17. प्रकाशाचे परिणाम प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Prakashache Parinaam Swadhyay Prashn Uttare ७vi

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १७ Prakashache Parinaam question answer in Marathi ७vi vidnyan Prakashache Parinaam swadhyay
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  प्रकाशाचे परिणाम स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Prakashache Parinaam


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १७ Prakashache Parinaam question answer in Marathi ७vi vidnyan Prakashache Parinaam swadhyay

प्र.1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


अ. रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास ............. व ............. या छाया पाहता येतात.

उत्तर: रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास प्रच्छाया  उपच्छाया. या छाया पाहता येतात.


आ. चंद्रग्रहणाच्या वेळी ............. ची सावली ............. वर पडते.

उत्तर: चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी ची सावली चंद्रा वर पडते.


इ. सूर्य ग्रहणाच्या वेळी .............ची सावली.............वर पडते.

उत्तर: सूर्य ग्रहणाच्या वेळी चंद्रा ची सावली पृथ्वी वर पडते.


ई. सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी .............मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.

उत्तर: सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी विकिरणा मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात.

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १७ | Prakashache Parinaam question answer in Marathi | ७vi vidnyan Prakashache Parinaam swadhyay

प्र.2. कारणे लिहा.

अ. पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.

उत्तर:

        पृथ्वीच्या वातावरणापलीकडे निर्वात पोकळी असल्यामुळे तेथे सूर्यप्रकाशाचे विकिरण होण्यासाठी कोणतेही प्रभावी मध्यम नसते त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते.


आ. सावलीत बसून वाचता येते.

उत्तर:

        सूर्य हा विस्तारित प्रकाशस्त्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रच्छाया नसून फिकट उपच्छाया असते. या सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो म्हणून सावलीत बसून वाचता येते.


इ. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये.

उत्तर:

          सूर्याची हानिकारक अतिनील किरणे सतत पृथ्वीवर येत असतात. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे तेज कमी झाले तरी अतिनील किरणे मात्र पृथ्वीवर येताच असतात. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यांत शिरून दृष्टीचे नुकसान होण्याचा धोका असतो म्हणून उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये.

 

प्र.3. प्रकाशाच्या विकिरणाची दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा.

उत्तर:

१) सूर्यास्त होण्याच्या वेलीचा तांबडा सूर्य

२) निळे आकाश.

३) सिनेमा प्रोजेक्टरमधून पडद्यावर पडणारा प्रकाशझोत.

४) धुक्यातून जाणाऱ्या गाडीचा प्रकाशझोत.

 

प्र.4. हवेत खूप उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांची/विमानांची छाया जमिनीवर का दिसत नाही?

उत्तर:

        सूर्य हा विस्तारित प्रकाशस्त्रोत पृथ्वीच्या तुलनेने आकारणे खूप मोठा आहे. त्यामुळे उंचावर उडणाऱ्या पक्ष्यांच्या/विमानांच्या प्रच्छाया ( गडद छाया) आणि उपच्छाया (फिकट छाया) अशा दोन छाया जमिनीवर पडतात. परंतु पक्षी / विमाने जसजसे उंच जातात तसतशी त्यांची प्रच्छाया लहान होत जावून ती शेवटी नाहीशी होते. याच वेळी उपच्छाया अधिकाधिक फिकट हौत दिसेनाशी होते. परिणामी पक्ष्यांची/ विमानांची छाया जमिनीवर दिसत नाही.

 

प्र.5. बिंदूस्रोतामुळे उपच्छाया का मिळत नाही?

उत्तर:

        बिंदूस्त्रोतातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे विकिरण होत नाही. त्यामुळे त्याच्यासमोर असलेल्या वस्तूची केवळ प्रच्छाया (गडद छाया मिळते) उपच्छाया मिळत नाही.

 

प्र.6. खालील प्रश्नां ची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय?

उत्तर:

      वातावरणातील रेणू, धुलीकण व इतर सूक्ष्म कण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेला ‘प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात.

     विकीरणामुळे विखुरलेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांत शिरतात व आपल्याला प्रकाश दिसतो.

     प्रकाशझोत, निळे आकाश, तांबडा सूर्य हे प्रकाशाच्या विकीरणाचे परिणाम आहेत.

 

आ. शून्यछाया स्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का?

उत्तर:

        शून्यछाया दिनाच्या दिवशी मध्यान्हाच्या वेळी सूर्य अचूक आपल्या माथ्यावर असतो. त्यामुळे हात – पाय न पसरता सरळ उभे राहिल्यास आपल्या शरीराची सावली थेट आपल्या पावलांच्या तळाखाली पडते. ही सावली आपल्या दृष्टीस पडत नसल्यामुळे लुप्त झाल्यासारखी वाटते.


इ. बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाशकिरण टाकल्यास तो दिसेल का?

उत्तर:

            लेझर प्रकार आपल्याला दिसण्यासाठी त्याचे विकिरण होणे गरजेचे असते. त्यासाठी हे किरण सूक्ष्म कणांवर आदळूण सर्वत्र विखुरले जाणे आवश्यक असते. बंद काचेच्या पेटीमध्ये धुपाचे सूक्ष्म कण विखुरलेले असतात. त्यामुळे लेझर किरण त्या सूक्ष्म कणांवर आदळूण विखुरतात व आपल्या डोळ्यांत शिरतात . त्यामुळे बंद काचेच्या पेटीत धूप लावून लेझर प्रकाशकिरण टाकल्यास तो आपल्याला दिसेल.

