२३.संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Sansargajanya rog aani rogpratibandh swadhyay prashn uttare 5vi

पाचवी परिसर अभ्यास भाग 1 संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1
Admin

२३.संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय प्रश्न उत्तरे

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय - संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय

१.    काय करावे बरे
(अ) खूप भूक लागली आहे ; परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत .

उत्तर:     जर खूप भूक लागली असेल आणि अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले असतील तर ते अन्नपदार्थ खाऊ नयेत. कारण उघड्यावरील अन्नपदार्थांवर माश्या, धूळ आणि इतर प्रकारचा सूक्ष्म कचरा बसलेला असतो. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांवर रोगजंतू असण्याचे प्रमाण अधिक असते. जर असे उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले तर आपले पोट बिघडेल आपण आजारी पडू शकतो म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत.

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध स्वाध्याय संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Sansargajanya rog aani rogpratibandh  questions and answers Sansargjanya rog aani rogpratibandha   prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay


२.   जरा डोके चालवा .

डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे , पाणी साचू न देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता ? का ?

उत्तर:     डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटक नाशकांमध्ये असणारी घातक द्रव्ये पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल.

३.   पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा .


(अ)        संसर्गजन्य रोग म्हणजे काय ?

उत्तर: एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात.


(आ)     रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत ?

 उत्तर: हवा, पाणी, अन्नपदार्थ , कीटक , संपर्क इत्यादी रोगप्रसाराची माध्यमे आहेत


(इ)   रोगाची साथ येते तेव्हा काय होते ?

उत्तर: रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एका रोगाची लागण होते.


(ई)   लसीकरण म्हणजे काय?

उत्तर: एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शन द्वारे किंवा तोंडावाटे जी लस दिली जाते त्याला लसीकरण असे म्हणतात.


(उ) नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा.

उत्तर: नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसी.

१)    घटसर्प

२)   डांग्या खोकला

३)   धनुर्वात

४) पोलिओ इत्यादी.


४. पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा .


(अ) आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो .

उत्तर: चूक


(आ) काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात .

उत्तर: चूक

Parisar abhyas bhag 1 swadhya - Sansargajanya rog aani rogpratibandh  questions and answers - Sansargjanya rog aani rogpratibandha   prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay

४.  पुढे काही रोग दिले आहेत . त्यांचे अन्नातून प्रसार , पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा .

मलेरिया , टायफॉइड , कॉलरा , क्षय , कावीळ , गॅस्ट्रो , हगवण , घटसर्प

उत्तर:

हवेतून प्रसार

अन्नातून प्रसार

पाण्यातून प्रसार

क्षय

टायफॉईड

टायफॉईड

घटसर्प

कॉलरा

कॉलरा

 

हगवण

हगवण

 

कावीळ

कावीळ

 

गॅस्ट्रो

 

 

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

६ . कारणे दया .


(अ)        गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे .

उत्तर: कॉलरा या रोगाचा प्रसार दुषित पाण्यामुळे होतो. कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो. पाणी उकळून प्यायल्याने पाण्यातील कॉलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे.


(आ)     परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत .

उत्तर: परिसरात पण्याची डबकी असल्यास त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते. हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात. डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत.



स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.