---Advertisement---

४.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Shivpurvakalin maharashtra swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra .

October 15, 2026 10:44 PM
---Advertisement---

४.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र इतिहास नागरिकशास्स्वात्ध्यार य प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी – शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या पाठाचा स्वाध्याय – पाठ  चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी – इयत्ता सातवी इतिहास गाईड

 

प्रश्न १. खालील तक्ता पूर्ण करा.

 

 

गाव/मौजा

कसबा

परगणा

कशास
म्हणतात

 छोट्या गावाला मौजा असेही म्हणत.

मोठ्या
खेड्यास कसबा म्हणत. सामान्यतः ते
परगण्याचे मुख्य ठिकाण असे.

अनेक
गावे मिळून परगणा होतो.

पदाधिकारी

गावचा
प्रमुख पाटील, महसुलाची नोंद कुलकर्णी ठेवत असत

शेटे
व महाजन हे वतनदार कारभारी होते.

देशपांडे
व देशमुख हे वतनदार अधिकारी होते.

उदाहरण

वाई
कसब्यातील छोटेसे गाव

वाई
कसबा,

इंदापूर
कसबा

पुणे
किंवा चाकण परगणा.

 

पाठ  चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास गाईड शिवपूर्वकालीन महाराष्ट्र भारत धडा चौथा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Shivpurvakalin Maharashtra swadhyay 7vi Shivpurvakalin Maharashtra swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

प्रश्न २. म्हणजे काय ?


१)  
बुद्रुक

उत्तर: मूळ गावाला
‘बुद्रुक’ असे म्हणतात.


२)  
बलुतं:

उत्तर: गावात कारागीर जी सेवा
देत असत
,
त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा
मिळे. त्यास बलुतं असे म्हणत.


३)  
वतन:

उत्तर: वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी
उपभोगण्यास दिलेली सरामुक्त जमीन म्हणजे वतन होय.


प्रश्न ३. शोधून लिहा.


१)  
कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले
लोक :

उत्तर: सिद्दी लोक


२)  
अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार:

उत्तर: संत ज्ञानेश्वर


३)  
संत तुकारामांचे गाव:

उत्तर: देहू


४)  
भारुडाचे रचनाकार:

उत्तर: संत एकनाथ


५)  
बालोपासनेचे महत्व सांगणारे:

उत्तर: रामदास स्वामी


६)  
स्त्री संतांची नावे:

उत्तर: संत जनाबाई, संत
निर्मळाबाई , संत सोयराबाई , संत मुक्ताबाई , संत बहिणाबाई

 

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र भारत धडा चौथा स्वाध्याय – इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी – Shivpurvakalin Maharashtra swadhyay 7vi – Shivpurvakalin Maharashtra swadhyay prashn uttar


प्रश्न ४. तुमच्या शब्दांत
माहिती व कार्ये लिहा.


१)  
संत नामदेव:

उत्तर:

१)संत नामदेव वारकरी संप्रदायातील
एक श्रेष्ठ संत होते.

२)ते कुशल संघटक होते. ते
उत्तम कीर्तनकारही होते.

३)कीर्तनाच्या माध्यमातून
त्यांनी सर्व जाती-जमातींमधील स्त्री- पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची
भावना जागवली.

४)‘नाचू कीर्तनाचे रंगी ।
ज्ञानदीप लावू जगी।।’ ही त्यांची प्रतिज्ञा होती.

५)अनेक संतांवर आणि
सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला.

६) त्यांनी
भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले.

७) त्यांनी पंढरपूर येथे
विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली.


२)  
संत ज्ञानेश्वर

उत्तर:

१)    हे
वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत.

२)    त्यांनी
‘भगवद्गीता’ या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा
‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ रचला.

३)    संत
ज्ञानेश्वररांनी
‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना केली.
त्यांनी आपल्या ग्रंथांतून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले.

४)    सामान्यांना
आचरता येईल
, असा आचारधर्म सांगितला.

५)    वारकरी
संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली.


३)  
संत एकनाथ

उत्तर:

१)    हे
महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत.

२)    त्यांचे
साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग
, गौळणी,
भारुडे इत्यादींचा समावेश होतो.

३)    त्यांनी
भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या
निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे.

४)    त्यांनी
भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला.

५)    परमार्थप्राप्तीसाठी
प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही
, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने
दाखवून दिले.

६)    ते
खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते.

७)    आपली
मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत.


४)  
संत तुकाराम

उत्तर:

१)    हे पुण्याजवळील
देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे.

२)    त्यांच्या
अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे.

३)    संत
तुकारामांची
‘गाथा’ ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे.

४)    संत
तुकाराम रंजल्यागांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात.

५)    त्यांनी
आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडवून
कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले.

Shivpurvakalin Maharashtra swadhyay 7vi – Shivpurvakalin Maharashtra swadhyay prashn uttar –  Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf – Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


प्रश्न ५. दुष्काळ हे रयतेला
मोठे संकट का वाटत होते?

उत्तर:

१)शेती ही पावसाच्या पाण्यावर
अवलंबून असे.

२)पाऊस पडला नाही तर शेतात
पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई.

३)जनावरांना चारा मिळत नसे.
पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई.

४)लोकांना गावात राहणे कठीण
होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई.

म्हणून रयतेला दुष्काळ हे रयतेला सर्वांत मोठे संकट वाटत
असे.


 **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा…….

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories

Leave a Comment