प्रवास कचऱ्याचा स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | EPravas Kacharyacha swadhyay pdf
प्र. १. तुमच्या घरातला कचरा
नीट पाहा. त्यात काय काय असते याची यादी करा. हा कचरा वेगवेगळा करायचा असेल, तर कसा कराल ? कोणता कचरा कोणत्या डब्यात जाईल ते
ठरवा. ज्या कचऱ्याविषयी ठरवता येणार नाही तो वेगळा ठेवा.
उत्तर:
घरातील कचऱ्याची यादी
1.
भाजीपाल्याचे साले
2.
फळांची साले, अंड्याचे टरफले
3.
जुन्या वह्या, कागद, वृत्तपत्रे
4.
प्लास्टिक पिशव्या, बाटल्या
5.
लोखंडी/टिनच्या डब्या
6.
काच बाटल्या / तुटलेली काच
7.
फेकलेले कपडे / जुनी चप्पल
8.
राख, धूळ, झाडलोटीतला कचरा
3ri marathi Pravas Kacharyacha
iyatta tisri marathi swadhyay
कचरा वेगळा करण्याची पद्धत
ओला कचरा (हिरवा डबा)
- भाजीपाल्याची साले
- फळांची साले
- अंड्याचे टरफले
- शिळं अन्न
सुका कचरा (निळा डबा)
- कागद, जुनी वह्या,
वृत्तपत्रे
- प्लास्टिक पिशव्या, बाटल्या
- लोखंडी/टिनचे डबे
- काच बाटल्या.
घातक/इतर कचरा (लाल डबा)
- तुटलेली काच
- जुनी चप्पल, कपडे
- बॅटऱ्या, बल्ब
- मेडिकल कचरा (गोळ्यांच्या पट्ट्या, सुया)
(वरील उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातील
कचऱ्याचे निरीक्षण करून लिहावे. या उत्तराचा संदर्भ घ्यावा.)
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf | तिसरी मराठी प्रश्न उत्तर
प्र. २. परिसर स्वच्छ करतो, तसे आपणही स्वच्छ राहायला हवे. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय
करता ते लिहा.
उत्तर:
मी स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी
करतो त्या गोष्टी :
1.
रोज सकाळी आणि रात्री दात घासतो.
2.
रोज अंगावर साबणाने अंघोळ करतो.
3.
नखं वाढली की वेळेवर कापतो.
4.
केस नीट विंचरतो आणि स्वच्छ ठेवतो.
5.
रोज स्वच्छ कपडे घालतो.
6.
जेवणाआधी आणि शौचालयानंतर हात साबणाने
धुतो.
7.
घाम आल्यावर रुमालाने पुसतो.
8.
शाळेतून आल्यावर हातपाय धुतो.
9.
पायांना चप्पल/बूट वापरतो, धूळ-मातीपासून वाचण्यासाठी.
10.
आपले टॉवेल, कंगवा इतरांबरोबर वापरत नाही.
( तुम्ही अजून काही वेगळ्या गोष्टी करत असाल तर त्यांचा देखील समावेश करा.)
प्र. ३. खालील प्रसंग वाचा.
यांतील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत, पण स्वच्छता तर व्हायला हवी. ते काय करू शकतील, ते
सुचवा.
(अ) सुनीता मावशीकडे
राहायला आली होती. सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले, की तिचा
ब्रश ती घरीच विसरून आलीय. ती आता दात कसे स्वच्छ करेल ?
उत्तर: 1)सुनीता बोटावर थोडं
मीठ किंवा कोळसा लावून दात घासू शकते.
2) तसेच निमच्या काड्या वापरूनही
दात स्वच्छ करता येतात.
(आ) जमील अंघोळ करत
होता. दोन तांबे पाणी ओतले अन् त्याच्या लक्षात आले, की साबण
संपलेला आहे. आता जमीलला स्वच्छ होण्यासाठी काय करता येईल ?
उत्तर: जमीलने उपसलेल्या
पाण्याने अंग चांगले चोळून धुवावे.
(इ) रोहित सकाळी उठला.
संडासला जाऊन आला. हात धुवायला साबणच नव्हता. आता तो हात कसे स्वच्छ करेल ?
उत्तर:
1) रोहितने हात धुण्यासाठी कोमट
पाणी नीट वापरावे.
2) जवळ असेल तर राख, वाळू किंवा माती वापरून हात स्वच्छ करता येतात.
(ई) नखांमध्ये घाण साचून
राहते, म्हणून सरांनी नखे कापून यायला सांगितले होते;
पण अंबूच्या घरात नेलकटर नव्हते. तिला नखे कापण्यासाठी काय करावे
लागेल ?
उत्तर:
1) कात्रीने नखं कापून स्वच्छ
ठेवता येतात.
2) सावधान पूर्वक ब्लेड चा वापर
करावा.
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
*******