Dhonda swadhyay iyatta satavi marathi | इयत्ता सातवी विषय मराठी धोंडा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. खालील आकृत्या पूर्ण करा.
(अ) राजूचे गुणविशेष 
१)अतिशय
चलाख 
२)चाणाक्ष 
३)जिज्ञासू 
४)हुशार 
५)चौकस
बुद्धीचा 
(अ) राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये
१)गुळगुळीत,
खरखरीत, फुगीर व जड 
२)अंगातून
विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा 
३)प्रखर
प्रकाशकिरण बाहेर फेकणारा 
४)फेकल्यावर
उड्या मारत जाणारा 
५)हिरयासारखा
चमकणारा 
(इ) शास्त्रज्ञ डॉ. पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती
१) धोंडा हा
परग्रहावरील सजीव प्राणी आहे. 
२) मानवापेक्षा
कित्येक पटींनी तो बुद्धिमान असतो. 
३)
साजीवांबरोबर तो निर्जीव वस्तू देखील गिळू शकतो. 
४) प्रजननक्षमता
असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो.
५)
अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत.
प्र. २. हे केव्हा घडले ते लिहा.
(अ) राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.
उत्तर: गुळगुळीत
नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा
उड्या मारत गेला, हे जेव्हा घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्यची गंम्मत वाटली.
(आ) प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.
उत्तर: 
        मध्यरात्र झाली होती. राजूने जिथे तो धोंडा
ठेवला होता तो ड्रॉवर उघडला. ड्रॉवर उघडताच ती खोली प्रकाशाने  झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत
होता. त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्यावेळी त्या
प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते. 
(इ) राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
उत्तर: 
        धोंड्यापासून एका लहान धोंड्यची निर्मिती
झाली, हे राजूने पाहिले. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते नंतर हळूहळू धोंड्याचा
प्रकाश लुप्त होऊ लागला असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. 
प्र. ३.
चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे
वर्णन तुमच्या शब्दांत  लिहा.
उत्तर: 
        राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर त्याचं
कुतूहल जागृत झालं होत. मध्यरात्री तो गडबडून उठला. प्रखर प्रकाशातही आईबाबा
झोपलेले पाहून तो गांगरला होता. प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला होता.
त्या धोंड्यापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झालेली पाहून तो घाबरला होता. लहान
धोंड्याची हालचाल पाहून राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. सकाळी हे दोन धोंडे पाहून
त्याचं हृदय धडधडलं. अशी राजूची मनःस्थिती झाली होती. 
प्र. ४. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा.
उत्तर:
१) राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला.
२) राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला.
३) रात्री दोन्ही धोंडे चमकत होते.
४) राजू शाळेत गेला. त्याने डॉ. घोटे यांचे व्याख्यान ऐकले.
५) राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठींबा मिळाला.
६) राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉ अनिल घोटे यांना दिले.
प्र. ५.
चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा.
उत्तर: चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात कारण हेच गुण वैज्ञानिक शोधांची जननी आहेत.
खेळूया
शब्दांशी 
कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा.
(करडा, विचारशृंखला, अस्वस्थता,
घालमेल)
(अ) लेखकांची........................ तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला.
उत्तर: लेखकांची
विचारशृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला.
(आ) शिक्षकांचा ........................ कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत
बसले.
उत्तर: शिक्षकांचा
करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले.
(इ) वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड...................
होत होती.
उत्तर: वार्षिक
परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत
होती.
(ई) रामरावांची ...................... बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात
भरती केले गेले.
उत्तर: रामरावांची
अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले.
खेळ
खेळूया 
खाली
दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.
| 
   अ  | 
  
   णा  | 
  
   श  | 
  
   त्या  | 
 
| 
   का  | 
  
   ति  | 
  
   चा  | 
  
   ल  | 
 
| 
   हा  | 
  
   मा  | 
  
   बै  | 
  
   रि  | 
 
उत्तर : अति
शहाणा त्याचा बैल रिकामा . 
| 
   ए   | 
  
   भा   | 
  
   ना   | 
  
   ध  | 
 
| 
   रा   | 
  
   क   | 
  
   ड   | 
  
   ध्या  | 
 
| 
   भ   | 
  
   चिं   | 
  
   र  | 
  
   | 
 
उत्तर: एक ना
धड भराभर चिंध्या 
| 
   ऐ   | 
  
   ज   | 
  
   चे   | 
  
   क  | 
 
| 
   ना   | 
  
   का   | 
  
   वे   | 
  
   ना  | 
 
| 
   म   | 
  
   मा  | 
  
   वे   | 
  
   चे  | 
 
उत्तर :
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
