12. मानवी स्नायू व पचनसंस्था प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Manavi Snaayu v Pachansanstha 7vi Vidnyan Swadhyay Prashn Uttare

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १२ मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय इयत्ता सातवी ७std science question answer in Marathi medium pdf
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Manavi Snaayu v Pachansanstha 


प्र.1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

अ. पचनाची क्रिया ............. पासून सुरू होते.

(जठर / मुख)

उत्तर: पचनाची क्रिया मुखा पासून सुरू होते.


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा बारावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १२ मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय इयत्ता सातवी  ७std science question answer in Marathi medium pdf


आ. पापण्यांमध्ये ............. प्रकारचे स्नायूअसतात.

(ऐच्छिक/अनैच्छिक)

उत्तर: पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायूअसतात.


इ. स्नायूसंस्थेचे ............. हे कार्य नाही.

(रक्तपेशी बनवणे / हालचाल करणे)

उत्तर: स्नायूसंस्थे चे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही.

 

ई. हृदयाचे स्नायू हे ............. असतात.

(सामान्य स्नायू / हृद स्नायू)

उत्तर: हृदयाचे स्नायू हे हृद स्नायू असतात.


उ. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे.............चे कार्य आहे.

(जठर / ग्रासनलिका)

उत्तर: बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिका चे कार्य आहे.

प्र.2. सांगा, माझी जोडी कोणाशी?

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तर)

1. हृद् स्नायू  

आ. आम्ही कधीच थकत नाही

2. स्नायूंमुळेच होतात

ई. जबड्याच्या चघळण्या च्या हालचाली

3. पेप्सिन

उ. जाठररसातील विकर

4. पेटके येणे

इ. स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन       

5. अस्थि स्नायू

अ. नेहमीच जोडीने कार्य करतात.


प्र.3. खोटे कोण बोलतोय?


अवयव

विधान

 

1. जीभ

माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात.

2. यकृत

मी शरीरातील सर्वांत  मोठी ग्रंथी आहे.

3. मोठे आतडे

माझी लांबी 7.5 मीटर आहे.

4. ॲपेंडिक्स

पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही.

5. फुफ्फुस

उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो.

 

1. जीभ : माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात.

उत्तर: जीभ खोटे बोलत आहे, कारण जीभ सर्व चवी ओळखू शकते.


2. यकृत : मी शरीरातील सर्वांत  मोठी ग्रंथी आहे.

उत्तर: यकृत खरे बोलत आहे.


3. मोठे आतडे: माझी लांबी 7.5 मीटर आहे.

उत्तर: मोठे आतडे खोटे बोलत आहे कारण त्याची लांबी १.५ मीटर आहे.


4. ॲपेंडिक्स: पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही.

उत्तर: अपेंडिक्स खोटे बोलत आहे, कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करीत नाही.


5. फुफ्फुस: उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो.

उत्तर: फुफ्फुस खोटे बोलत आहे, फुफ्फुसाचा उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो परंतु वृक्क इतका नाही.


प्र.4. कारणे लिहा.


अ. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.

उत्तर:

        जठराच्या भित्तिकेत जाठरग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.


आ. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छि क स्नायू म्हणतात.

उत्तर:

        हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते. म्हणून हृदयाच्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात.


इ. मादक पदार्थांचे सेवन करू नये.

उत्तर:

        मादक पदार्थांचे सेवन केल्याने कंसर सारख्या भयानक रोगाला आमंत्रण मिळते.  शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे काम मादक पदार्थांमुळे बिघडू शकते. म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये.


ई. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्य प्रवण हवेत.

उत्तर:

        आपल्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण नसल्यास, आपल्या शरीरामध्ये वेदना आणि व्याधी सुरु होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण हवेत.


प्र.5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते?

उत्तर:

        स्नायू मुख्यतः तीन प्रकारचे असतात.

१)   अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू

२)   हृदयाचे स्नायू

३)   मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू.


आ. आम्लपित्त का होते? त्या चा शरीरावर काय परिणाम होतो?

उत्तर:

        पित्त एच. पायलोरी जीवाणूच्या संक्रमणाने होते, तसेच तणाव, तिखट व मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे आम्लपित्त होते.

शरीरावरील  परिणाम :  आम्लपित्त वाढले की डोके दुखते, अंगावर पुरळ उठते, छातीत जळजळ होते.


इ. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे?

उत्तर:

        पटाशीचे दात, सुळे, दाढा आणी उपदाढा हे दातांचे प्रमुख चार प्रकार आहेत.

कार्य : पटाशीचे दात तुकडा मोडण्यासाठी किंवा एखाद्या वस्तू सोलण्यासाठी उपयोगात येतात.

सुळ्यांचा उपयोग भक्षाची शिकार करण्यासाठी होतो.

दाढा आणि उपदाढा यांचा उपयोग चर्वण करण्यसाठी होतो.


प्र.6. पचनसंस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

१) अन्नाचा घास तोंडात घेल्यावर अन्नपचनाची सुरुवात होते. तोंडात अन्नाचे बारीक बारीक तुकडे केले जाते.अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते.

२) तोंडात चावून बारीक केलेले अन्न घशामध्ये असणाऱ्या अन्ननलिकेमध्ये जिभेच्या सहाय्याने ढकलले जाते.

३) ग्रासिकेच्या माध्यमातून अन्न पुढे जठरामध्ये प्रवेश करते. जठरामध्ये जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्त्रावतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्यूकस (श्लेष्म) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते.

४) खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते.

५) लहान आतड्यात यकृताने स्रवलेला पित्तरस लहान आतड्यात पोहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते.

६) लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

७) लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो.

८)पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा बारावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.