१८. जलदिंडी स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी | Jaldindi swadhyay iyatta aathavi mrathi.

Admin

इयत्ता आठवी मराठी जलदिंडी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Iyatta 8vi mrathi Jaldindi swadhya prashn uttare 

इयत्ता आठवी जलदिंडी स्वाध्याय | इयत्ता ८वी  मराठी  जलदिंडी स्वाध्याय \ इयत्ता आठवी विषय मराठी जलदिंडी स्वाध्याय \ Jaldindi swadhyay prashn uttare 8vi | Jaldindi iyatta 8vi mrathi prashn uttare


प्र. १. खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतींचे आहेत ते सांगा.

 

परिणाम

घटना/कृती

(अ) लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला.

१. लेखकांनी मुलाला भिन्नट म्हटले.

(आ) नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं.

२. पाण्यावर सर्व प्रकारची घाण पसरली हाती आणि ती घाण कुजून पाण्यावर एक प्रकारची काळी साय पसरली होती.

(इ) इतर लोक आपली घृणा विसरले.

३. डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सगळ्यांनी बाहेर काढला.

 

जलदिंडी  स्वाध्याय इयत्ता आठवी  जलदिंडी  या धड्याचे प्रश्न उत्तर  जलदिंडी  इयत्ता आठवी प्रश्न उत्तर  जलदिंडी  इयत्ता आठवी मराठी पाठ सतरावा  इयत्ता आठवी जलदिंडी स्वाध्याय  इयत्ता ८वी  मराठी  जलदिंडी स्वाध्याय  इयत्ता आठवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता आठवी विषय मराठी जलदिंडी स्वाध्याय  Jaldindi swadhyay prashn uttare 8vi  Jaldindi iyatta 8vi mrathi prashn uttare  Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf  Iyatta 8vi mrathi swadhyay pdf  Iyatta 8vi vishy Marathi Jaldindi swadhyay


प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.

 

उत्तर:

पाण्यातील प्रदूषित घटक

१. प्लास्टिक पिशव्या

२.वाढलेली जलपर्णी

३. काळे पडलेले खडक

४. दलदल झालेली काठावरील माती.

 

प्र. ३. लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा.

उत्तर:

1.नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा वनराईसाठी राखणे.

2. सांडपाणी शुद्ध होऊन मिळालेले पाणी झाडाझुडपांना देणे.

3. ते पाणी झाडांसाठी खतपाणी होते, त्यामुळे झाडे फोफावतात.

4.नदीपात्रातून येत शहरात शुद्ध हवा पसरणे.


  हे सुद्धा पहा: 



प्र. ४. पालखीसोहळा या शब्दातील अक्षरांपासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उत्तर:

1.पाल

2.लळा

3.खिळा

4.सोळा


Jaldindi iyatta 8vi mrathi prashn uttare | Iyatta 8vi Marathi swadhyay prashn uttare pdf | Iyatta 8vi mrathi swadhyay pdf | Iyatta 8vi vishy Marathi Jaldindi swadhyay


प्र. ५. स्वमत लिहा.


(अ) नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.

उत्तर:

           पाऊस जर अतिप्रमाणात पडत असेल तर जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते . नद्या त्यांच्या मर्यादेच्या पातळीपेक्षा वर जाऊन जमिनीवरील धूळ , घाण , कचरा , टाकाऊ पदार्थ पाण्यात जाऊन नदीचे पाणी प्रदूषित होते.पुर ही नैसर्गिक परिस्थिती जलप्रदूषणाला कारणीभूत ठरते. भरघोस पीक येण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होऊ लागला . जास्त पिकाच्या हव्यासापोटी अधिकाधिक रासायनिक खते वापरली जाऊ लागली. खतांची अतिरिक्त मात्रा शेतात जमीनीवर पडते . ती पुन्हा पावसामुळे वाहून नदी - नाले यांना मिळते. नदीचे पाणी प्रदूषित होते . प्लॅस्टिक केरकचरा यांच्या जलाशयातील सरमिसळीमुळे जलप्रदूषण होतेच पण गणपती उत्सव , विविध गावातील यात्रा , जत्रा यामुळे देखील मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी प्रदूषित होते .

 

(आ) पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा.

