४. गवतफुला रे ! गवतफुला ! प्रश्न उत्तरे | Gavatfula re ! gavatfula swadhyay uttare

गवतफुला रे गवत फुला कविता स्वाध्याय गवतफुला रे गवतफुला कविता प्रश्न उत्तरेगवतफुला रे गवतफुला इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे गवत फुला रे गवत फुला ६वी मराठी
Admin

४. गवतफुला रे ! गवतफुला !

गवतफुला रे गवत फुला कविता स्वाध्याय / गवतफुला रे गवतफुला कविता प्रश्न उत्तरे / गवतफुला रे गवतफुला इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे / गवत फुला रे गवत फुला कविता इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

गवतफुला रे गवत फुला कविता स्वाध्याय गवतफुला रे गवतफुला कविता प्रश्न उत्तरे गवतफुला रे गवतफुला इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे गवत फुला रे गवत फुला कविता इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे Gavtfula re gavtfula kavita prashn uttare Gavatfula re gavtfula kavita swadhyay Gavtfula re gavtfula kavita exercise in Marathi 6 vi Marathi swadhya

गवतफुला रे ! गवतफुला ! प्रश्न उत्तरे


 (अ)       कवितेतील मुलाची गवतफुलाशी कुठे व कशी भेट झाली?

उत्तर: 

            कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत माळरानावर पतंग उडवत होता. अचानक त्याचे लक्ष गवतावर डोलणाऱ्या इवल्याश्या गवतफुलाकडे गेले. अशा प्रकारे मुलाची गवतफुलाशी भेट झाली.


(आ)    गवतफुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला?

उत्तर: 

            गवतावरच्या इवल्याश्या गवतफुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरून गेला, माळरानावर त्याच्यासोबत खेळणाऱ्या मित्राला विसरून गेला.


(इ)           कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे?

उत्तर:     कवयित्रीने गवतफुलाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.

            गवतफुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूक रेशीम-पाती आहेत. निळ्या रंगाची एक पाकळी आहे, आणि तिचे पराग हे झगमगणारे आहेत. गवतफुलाच्या तळाला अजून एक लाल रंगाची पाकळी खुलली आहे.


(ई)           गवतफुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे?

उत्तर: 

            गवतफुलाला भेटायला लहान होऊन वारा गवतफुलाला झोपाळा खेळायला आला आहे. रात्र सुद्धा लहान होऊन अंगाई गीत म्हणते आहे. मुलालाही वाटते की लहान होऊन गवतफुलाला भेटावे.


(उ)   गवतफुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत?

उत्तर: 

            घर , शाळा विसरून मुलाला गवतफुलाच्या सान्निध्यात सतत रहावेसे वाटते. गवतफुलाची गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगाव्यात. गवत फुल खेळत असणारे खेळ शिकायाचे आहेत. त्याला जादू शिकवायची आहे. आभाळाशी हट्ट करून गवतफुलासोबत खाऊ खावा. गवत फुल ज्याप्रमाणे कपडे घालते त्याप्रमाणे कपडे घालून फुलपाखरांना फसवायचे आहे. अशा गोष्टी गवतफुलासोबत मुलाला करायच्या आहेत.

 

प्र. २. तुम्हांला फुलपाखरू भेटले, तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल? तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:

    हे इवल्याश्या फुलपाखरा! तू खूप सुंदर आणि मनमोहक आहेस. तुला बाहेर उडायला खूप मज्जा येत असेल ना? तू दिवसभर काय काय करतोस? तू कोण कोणते खेळ खेळतोस? तू आमच्यासारखा शाळेत जातोस का? तुझे घर कसे आहे. माझा तू मित्र बनशील का? मला तुझ्यासारखे उडायला शिकवशील का?

 

प्र. ३. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा.

 

(अ)       तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो.

उत्तर: पाहुन तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा!

 

(आ)    मला तुझ्यापेक्षाही लहान व्हावेसे वाटते.

उत्तर: मलाही वाटे लहा न होऊन, तुझ्याहूनही लहा न रे

 

(इ)           तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या.

उत्तर: तुझी गोजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या

 

(ई)           तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे.

उत्तर: तुझे घालुनी रंगित कपडे, फूलपाखरां फसवावे!

 

प्र. ४. या कवितेत गवतफुलाचे वर्णन करताना कोणाला, कोणते रंग वापरले आहेत ते लिहा.

 

उदा., रेशिम-पाती - हिरवी

(१) पाकळी – निळी

(२) पराग – पिवळे

(३) तळीची पाकळी – लाल

 

प्र. ५. गवतफुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा. त्यांमधील साम्य व भेद लिहा.

उत्तर:

साम्य

1.    ती मनमोहक रंगाची असतात.

2.    काही फुले सुगंधित असतात तर काही फुलांना सुगंध नसतो.

भेद

1.    गवत फुले नाजूक असतात व इतर फुले मोठी असतात.

2.    त्यांच्या खोडाची उंची भिन्न असते. 

 

प्र. ६. ‘सळसळ’ यासारखे आणखी शब्द लिहा

उत्तर: खळखळ, घळघळ, वळवळ, मळमळ


Gavtfula re gavtfula kavita prashn uttare / Gavatfula re gavtfula kavita swadhyay / Gavtfula re gavtfula kavita exercise in Marathi / 6 vi Marathi swadhya


खेळूया शब्दांशी


(अ) समान अर्थाचे शब्द लिहा.

गीत           = गाणे

रात्र            = निशा

आभाळ      = गगन

वारा           = वात


(अ)      रंगरंगुल्या, सानसानुल्या, नीळनिळूली यांसारखे शब्द शोधा व लिहा.

उत्तर: १) गोडगोजिरी २) रंगीबेरंगी ३) लाजलाजरी

 

(इ) गवतफुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा.

उत्तर:        रंगरंगुल्या

                      |

 सानसानुल्या --गवतफुल- झुलता झुलता 

                                            हसणारे

                      |

             सुंदर रंगकळा

 

 

मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल

 


गवतफुला रे गवत फुला कविता स्वाध्याय

गवतफुला रे गवतफुला कविता प्रश्न उत्तरे
गवतफुला रे गवतफुला इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे
गवत फुला रे गवत फुला कविता इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे
Gavtfula re gavtfula kavita prashn uttare
Gavatfula re gavtfula kavita swadhyay
Gavtfula re gavtfula kavita exercise in Marathi
6 vi Marathi swadhya

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.