1.आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र |Aapalya Sanvidhanachi Olakh swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra .

आपल्या संविधानाची ओळख प्रश्न उत्तरे इयत्ता सातवीइतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवीAaplya sanvidhanachi olkh swadhyay 7vi आपल्या संविधानाची ओळख
Admin

सातवी इतिहास व नागरिकशास्त्र  आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7th Standard Aaplya Sanvidhanachi Olakh itihas nagarikshastra swadhyay question answer

आपल्या संविधानाची ओळख प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा स्वाध्याय पाठ  पहिला आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र  गाईड

 

१. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

 

(१) संविधानातील तरतुदी

उत्तर:

                देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. या तरतुदींनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो.

                संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदा. नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासनसंस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय,  निवडणूक, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकारक्षेत्र इत्यादी.

 


(२) संविधान दिन

उत्तर:

                मसुदा समितीने तयार केलेले संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

 

 

आपल्या संविधानाची ओळख प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  आपल्या संविधानाची ओळख या पाठाचा स्वाध्याय  पाठ  पहिला आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र  गाईड  आपल्या संविधानाची ओळख धडा पहिला स्वाध्याय  इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी  Aaplya sanvidhanachi olkh swadhyay 7vi  Aaplya sanvidhanachi olakh  swadhyay prashn uttar  Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf  Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

२. चर्चा करा.


(१) संविधान समितीची स्थापना केली गेली.

उत्तर:

1.    इ.स. १९४६ पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे.

2.   स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता.

3.   म्हणून भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली.

 

(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.

उत्तर:

१.    डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

२.    त्यांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला.

३.    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला संविधान सभेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मुल मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

४.    भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ म्हणतात.

 

(३) देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी.

उत्तर:

१.    देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे.

२.    दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती करणे.

३.    शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे.

४.    दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजनाकरणे.

५.    आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व बाबी देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असतात. 

 

Aaplya sanvidhanachi olkh swadhyay 7vi Aaplya sanvidhanachi olakh  swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


३. योग्य पर्याय निवडा.


(१) कोणत्या देशाचेसंविधान पूर्णतः लिखित नाही ?

(अ) अमेरिका               

(ब) भारत

(क) इंग्लंड        

(ड) यांपैकी नाही.

उत्तर: (क) इंग्लंड 

 

(२) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

(अ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

(ब) डॉ.राजेंद्रप्रसाद

(क) दुर्गाबाई देशमुख

(ड) बी.एन.राव

उत्तर: (ब) डॉ.राजेंद्रप्रसाद

 

(३)  खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?

(अ) महात्मा गांधी

(ब) मौलाना आझाद

(क) राजकुमारी अमृत कौर

(ड) हंसाबेन मेहता

उत्तर: (अ) महात्मा गांधी

 


(४) मसुदा समितीचेअध्यक्ष कोण होते?

(अ) डॉ. राजेंद्रप्रसाद

(ब) सरदार वल्लभभाई पटेल

(क) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

(ड) जे.बी.कृपलानी

उत्तर: (क) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 

 इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र  गाईड आपल्या संविधानाची ओळख धडा पहिला स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी


४. तुमचे मत लिहा.

 

 

(१) शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात ?

उत्तर:

१.    देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे.

२.     दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा.

३.    उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना .

        इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात.

 


(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?

उत्तर:

१.२६ जानेवारी १९५० पासून संविधानातील तरतुदींनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली.

२.या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले.

म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

 

(३) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे.

उत्तर:

१.शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते.

२.संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते.

३. सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो.

४. नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते.

 



  **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.