उत्तर:

        आपल्या मुलाला हौसेने लेखकांनी नौका शिकवायला नेले. होडी चालू झाली आणि होडीचा वेग वाढला तेव्हा ती नौका हेलकावे खावू लागली. होडी पलटी होऊन आपण पडू की काय, असे त्या मुलाला वाटू लागले. या क्षणी तो मुलगा घाबरला. लेखकांना वाटले की तो पाण्यात बुडण्याला घाबरत नव्हता. लेखकांचा मुलगा पट्टीचा पोहणारा होता. खडकवासल धरणातही पोहण्याचा त्याला आत्मविश्वास होता.  मात्र या नदीचे पाणी प्रचंड घाण झालेले होते. येथे  नाना तऱ्हेचा कचरा केरकचरा, सांडपाणी, टाकाऊ पदार्थ, मलमुत्र मोठ्या प्रमाणावर पाण्यात सोडले गेले होते. अशा खराब पाण्यात कोणीही पोहणे टाळले असते. खराब पाण्यात पोहण्याची मुलाला किळस वाटली. त्या घाण पाण्याचा त्याला स्पर्श देखील नको होता. म्हणून पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली.

 

(इ) ‘जलदिंडी’मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा.

उत्तर:

                  जलदिंडी मध्ये सहभागी झाल्यास मी साफसफाईचे काम अत्यंत आवडीने करीन. मला साफसफाई करायला खुप आवडते. तसेच मला पोहता देखील येते. त्यामुळे नदीच्या पाण्यात काम करत असताना कोणता व्यक्ती बुडत असल्यास त्याला वाचवण्याचे काम मी उत्तम प्रकारे करु शकतो. जल दिंडीच्या वेळी गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यात मदत करेन. इत्यादी  कामे मी आवडीने करेन.

 

 

(ई) ‘स्वत:चे हात वापर की कचरा काढायला’ लेखकाच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.

उत्तर:

          आपण जी कामे दुसऱ्यांना करायला सांगतो ती कधीच वेळेवर पूर्ण होत नाहीत. आमच्या शाळेत वर्गात आल्यावर जर समोर कचरा पडलेला दिसला तर पाटिल सर स्वत: कचरा उचलायला सुरूवात करतात. मग वर्गातील सर्व मुलं कचरा उचलायला धावतात. अशा प्रकारे कोणालाही उपदेश न करता पाटिल सर  सर्व कामे करून घेतात. म्हणून लेखकांच्या आईचा उपदेश मला खूप पटतो. बोलण्यापेक्षा कृतीचा प्रभाव जास्त पडतो हेच खरे.

 

खेळूया शब्दांशी.


(अ) खालील वाक्यांतील काळ ओळखा.


(अ) जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल.

उत्तर: भविष्यकाळ

 

(आ) मदतीचा हात लगेच पुढे आला.

उत्तर: भूतकाळ

 

(इ) त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते.

उत्तर: भूतकाळ

 

(ई) पंढरपूरला लोक चालत जातात.

उत्तर: वर्तमानकाळ


जलदिंडी  मराठी स्वाध्याय | जलदिंडी  स्वाध्याय इयत्ता आठवी m| जलदिंडी  या धड्याचे प्रश्न उत्तर | जलदिंडी  इयत्ता आठवी प्रश्न उत्तर |जलदिंडी  इयत्ता आठवी मराठी पाठ सतरावा


(आ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.


(अ) पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का?

उत्तर:प्रश्नार्थी

 

(आ) पण एवढं मोठं कार्य!

उत्तर: उद्गारार्थी

 

(इ) त्यांना थकवा जाणवत नव्हता.

उत्तर: विधानार्थी

 

(ई) कचरा काढायला स्वत:चेच हात वाप

उत्तर: आज्ञार्थी


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

(१) भाजीपाला

उत्तर: भाजी, पाला वगैरे


(२) सुखदु:ख

उत्तर: सुख आणि दु:ख


(३) स्त्रीपुरुष

उत्तर: स्त्री आणि पुरूष


४) केरकचरा

उत्तर: केर, कचरा वगैरे


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.

 (१) नीरस

उत्तर: ज्यात रस उरला नाही तो.


(२) दशमुख

उत्तर: दहा मुखे आहेत असा तो


(३) निर्बल

उत्तर: निघून गेले आहे बळ ज्यातून तो.


(४) मूषकवाहन

उत्तर: मूषक ज्याचे वाहन आहे असा तो.

 

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(अ) चहापाणी

चहा, पाणी वगैरे

व्दंव्द

(आ) क्षणोक्षणी

प्रत्येक क्षणाला

अव्ययीभाव

(इ) त्रिभुवन

तीन भुवनांचा समूह

तत्पुरूष

(ई) गजान

ज्याचे आनन गजासारखे आहे असा तो

बहुव्रीही

 

**********

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.