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी ……….. मंदिरे उभारली .
उत्तर: समर्थ
रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली .
![]() |
.संतांची कामगिरी इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा.
(अ)
श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव
मान्य नव्हते?
उत्तर: श्री चक्रधर स्वामींना
स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.
(आ)
संत नामदेवांनी लोकांच्या मनांत कोणता
निर्धार निर्माण केला?
उत्तर: संत नामदेवांनी
लोकांच्या मनांत धर्म रक्षणाचा व भक्तीमार्गाचा निर्धार निर्माण केला.
(इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश
केला?
उत्तर: कोणताही उच्च नीच भेदभाव
मानू नका असा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला.
(ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला?
उत्तर: सामर्थ्य आहे चळवळीचे,
जो जो करील तयाचे हा संदेश समर्थ रामदासांनी दिला.
प्र.३.दोन – तीन वाक्यांत
उत्तरे लिहा.
(अ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का
बसले ?
उत्तर:
ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी
घेऊन गावात गेले असता त्यांन कोणी भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांन्या वेडेवाकडे
बोल ऐकावे लागले. या साऱ्याचे त्यांच्या बालमनाला खूप दुखः झाले . म्हणून संत
ज्ञानेश्वर झोपडीत दर बंद करून बसले.
(आ)
संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता
संदेश बिंबवला?
उत्तर:
संत तुकाराम लोकांना दया, क्षमा,
शांती यांची शिकवण देत, समतेचा उपदेश करीत.
‘जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणजे जो आपुले तोचि साधू ओळखावा | देव
तेथेची जाणावा |’ हा संदेश संत तुकारामांनी लोकांच्या मनावर बिंबवला.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.











