11.बाली बेट स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी | Bali Bet swadhyay prashn uttare iyatta satavi marathi

Bali Bet swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी बाली बेट स्वाध्याय प्रश्न उत्तरे बाली बेट स्वाध्याय ७वी मराठी 7 standard Bali bet
Admin

Bali Bet swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी बाली बेट स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्रश्न १. खालील आकृती पूर्ण करा.

(अ) बाली बेटावरील विविध ललितकला

उत्तर:

१) गायन

२) चित्र

३) शिल्प

४) नृत्य

 

Bali Bet swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी बाली बेट स्वाध्याय प्रश्न उत्तरे

(आ)

बेटाचे वर्णन करण्यासाठी

लेखकांनी वापरलेले शब्द

बाली बेटावरील कलांसाठी

लेखकांनी वापरलेले शब्द

रत्नजडित कंठ्यातील कंठमणी

ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ

 




प्र. २. खालील कल्पना स्पष्ट करा.


(अ) बाली बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.

उत्तर:

एखादा रत्नजडीत कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार पसरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमाण्यातील महत्वाचा मुख्य कंठमणी असतो, तसे बाली बेट आहे म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे, असे लेखक म्हणतात.

 

(आ) बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे.

उत्तर:

        बालीचे पर्यटन खाते हे अतिशय तत्पर आहे. या ठिकाणी असणारे अधिकारी बाली मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात.

 

(इ) ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.

उत्तर:

        लेखक जेव्हा बाली मधील हॉटेल सागर बीच मध्ये अपरात्री दाखल झाले. तेव्हा त्या हॉटेलमधील स्वागत विभागामध्ये काम करणारे चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत्किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते.

        त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.

 

(ई) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.

उत्तर:

        ‘सागर बीच’ हॉटेलातील बगिच्यामध्ये माडा फोफळीच्या राया होत्या. या बगीच्यामधून फिरताना जणू काही ती झाडेच कोणी मंडळी आली आहेत म्हणून लेखकांकडे पाहत आहेत असे लेखकांना वाटत होते. फुलांनी बहरलेली रोपटी होती. तेथील फुलबागा भल्या पहाटेही टवटवीत होत्या. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या देत होता काही जागी, काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुलांमाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.

 

प्र. ३. खालील मुद्द्यांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा.


उत्तर:

§  इंडोनेशियातील बेटांच्या समूहामध्ये बाली हे बेट स्थित आहे.

§  या ठिकाणी असणारी घरे व हॉटेल्स ही निसर्गरम्य परिसरात स्थित आहेत. झापांची छपरे असलेली घरे या ठिकाणी पाहायला मिळतात.

§  या ठिकाणी पर्यटनखात्यामध्ये असणारे अधिकारी पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करतात.

§  समुद्रकिनारी हॉटेलमध्ये गर्द बगिचा आहे. या बगीच्यात माड आणि पोफळींखेरीज इतर इतकी झाडे आहेत.

§  डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत . रेडीओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे.

 

प्र. ४. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

 

(अ) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.

उत्तर:

        झोपेत रात्री स्वप्ने पडतात. या स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नानाची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते.

 

(आ) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.

उत्तर:

        लेखक हॉटेल वर पोहचल्यावर हॉटेल मधील खोलीत प्रवेश करताच ते थकलेले असल्याने ते पाचच मिनिटांत गाढ झोपी गेले म्हणून पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली असे लेखक म्हणतात.

 

(इ) वेलींचेही अंगधुणे झाले होते.

उत्तर:

        सागर बीच हॉटेलच्या बगिच्यामध्ये असणाऱ्या वेली या सकाळी पडणाऱ्या दवामुळे ओल्या झाल्या होत्या जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. म्हणून लेखक म्हणतात की, वेलींचेही अंगधुणे झाले होते.

 

(ई) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.

उत्तर:

        पूर्वी राजदरबारी गायक असत, त्यांना भाट असे म्हटले जात आसे. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट आहेत .पाहते पक्षांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागते. पक्षीरूपी भाटांची काम्तारतात लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. असा अर्थबोध वरील ओळीतून होतो. 


खेळूया शब्दांशी.


(अ) खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या.

 

(अ) टुरिस्टांचा स्वर्ग.

उत्तर: पर्यटक लोकांसाठी बाली हे बेट अत्यंत सुखकारी असल्याने त्याला ‘टुरिस्टांचा स्वर्ग’ असे म्हटले आहे.

 

(आ) किर्र जंगल.

उत्तर: घनदाट जंगल.

 

(इ) अश्राप माणसे.

उत्तर: मनाने निर्मळ, अतिशय भोळीभाबडी माणसे.

 

(ई) गाणारे भाट

उत्तर: राजदरबारी असणारे गायक.

 

(उ) तंबूतला सिनेमा.

उत्तर: गावोगावी तंबू ठोकून त्यामध्ये सिनेमा दाखवणे.

 

(आ) खालील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा.

(अ) अभंग- 1) ओव्या मध्ये असलेला एक मराठी छंद प्रकार २) काहीही न भंगणारे

(आ) बोट- १) होडी २) हाताचे बोट  

 

(इ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

(१) उभयता

उत्तर: काका व काही उभयता मुंबईला गेले.

 

(२) यत्किंचितही

उत्तर: सरांनी विचालेल्या प्रश्नाचे राजूने यत्किंचितही विचार न करता उत्तर दिले.

 

(३) चौघडा

उत्तर: लग्नसमारंभात सनई-चौघडा वाजवला जातो.

 

(४) चित्रविचित्र

उत्तर: जंगलामध्ये चित्रविचित्र प्राणी होते.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.