स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी गचकअंधारी | Swadhyay iyatta satavi marathi Gachkandhari swadhyay
माझी मराठी इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय | स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी पाठ आठवा माझी मराठी | गचकअंधारी स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी
प्र. १. खालील वाक्ये वाचा.
प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
(अ) सदा मडकी विकून येताना
गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
उत्तर: सदा मडकी विकायला जात
असताना ती गाढवाच्या पाठीवर लादून नेत असे. जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या
माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे. म्हणून सदा मडकी विकून
येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
(आ) गज्याने वडिलांसोबत
जाण्याचे नाकारले.
उत्तर: सदने वाघासिंहाला खाणाऱ्या
गचकअंधारीची भीती ग्ज्याला दाखवल्यामुळे गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
(इ) वाघ सदाच्या दुप्पट हलू
लागला.
उत्तर:
सदा गाढव समजून वाघाच्या
पाठीवर बसला होता. परंतु, वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचकअंधारी बसली आहे. जेव्हा
सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो
धाडधाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुले वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
(ई) सदा आकाशाकडे पाहत करुणा
भाकू लागला.
उत्तर: वाघाच्या पाठीवर आपण
बसलो आहे हे जेव्हा सदाच्या लक्षात आले. तेव्हा तो खूपच घाबरला. यातून सुटका करून
घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करून
भाकू लागला.
सातवी मराठी गाईड pdf | सातवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता सातवी विषय मराठी माझी मराठी स्वाध्याय
प्र. २. खालील मुद्द्यांवर
दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा.
- सदाचा व्यवसाय
- सदाचा मुलगा
गजानन - सदाची झालेली फजिती
- सदाने स्वतःची
केलेली सोडवणूक.
उत्तर:
१)सदाचा गाडगी, मडकी तयार
करून विकण्याचा धंदा होता. २) सदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदबरोबर
शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला. त्याच वेळी आदल्या रात्री वादळी पाऊस
पडला. त्या तडाख्याला सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून
असलेल्या पडक्या खिन्दरात लपून बसला होता. ३) गाढवाला शोधात सदा काळोखात त्या
खिंडारात आला. वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला. सदद्च्या व मुलाच्या
संवादातून वाघाला गचकअंधारी बाबत समजले होते. तिची भीती वाघाच्या मनात होती. सदा
पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचक अंधारी बसली आहे. म्हणून वाघ प्रंचड
घाबरला. ४) सदल जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे. हे कळले तेव्हा
तोही खूप घाबरला. अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुती मुळे दोघांचीही घाबरगुंडी
उडाली. या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता.
तेव्हा वाघ वादाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर
झाडावर चढून गेला. पाठीवरून गचकअंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला.
हे सुद्धा पहा:
प्र. ३. कोण, कोणास व का म्हणाले?
(अ) ‘‘कै भेव नोका दाखू मले
वाघाफाघाचा.’’
उत्तर: असे गजानन आपले वडील
सदा यांना म्हणाला .
सदाला आपला मुलगा गजानन याला
बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजानन ला वाघाची भीती दाखवत होता. हे
नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला.
(आ) ‘‘या वक्ती जंगलात कदी ना
ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले.’’
उत्तर: असे सदा गजाननन ला
म्हणाला.
गजाननने बाजारात येण्याचा
हट्ट धरला होता म्हणून सदाने त्याला गचकअंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले.
(इ) ‘गचकअंधारी झटके देऊन
रायली.’
उत्तर: असे वाघ स्वतःच्या
मनाशी म्हणाला.
सदाला आपण वाघाच्या पाठीवर
बसलो आहोत हे कळल्यावर सदा घाबरून धाडधाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचकअंधारीचे
कृत्य आहे, म्हणून वाघ स्वतःशीच हे वाक्य म्हणाला.
(ई) ‘गचकअंधारी आज आपल्याले
खाल्ल्याबिगर राहत नव्हती.’
उत्तर: असे वाघ स्वतःच्या
मनाशी म्हणाला.
