१०. प्राचीन भारत : सांस्कृतिक इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे | Prachin bharat sanskrutik 6th swadhyay rpashn uttare

 १०. प्राचीन भारत : सांस्कृतिक स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

प्राचीन भारत सांस्कृतिक  स्वाध्याय / प्राचीन भारत सांस्कृतिक  इयत्ता सहावी स्वाध्याय / प्राचीन भारत सांस्कृतिक  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / प्राचीन भारत सांस्कृतिक  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Prachin bharat sanskrutik  uttare eyattsahavi Prachin bharat sanskrutik  eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय

 

प्र. १. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१)            प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा.

उत्तर:

१)    तक्षशीला विद्यापीठ, विक्रमशीला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ इ.

 

(२)           कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे, त्याची यादी करा.

उत्तर:

२)   तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी एयादी प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे.

 

प्राचीन भारत सांस्कृतिक  स्वाध्याय प्राचीन भारत सांस्कृतिक  इयत्ता सहावी स्वाध्याय प्राचीन भारत सांस्कृतिक  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी प्राचीन भारत सांस्कृतिक  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Prachin bharat sanskrutik  uttare eyatta sahavi Prachin bharat sanskrutik  eyatta sahavi swadhyay

 १०. प्राचीन भारत : सांस्कृतिक इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे 


प्र.२. नावे लिहा.

प्राचीन भारतातील महाकाव्ये................

उत्तर: रामायण आणि महाभारत

 

प्र ३. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१)            रामायण हे महाकाव्य.........ऋषींनी रचले.

उत्तर:  वाल्मिकी

 

(२)           भारतीय वैद्यकशास्त्राला......असे म्हटले जाते.

उत्तर: आयुर्वेद


(३)           हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय.......विद्यापीठात होती.

उत्तर: नालंदा

 

प्र. ३. थोडक्यात उत्तरे लिहा.

(१)            तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा.

उत्तर:  

१)    तिपिटक म्हणजे  तीन पिटक .

२)   पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ ‘विभाग’ असा आहे.

३)   तिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे.

४) ‘सुत्तपिटक’, विनयपिटक’, ‘अभिधम्मपिटक’ यांचा समावेश तीपिटकात होतो.

 

(२)           भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे?

उत्तर:

१)    फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे, असा भगवदगीतेत संदेश दिला आहे.

 

(३)           आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?

उत्तर:

१)    भारतीय वैद्यकशास्त्रालाआयुर्वेद’ असे म्हटले जाते.

२)   आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे.

३)   आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे.

४) रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, याचाही विचार करण्यात आला आहे.

 

(४)          संघम साहित्य म्हणजे काय?

उत्तर:

१)    संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा

२)   या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संघम साहित्य म्हणून ओळखले जाते.


प्र. ४. चर्चा करा.

मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला.

उत्तर:

१)    मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला.

२)   सम्राट अशोकाने  ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत.

३)   सांची येथे असणारा स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित झाली आहे.

४) गुप्तकाळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला.

 

प्र.५. तुम्ही काय कराल?

(१)            आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर कराल?

उत्तर:

१)    भारतीय वैद्यकशास्त्राला ‘आयुर्वेद’ असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, याचाही विचार करण्यात आला आहे.

( या ठिकाणी विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींची माहिती लिहिणे अपेक्षित आहे.)

 

(२)           तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा.

उत्तर:

१)    सांची येथील स्तूप हा सम्राट अशोकाने बांधला आहे. पुढे शुंग व सातवाहन राजांनी या स्तूपाची पुन्हा बांधणी केली.  सांची येथील या स्तूपाच्या प्रवेशद्वारावर जातक कथा आणि गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांचे कोरीव काम केले आहेत. सांची येथील या स्तुपावर उत्कृष्ट शिल्पे प्रतिमा शून्ग्कालीन शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. हे स्तूप आज प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे स्तूप जागतिक वारसा मानले जाते.

 

प्र. ६. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचेनाव लिहीत आहे.

उत्तर:

            आम्ही सहलीला गेल्यावर त्या ठिकाणी माझा मित्र जर त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक स्थळावर आपले नाव लिहित असेल तर त्याला तशी कृती मी करू देणार नाही. ही स्मारके आणि वास्तू या आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहेत. त्यामुळे त्यांचे सौंदर्य कमी होऊ  न देणे हे आपले काम आहे. अशा प्रकारे मी त्याला समजावेन.

 

प्राचीन भारत सांस्कृतिक  स्वाध्याय
प्राचीन भारत सांस्कृतिक  इयत्ता सहावी स्वाध्याय
प्राचीन भारत सांस्कृतिक  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
प्राचीन भारत सांस्कृतिक  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Prachin bharat sanskrutik  uttare eyatta sahavi
Prachin bharat sanskrutik  eyatta sahavi swadhyay

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.