16. कोळीण स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मराठी | Kolin swadhyay prashn uttare iyatta satavi marathi

Kolin swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी कोळीण स्वाध्यय प्रश्न उत्तरे


प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.


कोळिणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती

उत्तर:

१)   दूर डोंगराकडे गाडी वळवली.

२)   पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले.

३)   वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले.

४)   छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन गेले.

५)   सुकलेले गवत बाजूला सारले.

६)   एका दगडावर स्तब्ध बसले.


Kolin swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी कोळीण  स्वाध्यय प्रश्न उत्तरे कोळीण  स्वाध्याय ७वी मराठी 7 vi Marathi Kolin swadhyay


प्र. २. असे का घडले ते लिहा.

(अ) लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले.

उत्तर:

        लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले, पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधुक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खुण केली होती, ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले.

 

(आ) लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.

उत्तर:

        लेखकांना रातीच्या वेळी कोळीण कार्यरत असते, त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळीणीच्या घरट्याच्या दरवाज्याची कमान दिसली, त्यांच्या पायालागत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले; म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.

 

(इ) लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.

उत्तर:

        लेखकांनी चाकूच्या पत्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीणीच्या घरट्याचे दर उघडले होते परंतु कोळीणीने इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले.

 

(ई) कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.

उत्तर:

        कोळीणीने जर  आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते; म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.

 

प्र. ३. खालील घटनांचे परिणाम लिहा.


घटना

परिणाम

(अ) लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं.

घरट्याचे दार किंचित उघडले आणि लेखकास भेगेतून आत पाहता आले.

(आ) पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला.

जमीन थोडी ओलसर आले.

(इ) कोळिणीच्या माघारी दार बंद होणे.

कोळीणीचा मृत्यूच

(ई) कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज आला

ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली.

 

प्र. ४. आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा.

 

कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये

· घरट्याचे ठिकाण : कोळीणीच्या घरट्याचे ठिकाण हे डोंगरमाथ्यावर असते. ते जवळजवळ एक फुट खोलवर असते.
·   घरट्याचे दार : कोळीणीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते.
·    दाराला दिलेली उपमा : बाटलीच्या बुचाची उपमा दाराला दिलेली आहे.
·  दाराची विशेष रचना : कोळीणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते. ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही ते बाहेरून कोलीणीला उघडता येत नाही.
·   घरट्याचे महत्व  : कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की, ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते घरट्याचे दार आतून घट्ट  लागते.

 

प्र. ५. तुम्हांला पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत. ती खालील चौकटींतलिहा.

उत्तर:

सुगरण : घरटे

साप : वारूळ

वाघ : गुहा

गाय : गोठा

घोडा : तबेला


खेळूया शब्दांशी.

 

खालील वाक्प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा.


(अ) प्रतीक्षा करणे

वाटेने जाणे.

वाट बघणे.

वाट लावणे.

उत्तर: वाट बघणे.


(आ) पारखा होणे

वंचित होणे.

दुरून बघणे.

दु:स्वास करणे.

उत्तर: वंचित होणे.


(इ) पारध होणे

भक्ष्य शोधणे.

भक्ष्य होणे.

शिकार होणे

उत्तर: शिकार होणे


कोळीण स्वाध्याय ७वी मराठी
7 vi Marathi Kolin swadhyay


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.