पारंबीला लोंबकळून सदाने
वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हा वाघाला वाटले की गचकअंधारी आपोआप गेली
. म्हणून घाबरलेला वाघ स्वतःशीच असे म्हणाला.
(आ) आपल्या आजूबाजूच्या
चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून ‘पंचक्रोशी’
म्हणतात. याप्रमाणे खालील
शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा.
(अ) ज्यास कोणी शत्रूनाही, असा.
उत्तर: अजात शत्रू
(आ) मोफत पाणी मिळण्याचे
ठिकाण.
उत्तर: पाणपोई
(इ) धान्य साठवण्याची जागा.
उत्तर: कोठार
(ई) दुसऱ्याच्या मनातले
ओळखणारा.
उत्तर: मनकवडा
(उ) डोंगर पोखरून आरपार
केलेला रस्ता.
उत्तर: बोगदा
(इ) खालील चौकोनात विशेष्य व
विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
|
काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, |
|
विशेष्य |
विशेषणे |
|
काळोख |
किट्ट |
|
चपळाई |
विलक्षण |
|
पारंबी |
लोंबणारी |
|
पाऊस |
वादळी |
Iyatta satavi gachkandhari swadhyay | Gachak andhari iyatta satavi swadhyay
(ई) कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या
रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा.
(मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे, शंकेची
पाल चुकचुकणे.)
(अ) पतंग पकडण्यासाठी
धडपडणाऱ्या मुलांनी एकच ………………… .
उत्तर: पतंग पकडण्यासाठी
धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला .
(आ) उघड्या भांड्यातील पाणी
पाहून अबोलीच्या मनात ………………… .
उत्तर: उघड्या भांड्यातील
पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली .
(इ) लहान मुलांची मस्ती बघून
आईचा जीव ………………… .
उत्तर: लहान मुलांची मस्ती
बघून आईचा जीव मेटाकुटीला आला.
ई) पोलिसांना बघून चोरांची
………………… .
उत्तर: पोलिसांना बघून
चोरांची घाबरगुंडी उडाली.
माझे वाचन.
हा पाठ वाचताना तुम्ही खूप
हसलात,
असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.
उत्तर:
१)वाघाला गाढव समजून सदा
वाघाच्या पाठीवर बसला.
२) सदाच्या अंगाला घाम फुटला.
तो वाघाच्या पाठीवर बसला. पण त्यामुळे वाघ घाबरला. त्याला वाटले की गचकअंधारी आता
आपल्याला पाण्यात भिजवून भिजवून खाणार.
३) आपला जीव वाचण्यासाठी सदा वडाच्या
झाडावर चढला. पण वाघाला मात्र आपणच गचकअंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो
पळत सुटला.
7 th standard gachkandhari swadhyay marathi |Iyatta Satavi Marathi guide
‘गचकअंधारी’ हे
पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर: गचकअंधारी हे पात्र
पूर्णतः काल्पनिक आहे. कारण गचकअंधारी या नावाचा कोणताही प्राणी अस्तित्वात नाही.
ही लेखकाची एक कल्पना आहे.
पाठाच्या दृष्टीने
‘गचकअंधारी’ या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा
उत्तर: गचक अंधारी हे पात्र
काल्पनिक असले तरीही ते या कथेचे नायक आहे. या कथेतील सर्व कथानक या पात्राभोवती
फिरत राहते. गचकअंधारी चे नाव व वर्णन ऐकून सदबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट गजानन
सोडून देतो. वाघाने गचक अंधारीला पहिले
नसले तरीही वाघ त्याला घाबरतो. शेवटी गचकअंधारीपासून आपली सुटका झाली या आनंदात
वाघ पळून जातो. एकूणच संपूर्ण कथानक गजकअंधारीने व्यापलेले आहे. हे या पत्राचे
पाठातील महत्व आहे.
आपण समजून घेऊया.
खालील परिच्छेद वाचा. त्यातील
शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड
आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली
खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या
पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटत
उत्तर: आमच्या शाळेसमोर
वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून
आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत
झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला
एखाद्या मित्राप्रमाणे वाटते.
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
- हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा.
- स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.
हे सुद्धा पहा:











