सायकल म्हणते, मी आहे ना! स्वाध्याय उत्तरे | Sayakal mhante mi aahe na prashn uttare.

सायकल म्हणते मी आहे ना प्रश्न उत्तर सायकल म्हणते मी आहे ना या पाठचा स्वाध्याय दाखवा सायकल म्हणते मी आहे ना धडा सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी
Admin

 सायकल म्हणते, मी आहे ना!


सायकल म्हणते मी आहे ना स्वाध्याय / सायकल म्हणते मी आहे ना याचे प्रश्न उत्तर / सायकल म्हणते मी आहे ना प्रश्न उत्तर / सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय


सायकल म्हणते मी आहे ना याचे प्रश्न उत्तर सायकल म्हणते मी आहे ना प्रश्न उत्तर सायकल म्हणते मी आहे ना या पाठचा स्वाध्याय दाखवा सायकल म्हणते मी आहे ना धडा सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय Sayakal mhante mi aahe naa eyatta sahavi dhada dusara swadhya Saykal mhante mi aahe na prashn uttare

 सायकल म्हणते, मी आहे ना!  स्वाध्याय उत्तरे




स्वाध्याय 




प्र. १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)   मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात?

उत्तर: पुढील कामे करण्यसाठी मुले सायकलचा वापर करतात.

१)  आईने सांगितलेला साबण दुकानातून आणण्यासाठी.

२)     दुकानातून भाजीपाला आणण्यासाठी

३)     कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणण्यासाठी तर कधी दुध आणण्यासाठी सायकलचा वापर होतो.

४)     छोटी-मोठी इतर कामे पटापट करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात.


 (आ)   सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे?

उत्तर: १) घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात.

२) घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात.

३) मांसपेशी तंदुरुस्त राहतात.

म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे.

 

(ई)            सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला?

उत्तर:

१)जॉन बॉइड डनलॉप यांनी १९८७ साली सायकलचा शोध लावला यानंतर तिच्या रुपात खूप बदल झाले.

२)सायकल ला गती मिळावी म्हणून पेडलला दंततबकडी बसवली.

३)तिचा वेग वाढवा यासाठी रबरी टायर बसवले गेले.

४)सुरुवातील गिअर नसलेली सायकल ला आत्ता गिअर उपलब्ध आहेत.

५)शर्यतीसाठी, पर्यटनासाठी अशा विविध कारणांसाठी सायकल ची रूपे वेगवेगळी आहेत.

 

प्र. २. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.


(अ)      आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील?

उत्तर: सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर पुढील फायदे होतील.

१)इंधनाची बचत होईल.

२) इंधनावर खर्च होणारे पैसे वाचतील.

३) वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

४) स्वतःचे कष्ट वाचतील.

५) वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

 

 

(आ) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?

उत्तर: 

१) माझ्या कुटुंबातील लोकांना मी सायकल वापराचे महत्व समजावून सांगेन.

२) सायकल वापराने होणाऱ्या आरोग्यविषयक फायदे पटवून देईल.

३) सायकल वापरल्याने आपल्या दैनंदिन खर्चात कशी बचत होते हे सांगेन.

४) अपघात होण्याची भीती वाटणार नाही.

५) वाहतूक कोंडी आणि पार्किंग च्या समस्या संपतील हे समजावून सांगेन.

 

प्र. ३. खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा.

उत्तर:

वयक्तिक फायदे

१)शरीराचा व्यायाम होतो.

२) पैसे वाचतात

३) पार्किंग ची अडचण नाही.


सामाजिक फायदे:

१)     वायू प्रदूषण कमी होईल. 

२)वाहतूक कोंडी कमी होईल.

३) अपघातांचे प्रमाण घटेल.


राष्ट्रीय फायदे

१)   पेट्रोल , डीझेल या इंधनाची बचत

२)   इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही.

३)   चलन वाचते.

 

प्र. ४. सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा.

उत्तर: सायकलच्या भागांची नावे :

    बैठक , चाके, घंटी , चौकट, तोल सांभाळणारे आणि सायकल ची दिशा बदलणारे हँडल, सायकल ला गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक इत्यादी.

 

प्र. ५. सायकल शिकताना तुम्हांला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.

उत्तर: 

            मी पाचवी च्या वर्गात गेलो त्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त बाबांनी मला सायकल भेट दिली. पण मला सायकल चालवता येत नव्हते. सायकल चालवण्याच्या प्रयत्न केला तर धड सायकलच्या सीट वर बसताही येत नव्हते. बाबांनी मला कसे बसे सायकल वर बसवले. पायडल मारून मी सायकल पुढे घेऊन जावू लागलो तर मला तोलच सांभाळता येत नव्हता. बाबांनी मागून सायकल धरून धरून मला तोल सांभाळायला शिकवले. शिकता शिकता एक-दोन वेळा सायकल वरून देखील पडलो. तोल सांभाळायला येवू लागला पण ब्रेक दाबायचे भानच राहायचे नाही. काही दिवसांत ते ही जमायला लागले. नंतर मला चांगली सायकल चालवता येऊ लगली. आत्ता सायकल वर स्वार होऊन फिरण्याच्या आनंदच काही वेगळा आहे.

 

प्र. ६. संगणक तुमच्याशी बोलू लागला तर.... कल्पना करा व लिहा.

उत्तर:

                नमस्कार मुलांनो... ओळखलात का मला? मी संगणक या आधुनिक जगातील तुमचा सोबती. तुमचे कोणतेही काम अधिक सोपे व्हावे तुम्ही माझी मदत घेता आणि मी तुमची अगदी जलद गतीने मदत करतो. तुमचे काम करताना मी कधीही थकून जात नाही तुमच्यासोबत काम करायला मला आवडते. तुम्हालाही मी आवडतोच ना.तुम्ही मला इंटरनेट शी जोडले की तुम्हाला माझ्यावर शोधलेली सर्व माहिती तुम्हाला काही क्षणातच उपलब्ध करून देतो. माझ्यावर उपलब्ध असणाऱ्या विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच उपलब्ध होते. माझे विविध उपयोग आहेत. आत्ता तर मी तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये ऑनलाईन मदत करतो. माझ्या माध्यमातून तुम्ही विविद कला, कोर्सेस, किंवा एखाद्या विषयाबाबत अधिक ज्ञान मिळवू शकता. माझ्यावर उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी घ्या. आणि हो माझ्यावर गेम खेळण्यात आणि चित्रफिती बघण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य तोच माझा वापर करा. धन्यवाद.

 

प्र. ७. सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळींत लिहा
उत्तर:

( मोटारसायकल रस्त्यावर पार्किंग करून ठेवली होती बाजूने जाणाऱ्या सायकल ला पाहून ती हसू लागली. )

मोटारसायकल : हा हा हा ....!

सायकल : का बर हसतेस मला ?

मोटारसायकल : केवढीशी ग तू छोटी, माझ्याकडे बघ मी एकदम मजबूत आहे. आणि माझ्या मालकाला काही कष्ट करू न देता त्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाते.

सायकल: अग मी माझ्या मालकाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेते त्यामुळे माझा मालक तंदुरुस्त आहे. माझ्या मालकाचा मी व्यायाम करून घेते. तू तुझ्यामुळे तुझ्या मालकाचे आरोग्य धोक्यात घालत आहेस.

मोटारसायकल : ते काहीही असुदे पण आजकाल लोकांना माझा वेगच फार आवडतो.

सायकल: अग माझा वेग कमी असला तरीही मी माझ्या मालकाला त्याला जायच्या ठिकाणी पोहोचवतेच तेही कोणतेही प्रदूषण न करता तुझ्यामुळे खूप प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.

मोटारसायकल: हे तुझे बोलणे मला पटते आहे. माझ्यामुळे हवा प्रदूषित होते. त्यामुळे या सृष्टीला धोका निर्माण झाला आहे. पण हा माणूस माझा वापर कमीच करत नाही.

सायकल: हो , मी पर्यावरण पूरक आहे. त्यामुळे जवळच्या कामांसाठी लोकांनी माझाच वापर करायला हवा. तातडीच्या कामाच्या वेळीच फक्त तुझा अवलंब केला पाहिजे.

मोटारसायकल: मला माफ कर बाई. आपण आपल्या आपल्या जागी दोन्हीही बरोबर आहोत.

 

सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय / सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय / Sayakal mhante mi aahe naa eyatta sahavi dhada dusara swadhya / Saykal mhante mi aahe na prashn uttar


खेळूया शब्दांशी .

 

(अ) खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या.

(अ) प्रचार व प्रसार

उत्तर:     प्रचार म्हणजे कोणतीही गोष्ट इतरांना ठामपणे पुन्हा पुन्हा सांगून पटवून देणे. आणि प्रसार म्हणजे एकाद्या गोष्टीचा प्रचार केला तर वेगाने त्या गोष्टीचा फैलाव होणे. प्रसार आपोआप होत असतो पण प्रचार करावा लागतो.


(आ)   विश्वास व आत्मविश्वास

उत्तर:     विश्वास म्हणजे एखाद्यावर आपली खात्री असणे. एखादी गोष्ट करताना ती आपल्याला जमेलच मी ती करेन अशी कार्यक्षमतेची जाणीव स्वताला होणे म्हणजे आत्मविश्वास होय.

 

(आ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.


(अ) रखडत चालणे – अर्थ : अडखळत चालणे.

वाक्य: राजू रखडत चालत होता.

 

(आ) धडा शिकणे : अद्दल घडवणे.

वाक्य: दुकानात चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.


(इ) हातभार लावणे: मदत करणे.

वाक्य: केतन आईच्या कामात हातभार लावतो.

 

(इ) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा.


(अ) कधीमधी : कधीतरी अधूनमधून

(इ) धामधूम : जल्लोष

(उ) साधेसुधे: खूप साधे.

(आ) अवतीभवती: आजूबाजूला

 (ई) फेरफटका: फिरणे किंवा प्रवास करणे.

 

(ई) ‘आडरस्ता’ यासारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर:

१) आडवाट

२) आडमार्ग

३) आडगाव



मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल.



सायकल म्हणते मी आहे ना स्वाध्याय

सायकल म्हणते मी आहे ना याचे प्रश्न उत्तर
सायकल म्हणते मी आहे ना प्रश्न उत्तर
सायकल म्हणते मी आहे ना या पाठचा स्वाध्याय दाखवा
सायकल म्हणते मी आहे ना धडा
सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय
सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय
Sayakal mhante mi aahe naa eyatta sahavi dhada dusara swadhya
Saykal mhante mi aahe na prashn uttare
Saykal mhante mi aahe swadhya uttare

1 comment

  1. Thanks 🙏
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.