१९.वासरू कविता स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाचवी मराठी | Vasaru kavita swadhyay prashn uttare 5th standard marathi question answers

१९.वासरू कविता स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

वासरू 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे / वासरू इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / इयत्ता पाचवी विषय मराठी वासरू स्वाध्याय / वासरू प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.

स्वाध्याय


 प्र.१. एक- दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ)      रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?

उत्तर: रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते.


(आ)   तहान, भूक विसरून वासरू काय करते?

उत्तर: तहान , भूक विसरून वासरू रानभर फिरते. सगळे रान पायांखाली घालते मनसोक्त फिरते.

 

 ( इ ) वासराला कळपाची आठवण केव्हा होते?

उत्तर: जेव्हा वासरू फिरून थकते आणि त्याचा फिरण्याचा उत्साह संपतो तेव्हा त्या वासराला कळपाची आठवण  होते.

 

वासरू 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे वासरू इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी वासरू स्वाध्याय वासरू प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Vasaru swadhyay prashna uttare Vasaru question answer Vasaru prashn uttar 5th standard Marathi question answers


प्र.२. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा.


(अ)     भूक, तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते.

उत्तर: विसरुनी भान, भूक नि तहान,

पायांखाली रान घाली सारे.


(आ) वासरू रानात फिरून फिरून थकले , की त्याचा उत्साह कमी होतो . मग त्याला आपला कळप आठवू लागतो.

उत्तर: थाकुनिया खूप सरता हुरूप,

आठवे कल्प तयालागी.


(आ)  ते वासरू कळपाकडे परत यायला निघते, पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते. असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते.

उत्तर: फिरू जाता मागे दूर जाऊ लागे,

आणखीच भागे भटकत.

  

प्र.३. कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले, याचे वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर:         कळपातून निघालेल्या वासराला मनसोक्तपणे रान फिरायचे असते. त्यामुळे वासरू कळपातून बाहेर पडते. आपण जणू काही बंधनातूनच मुक्त झालो असे त्याला वाटते आणि ते रानोमाळ फेर धरते स्वतःशीच गोल गोल फिरते. सगळी बंधने विसरून ते स्वैरपणे जंगलात मनाला वाटेल ती वाट पकडून धावू लागते. तहान भूक विसरून ते सारे रान पालथे घालत हुंदडत फिरत असते. जेव्हा ते खूप थकते, आणि फिरून त्याचे मन भरते तेव्हा त्याला आपल्या कळपाची आठवण होते. परन्तु ते जेव्हा आपला कळप शोधू लागते तेव्हा वाट विसरल्याने कळप शोधता शोधता आणखीनच रानात भरकट जाते.

 

Vasaru  swadhyay prashna uttare / Vasaru question answer / Vasaru  prashn uttar  / 5th standard Marathi question answers

 प्र.४. खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा.

कानांमध्ये वारे भरणे

उत्तर:

अर्थ: हुरळून जाणे.

वाक्य: बाबांनी राजूसाठी नवा मोबाईल आणलेला पाहून राजू हुरळून गेला.

 

हुरळून जाणे

उत्तर:

अर्थ: मनातून खूप आनंदी होणे.

वाक्य: चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने राजूचे सर्वांनी खूप कौतुक केले त्यामुळे तो हुरळून गेला.

 

रान पायांखाली घालणे

उत्तर:

अर्थ: दिशा फुटेल तिकडे फिरणे.

वाक्य: हरवलेल्या वासराला शोधण्यासाठी शेतकऱ्याने सारे रान पायांखाली घातले.

 

तहानभूक विसरणे

उत्तर:

अर्थ: एखाद्या कामात मग्न होऊन जाणे.

वाक्य: काम करताना राजू तहानभूक विसरून जातो.

 

मग्न होणे

उत्तर:

अर्थ: गुंग होणे.

वाक्य: रामू  आपल्या ऑफिस च्या कामात मग्न होता.

 

हुरूप येणे

उत्तर:

अर्थ: उत्साह येणे.

वाक्य: कामाचा मोबदला मिळालेला पाहून राजूला अधिक काम करण्याचा हुरूप आला.

 

मोकाट सुटणे .

उत्तर:

अर्थ: स्वैरपणे फिरणे.

