१३. पाड्यावरचा चहा स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी | Godhadi kavita swadhyay iyatta aathavi mrathi.

इयत्ता आठवी मराठी पाड्यावरचा चहा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Padyavarcha chaha swadhya prashn uttare 

पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी मराठी पाठ दहावा | इयत्ता आठवी पाड्यावरचा चहा स्वाध्याय | इयत्ता ८वी  मराठी पाड्यावरचा चहा स्वाध्याय


प्र. १. पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्‌द्यांना अनुसरून वर्णन करा.


(अ) खोपटे वसण्याचे ठिकाण-

उत्तर:  बहुतांश खोपटी ही साधारण उंचावट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीत वसवलेली  असतात.

 

(आ) खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य-

उत्तर:  कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या , खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर चार-सहा वासे वापरलेले असतात पावसापासून संरक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने इत्यादी साहीत्य वापरले जाते.

पाड्यावरचा चहा या धड्याचे प्रश्न उत्तर पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी प्रश्न उत्तर पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी मराठी पाठ दहावा इयत्ता आठवी पाड्यावरचा चहा स्वाध्याय इयत्ता ८वी  मराठी पाड्यावरचा चहा स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf इयत्ता आठवी विषय मराठी पाड्यावरचा चहा स्वाध्याय


(इ) दारे, खिडक्या व छप्पर-

उत्तर:  खोपटाला एकच दार असते, खिडक्या नसतातच, भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पानं पसरतात.

 

(ई) दालन

उत्तर:   खोपटाला एकच दालन असते. त्यातच स्वयंपाक होतो. बसण्या-उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठीसुद्धा तेच दालन , सर्व व्यवहार एकाच दालनात केले जातात.

 

पाड्यावरचा चहा स्वाध्याय इयत्ता आठवी \ पाड्यावरचा चहा या धड्याचे प्रश्न उत्तर | पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी प्रश्न उत्तर | पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी मराठी पाठ दहावा


प्र. २. पाठाधारे खाली दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा.


(अ) माची-

उत्तर:  बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी वस्तू जिचा वापर पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवण्यासाठी केला जातो.

 

(अ)  लहान लहान खड्डे-

उत्तर:  वारल्यांची कोंबडया हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात.

 

 (इ) सारवलेला ओटा-

उत्तर:  वारल्यांच्या घराभोवती घराला लागून सहा ते नऊ इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात. बसण्या- उठण्यासाठी याचाच उपयोग करतात.

 


प्र. ३. आकृत्या पूर्ण करा.


अ.  निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द

उत्तर:  खाई


.वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत

उत्तर:  डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायाचा.

 

प्र. ४. कारणे लिहा.


(अ) लेखिका निराश झाली तरी तिने स्वत:ला सावरले, कारण..........

उत्तर:  त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती.

 

(आ) लेखिका कंटाळून नाइलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण ..........

उत्तर:  ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या , त्यांच्यापैकी कोणीही तिथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हता, इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते .

 

प्र. ५. लेखिका आणि कॉ. दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघतक्ता करा.

उत्तर: 

. पाहुण्यांना झोपडीत नेलं

. एकानं खोली झाडली.

. दुसऱ्याने हातरी अंथरली.

. इतक्यात काहींनी बाज आणली.

. जे दहापंधराजण जमले होते, ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले.

 

प्र. ६. पाठाच्या आधारे लिहा.


(अ) चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा.

उत्तर:  

                    वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा ? आणि मग चहा करणार तरी कसा? वारली खरेदी करू शकत नाहीत; तर मग त्यांच्या ;परिसरात कोणता वाणी दुकान थाटील एक कप चहा प्यायचा असेल, तर तीन मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. याउलट, दरदिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील ह पदार्थ तरी घरी मिळू शकतात त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते. पण चहा करणे शक्यच नव्हते.

 

Padyavarcha Chaha swadhyay prashn uttare 8vi | Padyavarcha Chaha iyatta 8vi mrathi prashn uttare | Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf Iyatta 8vi mrathi swadhyay pdf


(आ) तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धततील फरक स्पष्ट करा.

उत्तर:  

                        वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्याच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या .  त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडण्यासारख्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर तीन मैलांवर अंतरावरील दुकानातून चहापूड  व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दुध काढले जाई. आमच्या घरी दरमहिन्याला सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात मिहिन्याभरासाठी लागणारी साखर चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दुध आणून देतो. यामुळे दरदिवशी सकाळ, संध्याकाळ चहा पिण्याचा कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते.

 

खेळूया शब्दांशी


(अ) जोड्या लावा.


अ’ गट

ब’ गट उत्तरे

(१) ब्रह्मांड आठवणे.

(ई) असाहाय्यतेतून भीती वाटणे.

(२) अठरा विश्वे दारिद्र्य असणे.

(अ) कायमची गरिबी असणे.

(३) निपचित पडणे.

(आ) शांत पडून राहणे.

(४) हुरहुर वाटणे.

(इ) अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता.


(आ) खालील नादानुकारी शब्द लिहा.

उदा., ढगांचा - गडगडाट

उत्तर:


(अ) कोंबड्यांचा - फडफडाट

(आ) पाखरांचाचिवचिवाट

(इ) पाण्याचाखळखळाट

 

(इ) खालील शब्दांसाठीचेविरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

(अ) गैरहजर × हजर

 (आ) उंच ×  ठेंगणी

(इ) भरभर × हळूहळू

(ई) अदृश्य× दृश्य

(उ) उशिरा × लवकर

 

खालील वाक्ये वाचा व तक्ता पूर्ण करा.

खालील तक्ता पाहण्यासाठी मोबाईल tilt करा ( आडवा धरा ) 


वाक्य

उपमेय

उपमान

साम्यवाचक

(अ) आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच.

आईचे प्रेम

सागर

जणू

(आ) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे.

देव

आभाळ

गत

(इ) त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे.

त्याचे अक्षर

मोती

सारखे

(ई) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

गुलाबी उषा

परमेश्वराचे प्रेम

जणू

 

**********


पाड्यावरचा चहा या धड्याचे प्रश्न उत्तर
पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी प्रश्न उत्तर
पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी मराठी पाठ दहावा
इयत्ता आठवी पाड्यावरचा चहा स्वाध्याय
इयत्ता ८वी  मराठी पाड्यावरचा चहा स्वाध्याय
इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf
इयत्ता आठवी विषय मराठी पाड्यावरचा चहा स्वाध्याय

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.