२४. थोर हुतात्मे स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Thor Hutatme Swadhyay 4th Marathi

4th standard Marathi Thor Hutatme questions answers | थोर हुतात्मे स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ?

उत्तर: ‘इन्किलाब झिंदाबाद’ च्या घोषणा लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर देत आहोते.

 

(आ) १९२८ साली लाहोरमध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली ?

उत्तर: १९२८ साली लाहोरमध्ये ‘सायमन कमिशन’ च्या विरोधात निदर्शने झाली.

 

थोर हुतात्मे स्वाध्याय प्रश्न उत्तरे  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.  4th standard Marathi Thor Hutatme answers  Thor Hutatme 4th class question answers

(इ) भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयांत उच्च शिक्षण घेतले ?

उत्तर: भगतसिंगांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो – वेदिक महाविद्यालय व नॅशनल  कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले.

 

(ई) ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले ?

उत्तर: किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीची योजना केल्यामुळे ब्रिटीश सरकारने सुखदेव यांना धमकावले.

 

(उ) कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवांनी 'नौजवान भारत सभा' स्थापन केली ?

उत्तर: कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी 'नौजवान भारत सभा' स्थापन केली

 

प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ) पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय काय केले ?

उत्तर: पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंग कानपूर सोडून दिल्लीला गेले. तेथे, ‘अर्जुन’ साप्ताहिकात बलवंत सिंग या नावाने काम करू लागले. तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवल्यामुळे ते लाहोरला आले व मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले.

 

(आ) 'नौजवान भारत सभा' या संघटनेचे कार्यक्रम कोणकोणते होते ?

उत्तर:

        स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना तयार करणे, तर्कसांगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे, जातीयतेविरुद्ध लढणे व अस्पृशतेची पद्धत बंद करणे, हे नौजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम होते.

 

(इ) बनारसच्या वास्तव्यात राजगुरू यांनी काय काय केले ?

उत्तर:

        संस्कृत शिकण्यासाठी राजगुरू बनारसला गेले. तेथे त्यांनी न्यायशास्त्रातील पदवी मिळवली व इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदी व उर्दू या भाषा अवगत केल्या. तसेच काही काळ त्यांनी कॉंग्रेस सेवादलात कार्य केले. बनारसच्या वास्तव्यात ते चंद्रशेखर आसद, सचिंद्रनाथ सन्याल वगैरे नेत्यांच्या हिंदुस्थान सोसॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये दाखल आले व क्रांतीकार्यात सक्रीय भाग घेतला.


इयत्ता चौथी थोर हुतात्मे स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा थोर हुतात्मे


प्र. ३. जोड्या जुळवा.


'' गट

'' गट (उत्तर)

(१) राजगुरू

(इ) खेड

(२) भगतसिंग

(ई) बंग

(३) सुखदेव

(अ) चौराबाजार

(४) प्रताप वृत्तपत्र

(आ) कानपूर


प्र. ४. खालील उत्तरे येतील असे योग्य प्रश्न तयार करा. एकाच उत्तरासाठी एकापेक्षा जास्त प्रश्न तयार होऊ शकतात.


(अ) लाहोरप्रमाणे दिल्ली हेदेखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झाले.

उत्तर:

१) लाहोरप्रमाणे भारतीयांच्या असंतोषाचे दुसर केंद्र कोणते?

२) लाहोरप्रमाणे दिल्ली हेदेखील कशाचे केंद्र होते.

 

(आ) राजगुरू काही काळ काँग्रेस सेवादलात देखील होते.

उत्तर:

१) राजगुरू हे काही काळ कोणत्या सेवादलात होते?

२) काही काळ कॉंग्रेस सेवादलात होण होते?

 

(इ) लाहोरमधील लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले.

उत्तर:

१) लाहोरमधील लाठीमारात कोण जखमी झाले?

२) लालालजपतराय कोणत्या घटनेट जखमी झाले?

 

(ई) सुखदेव यांनी 'नौजवान भारत सभा' स्थापन केली.

उत्तर:

१) सुखदेव यांनी कोणती संघटना सथापन केली?

२) ‘नौजवान भारत सभा’ कोणी स्थापन केली?


Thor Hutatme 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare


प्र. ५. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा.

 

(अ) बाळकडू मिळणे.

उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या घराण्यातच देशभक्तीचे बाळकडू मिळाले होते.

 

(आ) सुगावा लागणे.

उत्तर: पोलिसांना चोराचा फरार चोराचा सुगावा लागला.

 

(इ) पाळत ठेवणे.

उत्तर: प्राणी शेतीचे नुकसान करू नयेत म्हणून शेतकऱ्याने शेतावर पाळत ठेवली.

 

(ई) दीक्षा मिळणे.

उत्तर: एकलव्याला द्रोणाचार्यांच्या मूर्तीमधून धनुर्धारी विद्येची शिक्षा मिळाली.

 

(उ) निर्धार करणे.

उत्तर: राजूने वर्गात पहिला येण्याचा निर्धार केला.

 

(ऊ) भूमिगत होणे.

उत्तर: पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरांची टोळी भूमिगत झाली.

 

प्र. ६. राजगुरू यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मगावाचे म्हणजे 'खेड' चे नाव बदलून 'राजगुरूनगर' करण्यात आले आहे. शिक्षकांशी, पालकांशी चर्चा करून तुमच्या माहितीतल्या अशा नावे बदललेल्या गावांची यादी करा.

उत्तर:

 



प्र. ७. खालील शब्दांना 'कारक' प्रत्यय लावून शब्द बनवा. त्यांचा अर्थ शोधा. असे आणखी शब्द शोधा व लिहा.

(अ) अन्याय = अन्यायकारक  अर्थ : जुलमी

(आ) बंधन =  बंधनकारक अर्थ : मनाई  

(इ) सुख =  सुखकारक अर्थ : आनंद देणारे

(ई) अपाय  = अपायकारक  अर्थ : इजा करणारे.

 

**********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.