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा सतरावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf | प्रकाशाचे परिणाम स्वाध्याय इयत्ता सातवी

प्र.7. चर्चा करा व लिहा.


‘अ. ‘सूर्य उगवलाच नाही तर’, यावर तुमच्या शब्दांत विज्ञानावर आधारित परिच्छेद लिहा.

उत्तर:

१) सूर्य उगवला नाही तर आपल्याला प्रकाश मिळणार नाही. सर्वत्र कायम रात्र अनुभवास येईल. आपल्याला सतत कृत्रिम प्रकाशस्त्रोतांचा वापर करावा लागेल, जो करणे शक्य नाही.

२) सूर्यग्रहण, शून्यछाया, इंद्रधनुष्य, आकाशातील विलोभनीय रंग छटा इत्यादी घटना दिसणार नाहीत.

३) सूर्य उगवला नाही तर पृथ्वीवरचे तापमान अत्यंत कमी होईल. परिणामी पृथ्वीवरील द्रवरूप पाणी गोठून त्याचे बर्फात रुपांतर होईल.

४) सूर्यप्रकाशाअभावी प्रकाश-संश्लेषण न झाल्यामुळे वनस्पतीसृष्टीच्या वाढीवर दुष्परिणाम होईल. अन्नासाठी या वनस्पतींवर अवलंबून असणारी प्राणीसृष्टी नष्ट होईल. या प्राण्यांवर जगणाऱ्या इतर प्राण्यांचेही अस्तित्व देखील संपुष्टात येईल.

५) सौर उर्जेचा वापर करता येणार नाही.

 

आ. ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल?

उत्तर:

ग्रहणांबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही पुढील प्रयत्न करू:

१)    विविध प्रसारमाध्यमाच्या आधारे ग्रहणांबाबत शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहचवू.

२)  नजीकच्या काळात ग्रहण लागणार असेल तर जाहिरातीचा वापर करू त्याची प्रसिद्धी करू .

३) विशिष्ट चष्मे, टेलिस्कोप यांसारख्या साधनाच्या आधारे लोकांना प्रत्यक्ष ग्रहण पाहण्याचा अनुभव देऊ.

४) आपल्यापासून दूर असलेल्या प्रदेशातील ग्रहणे पाहण्यासाठी सहली आयोजित करू.

५)  सूर्य, चंद्र, पृथ्वी यांची प्रतीकृती बनवून ग्रहण कसे लागते याबाबत लोकांना अधिक माहिती देऊ.


इ. विविध ग्रहणे व तेव्हाची स्थिती.

उत्तर:

१)    सूर्यग्रहण

सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र सरळ रेषेत येतो. त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.

 

२)  खग्राससूर्यग्रहण

चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते.

चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले आहे असे दिसते.

पृथ्वीवरील प्रच्छायेच्या भागात अंधार पसरतो.

 

३)    खंडग्रास सूर्यग्रहण

चंद्राची उपच्छाया पृथ्वीवरील ज्या भागात पडते तेथून दिसते.

चंद्राने सूर्यबिंब पूर्णपणे झाकलेले नसते.


४)     कंकणाकृती सूर्यग्रहण

चंद्राची प्रच्छाया पृथ्वीवरील अतिशय कमी भागात पडते तेथून दिसते.

चंद्राने सूर्यबिंबाचा परीघ वगळता सर्व भाग झाकलेला आहे असे दिसते.

सूर्यबिंबाचा परीघ प्रकाशाने उजळलेल्या बांगडीसारखा दिसतो.


५)     चंद्रग्रहण

सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळरेषेत येते. यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते.


६)   खग्रास चंद्रग्रहण

चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या प्रच्छायेत असतो.


७)      खंडग्रास चंद्रग्रहण

चंद्र हा अंशतः पृथ्वीच्या प्रच्छायेत असतो.

 

प्र.8. फरक स्पष्ट करा.

अ. प्रकाशाचे बिंदुस्रोत व विस्तारित स्रोत

उत्तर:


बिंदुस्रोत

विस्तारित स्रोत

१.बिंदूस्त्रोत हा आकाराने सूक्ष्म असतो.

१. विस्तारित स्रोत हा आकाराने मोठा असतो.

२. बिंदूस्त्रोतापासून वस्तूची केवळ एकच छाया ( प्रच्छाया) मिळते. 

विस्तारित स्त्रोतापासून वस्तूच्या दोन छाया ( प्रच्छाया आणि उपच्छाया ) मिळतात. 

३.उदा.: छिद्रातून बाहेर पडणारा प्रकाश, लेझर.

३. उदा.: सूर्य.

 

आ. प्रच्छाया व उपच्छाया

उत्तर:


प्रच्छाया

उपच्छाया

१. प्रच्छाया गडद असते.

१. प्रच्छाया फिकट असते.

२. प्रच्छाया बिंदू स्त्रोत, तसेच विसातरीत स्त्रोतापासून मिळते.

२. उपच्छाया फक्त विस्तारित स्त्रोतापासून मिळते.

३. प्रच्छायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते.

३. उपच्छायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते.

*********

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.