प्रकाशातले तारे स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Prakashatale Tare swadhyay pdf
प्र.1.तुमच्या शब्दात सांगा
(अ) आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय?
उत्तर: आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे
खूप मोठा आनंद उपभोगणे होय.
(आ) तुम्हांला कशाची चिंता वाटते? त्या वेळी तुम्ही काय करता ?
उत्तर: मला परीक्षेची चिंता वाटते
तेव्हा मी अभ्यास करतो.
प्र. २. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) मुलांना कोण बोलवत आहे?
उत्तर: मुलांना फुलराणी बोलवत आहे.
(आ) कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे?
उत्तर: कवीने मुलांना आनंदाच्या
शिखरावर बसायला सांगितले.
(इ) मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा, असे कवीला वाटते?
उत्तर: मुलांच्या मनावर भारतबहुच्या
आदर्शाचा ठसा असावा आसे कवीला वाटते.
(ई) मुलांनी कशाची चिंता करू नये, असे कबीला वाटते?
उत्तर: मुलांनी उद्याची चिंता करू
नये असे कवीला वाटते.
(उ) मुलांना कोण खुणवत आहे?
उत्तर: मुलांना अरुण (सूर्य)
खुणावत आहे.
तिसरी मराठी प्रश्न उत्तर
प्रकाशातले तारे तुम्ही स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी
प्र. ३. खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खूश होता ते प्रत्येकी एकेका वाक्यात लिहा.
(अ) आई
उत्तर: आईने माझ्या आवडीचे जेवण
बनवले नाही तर मी तिच्यावर रुसतो.
(आ) बाबा
उत्तर: बाबांनी मला आवडीचा खाऊ दिला
कि मी त्यंच्यावर खुश होतो.
(इ) आजोबा
उत्तर: आजोबांनी मला बाहेर फिरायला
नेले नाही की मी त्यांच्यावर रुसतो.
(ई) आजी
उत्तर: आजीने मला झोपताना गोष्ट
सांगितली नाही की मी तिच्यावर रुसतो.
(उ) मित्र/मैत्रीण
उत्तर: मित्राने माझे काम ऐकले नाही
कि त्याच्यावर रुसतो.
(ऊ) शिक्षक/शिक्षिका
उत्तर: शिक्षकांनी मला शाबासकी दिल्यावर
मी त्यांच्यावर खुश होतो.
(ए) बहिण/भाऊ
उत्तर: माझ्या भावाने मला
चिडवले तर मी त्याच्यावर रुसतो.
(ऐ) पाळीव प्राणी
उत्तर: माझ्या घरातील मांजर माझ्याबरोबर
खेळले कि मी त्याच्यावर खुश होतो.
इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
प्र. ४. खालील गोष्टी घडल्यावर
तुम्हांला काय वाटते ?
(अ) बाबा बाहेरगावी गेले.
उत्तर: मी त्यांच्यावर रुसतो.
(आ) ताईने सुंदर पेन दिले.
उत्तर: मी तिच्यावर खुश होतो.
(इ) शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही.
उत्तर: मला रडायला येते.
(ई) रस्त्यात पाय घसरून पडलात.
उत्तर: मला रडायला येते.
(उ) तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला.
उत्तर: मला आनंद होतो.
Prakashatale Tare Tumhi swadhyay Prakashatale Tare Tumhi Questions & Answers
प्र. ५. शेवटी समान अक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा.
उदा., फुलराणी - पाणी.
(अ) बसा
उत्तर: हसा
(आ) गुंता
उत्तर : चिंता.
प्र. ६. खालील शब्द वाचा. लिहा.
कार्य, धैर्य, सूर्य, शौर्य, नर्मदा, पर्यंत, पर्यावरण, सर्व, धर्म, आदर्श.
उत्तर: कार्य, धैर्य, सूर्य, शौर्य, नर्मदा, पर्यंत, पर्यावरण, सर्व, धर्म, आदर्श.
3ri marathi Prakashatale Tare Tumhi
iyatta tisri marathi swadhyay
प्र. ७. खालील शब्दांतील अक्षरांपासून शब्द तयार करा.
उदा., भारत - भार, भात, तर.
(अ) शिखरावर
उत्तर: शिखर, वर, खरा, राव, राख,
शिरा, शीख.
(आ) अंधारावर
उत्तर: वर, राव, धारा, धार.
(इ) आकाशात
उत्तर: आत , कात.
(ई) पाऊसधारा
उत्तर: पाऊस,धारा, रास, राधा.
प्र. ८. तुमच्या शाळेत ज्या थोर
व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत, त्यांनी देशासाठी काय केले याची माहिती शिक्षकांकडून
करून घ्या. त्यांपैकी एकाची माहिती पाच ते सात वाक्यांत लिहा.
उत्तर:
शाळेत छायाचित्रे असलेले थोर व्यक्ती
:
छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, महात्मा फुले, संत गाडगेबाबा,
सुभाषचंद्र बोस, पं.जवाहरलाल नेहरू, झाशीची राणी.
महात्मा गांधी
1. महात्मा
गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो.
2. त्यांनी
अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढली.
3. चळवळींतून
लोकांना एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवला.
4. विदेशी
वस्त्रांचा बहिष्कार करून स्वदेशी वस्त्रांचा प्रचार केला.
5. खेड्यांमधील लोकांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा दिली.
6. ते
साधेपणाने जगले आणि जगासाठी आदर्श ठरले.