11. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Swachateche prasarak sant gadagebaba Swadhyay Tisari Marathi

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Swachateche prasarak sant gadagebaba swadhyay pdf
Admin

इयत्ता तिसरी मराठी स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Swachateche prasarak sant gadagebaba swadhyay pdf

 

Swachateche prasarak sant gadagebaba swadhyay  Swachateche prasarak sant gadagebaba  Questions & Answers 3ri marathi  Swachateche prasarak sant gadagebaba iyatta tisri marathi swadhyay

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

 

(अ) गाडगेमहाराजांचा जन्म कोठे झाला?

उत्तर: गाडगेमहाराजांचा जन्म व्हराडातील शेंडगाव येथे झाला.

 

(आ) डेबूला कशाची हौस होती?

उत्तर: डेबूला कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची हौस होती.

 

(इ) डेबूचा जीव का तुटत होता?

उत्तर: काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता.

 

(ई) गाडगेबाबांची देवपूजा कोणती?

उत्तर: रंजल्या-गांजल्यांची सेवा ही गाडगेबाबांची देवपूजा होय.

 

इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf

प्र. २. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

 

(अ) लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते?

उत्तर: कर्ज काढून सण साजरे करणे, व्यसनामुळे कर्जबाजरी होणे, रोगराई झाली तर औषध न देता देवाला नवस करणे, कोंबडे बकरे यांचे बळी देणे. हे लोकांचे वागणे डेबूला आवडत नव्हते.

 

(आ) गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले ?

उत्तर: चार चांगल्या गोष्टी आपण लोकांना सांगितल्या तर कुणी आपले ऐकत नाही. आई आपल्यासाठी कष्ट करते, म्हणून आपण तिचे ऐकतो. याचा विचार करून, आपण लोकांसाठी आतोनात कष्ट करायचे, म्हणजे लोक आपले ऐकतील व त्यांच्यात सुधारणा होईल, असे गाडगेबाबांनी मनाशी ठरवले.

 

(इ) गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे ?

उत्तर: ‘आपणच आपले भले केले पाहिजे. देव आपल्यातच आहे. त्या देवाला जागृत करा. असे गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना उपदेश करायचे.

 

(ई) गावात-वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे ?

उत्तर: ज्या गावी किंवा ज्या वस्तीत गाडगेबाबा जायचे; तेथे खराटे, फावडी, घमेले गोळा करायचे मग सर्व गाव झाडून काढायचे. शेणाने सारवून स्वच्छ करायचे.

 

तिसरी मराठी प्रश्न उत्तर
स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी

प्र. ३. खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्ये पूर्ण करा.

(पसार होणे, पायांखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, पर्वा न करणे)

 

(अ) लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून

उत्तर: लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पळ काढत.

 

(आ) सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर

उत्तर: सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायांखाली घातला.

 

(इ) आम्ही जवळ जाताच खारीने

उत्तर: आम्ही जवळ जाताच खार पसार झाली.

 

(ई) माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा

उत्तर: माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटत होता.

 

(उ) खेळताना मार लागला, तरी मुले

उत्तर: खेळताना मार लागला, तरी मुलांनी पर्वा केली नाही.

 

प्र. ४. वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या.

उदा., 'गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली.' हे उत्तर हवे आहे. मग प्रश्न कोणता विचारायचा ?

 

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा प्रश्न उत्तरे


(अ) गरीब, अनाथ, अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले ?

(आ) बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली ?

वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर तेच आहे, जे आपल्याला हवे होते. आता पुढील उत्तरे येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा.

 

(अ) काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता.

उत्तर:

अ)डेबुचा जीव का तुटत होता?

आ) काबाडकष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख, दारिद्रय पाहून डेबूला काय वाटत होते?

 

(आ) वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला.

उत्तर:

अ) वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला?

आ) वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी गाडगेबाबांनी काय केले?

 

(इ) बाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या.

उत्तर:

अ)बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या?

आ) बाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून काय बांधल्या?

 

(ई) गाडगेबाबांनी जात मानली नाही.

उत्तर:

अ) गाडगेबाबांनी काय मानली नाही?

आ) जात कोणी मानली नाही?

 

प्र. ५. विचार करा. सांगा. लिहा.

 

(अ) तुम्ही मनापासून करता ती कामे.

उत्तर: कचरा काढणे, अंथरुणाच्या घड्या घालणे, झाडांना पाणी घालणे, घराची स्वच्छता करणे.


(आ) कोणकोणती कामे तुम्हांला मनापासून करावीशी वाटत नाहीत ?

उत्तर: स्वतःचे कपडे धुणे.


(इ) तुमचे आई-वडील, शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत?

उत्तर: प्रामाणिकपणा, कष्टाळू, चपळता.

 

प्र. ६. या पाठात गाडगेबाबा कसे दिसतात याचे वर्णन आले आहे. ते वाचा. तुमची आई किंवा वडील कसे दिसतात याचे वर्णन करा.

उत्तर:

 

स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Swachateche prasarak sant gadagebaba swadhyay pdf






***********

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.