१४. मिठाचा शोध स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Mithacha Shodh Swadhyay 4th Marathi

4th standard Marathi Mithacha Shodh question answers | मिठाचा शोध स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे ?

उत्तर: पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे.


(आ) आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले ?

उत्तर: हरिणे ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असलेल्या दगडांना चाटतात, या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले.

 

(इ) खनिज मिठाला आपण काय म्हणतो ?

उत्तर: खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असे म्हणतो.

 

(ई) माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले ?

उत्तर: माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एका खड्ड्यात साठवले.

 


प्र. २. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.


(अ) बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं........ केलं. त्याला खूप.........वाटलं.

उत्तर: बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण  केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं.

 

(आ) कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा..........चाटू लागला.

उत्तर: कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला.

 

(इ) त्याल दिसली एक वेगळ्या प्रकारची..........

उत्तर: त्याल दिसली एक वेगळ्या प्रकारची माती  .

 

(ई) ते पाणी त्याच्या .............नेणही त्याला शक्य होत नव्हतं.

उत्तर: ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणही त्याला शक्य होत नव्हतं.


इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी मिठाचा शोध स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मिठाचा शोध


प्र.३. का ते सांगा.


(अ) आदिमानवाने दगड चाटून पहिला.

उत्तर: काही हरणे एका झाडाच्या बुंध्याशी असलेला दगड चाटताना आदिमानवाने पहिले; म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पहिला.

 

(आ) समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.

उत्तर: आदिमानाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले.

 

(इ) समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला.

उत्तर: समुद्रकिनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला; कारण त्याला समुद्राचे पाणी त्यात साठवायचे होते.

 

प्र. ४. तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा.

उत्तर:

 

कच्चे खाल्लेले पदार्थ

भाजून खाल्लेले पदार्थ

शिजवून खाल्लेले पदार्थ

गाजर, मुळा, बीट, काकडी.

भाकरी, पापड, शेंगा.

कोबी, बटाटा, पालेभाज्या, वांगे.

 

प्र. ५. कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते, याविषयी माहिती मिळवा.

उत्तर:

        गाजर, बीट, मुळा, काकडी यांसारखे पदार्थ कच्चे खावेत. कच्च्या आहारात भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे शरीरात योग्य पोषण मिळण्यास मदत होते. खाद्य पदार्थ भाजल्याने, शिजवल्याने, उकडल्याने त्यातील पोषक तत्वांचा काही प्रमाणावर नाश होतो. यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आहारामध्ये कच्चे अन्नपदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे.

 

प्र. ६. हा खेळ खेळा. डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा. नाकाने वास घ्या. पदार्थ ओळखा. त्यांची चव कशी असते ते लिहा. उदा., मिरची - तिखट.

उत्तर:

मीठ – खारट

कारले – कडू

मसाला – तिखट

चिंच  – आंबट

आवळा – तुरट

Mithacha Shodh 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare


प्र. ७. समानार्थी शब्द लिहा.


(अ) जंगल = वन

(आ) झाड =  वृक्ष, तरु.

(इ) लांब =  दूर

(ई) दिवस = दिन

(उ) समुद्र = सागर

(ऊ) पाणी = उदक, जल.


प्र. ८. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.


(अ) निरीक्षण करणे.

उत्तर: विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षकांनी निरीक्षण केले.

 

(आ) कुतूहल वाटणे.

उत्तर: अभयारण्यात कोणकोणत्या प्रकारे प्राणी पहायला मिळतील याचे राज ला कुतूहल वाटले.


(इ) अंगाला झोंबणे.

उत्तर: थंडीमध्ये गार वारा अंगाला झोंबतो.

 

प्र. ९. 'मीठ' या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक-एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा. त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा.


1) मिठाला जागणे

अर्थ : इमान व्यक्त करणे

वाक्य : राजू अखेरपर्यंत सरांजामेंच्या मिठाला जागला.


२) मिठाचा खडा पडणे

अर्थ: एखादे काम बिघडणे .

वाक्य: बस रस्त्यात बंद पडली आणि सहलीच्या आनंदात मिठाचा खडा पडला.


३) मिठाला महाग होणे :

अर्थ: अत्यंत दारिद्र्य येणे.

वाक्य: प्रचंड पुरामुळे गाव उध्वस्त झाले आणि जो तो मिठाला महाग झाला.


४) जखमेवर मीठ चोळणे.

अर्थ : दुःखात भर घालणे.

वाक्य : नापास झालेल्या राजूला वाईट बोलून रामू ने त्याच्या जखमेवर मीठ चोळले.

**********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.