वाक्य: कळप सोडून आलेले वासरू जंगलात मोकाट फिरत होते.

 

प्र.५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा .


(अ)      शाळेची मधली सुट्टी झाली , की तुम्ही काय काय करता?

उत्तर:     शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्वजण वर्गाबाहेर पडून शाळेसमोर असणाऱ्या झाडाखाली एकत्र जमतो. एकमेकांशी गप्पा मारतो कधी कधी आम्ही सार्वजन मिळून सुट्टीत खेळ सुद्धा खेळतो. अभ्यासाबाबत चर्चा करतो.


(आ)   खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते?

उत्तर:      खेळायला गेल्यानंतर मी लवकर घरी परतलो नाही तर माझी आई मी खेळत असलेल्या ठिकाणी जाऊन मला घरी घेऊन येते. कधी कधी ती मी ज्या मित्रांच्या घरी खेळायला गेलो आहो त्या मित्रांच्या घरी फोन करून माझी चौकशी  करते.


(इ)        तुम्ही तहानभूक केव्हा विसरता?

उत्तर:     जेव्हा आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा  असतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो.


 प्र.६. 'मोकाट - अफाट -वाट' याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा.

उत्तर:

 • फिरू-घेरू-वासरू
 • वारे-न्यारे-फिरे
 • मोकाट – अफाट – वाट
 • भान- रान- तहान
 • हुरूप- खूप – कळप
 • मागे- भागे- लागे
 • लेकरू – अंधारू- हंबरू

 

प्र.७.' रानोमाळ ' सारखे पाच जोडशब्द लिहा.

उत्तर:

 1. कपडालत्ता
 2. भांडीकुंडी
 3. पानेफुले
 4. डोंगरदऱ्या
 5. नदीनाले

 

प्र.८. ' एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले , ' असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का ? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का ? त्या वेळी काय घडले ते सांगा .

उत्तर:    आमच्या गावात भरणाऱ्या  जत्रेमध्ये मी असा प्रसंग पहिला आहे. गेल्या ३-ते ४ वर्षांतली गोष्ट आहे.आम्ही सार्वजन गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेलो होतो. जत्रेत माणसांची प्रचंड गर्दी होती. माणसांची गर्दी खूपच होती. त्यातच आम्हाला एक लहान मुलगी हुंदके देत रडताना दिसली ती एकसारखी तिच्या आईला हाक मारत होती. परंतु तिची आई तिच्याजवळ नव्हती ती मुलगी गर्दीत हरवली होती. आम्ही सर्वजण तिच्याजवळ गेलो तिला आधी पाणी पिऊ दिले आणि तिला धीर दिला. आम्ही तिला घेऊन जत्रेच्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा विभागाकडे संपर्क साधला. तेथील सुरक्षा रक्षकांनी सदर मुलीचे नाव स्पीकर वरून मोठ्याने सांगितले . तो आवाज ऐकून त्या मुलीची आई थोड्या वेळातच तिला शोधत त्या ठिकाणी आली. आई दिसताच ती मुलगी आईला घट्ट बिलगली.

 

• खालील चित्रांना विशेषणे लावा .

 

वासरू 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे वासरू इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी वासरू स्वाध्याय वासरू प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Vasaru swadhyay prashna uttare Vasaru question answer Vasaru prashn uttar 5th standard Marathi question answers

 

वासरू 5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे वासरू इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी वासरू स्वाध्याय वासरू प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कारागिरी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Vasaru swadhyay prashna uttare Vasaru question answer Vasaru prashn uttar 5th standard Marathi question answers


 


 • ओळखा पाहू !

बत्तीस भाऊ, एकच बहिण

सर्वात तीच आयुष्यमान.

उत्तर: दात-जीभ  

 

चार बोटांचे अंतर दोघांत असे एकावर विश्वास तर दुसर्यावर नसे.

उत्तर: डोळे-कान  

 

बारा घरावर तिघे पहारा करती सदैव फिरती, न थकती, न थांबती.

उत्तर: घड्याळातील काटे

 


 हे सुद्धा पहा: 

इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके डाउनलोड करा .

येथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे पहा.

येथे क्लिक करा.

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषयांची पुस्तके पहा.

येथे क्लिक करा.


स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा ......
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.