१. इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Itihasachi sadhane swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra .

इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Itihasachi sadhane swadhyay 7vi Itihasachi sadhane swadhyay prashn uttar
Admin

१. इतिहासाची साधने इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्रस्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय - पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - इयत्ता सातवी इतिहास गाईड

स्वाध्याय


प्र.१. खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा.

 

ता

दं

था

र्च

री

म्र

चि

त्रे

रि

डे

लो

ज्ञा

श्लो

लि

पो

वा

डे

गी

ते

शि

ला

ले

ते


उत्तर:

  • शिलालेख
  • पोवाडे
  • दंतकथा
  • चित्रे
  • ताम्रपट
  • लोकगीते
  • खलिते
  • तारीख
  • आज्ञापत्रे
  • कपडे
  • श्लोक
  • बखरी

इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास गाईड इतिहासाची साधने धडा पहिला स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Itihasachi sadhane swadhyay 7vi Itihasachi sadhane swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


२.     लिहिते व्हा.


(१) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ?

उत्तर:

समाधी, कबर, विरगळ, थडगे, विजयस्तंभ, विजयकमानी, इत्यादी बाबींचा समावेश स्माराकांमध्ये होतो.


(२) तवारिख म्हणजे काय ?

उत्तर:

काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे म्हणजे तावारीख होय.


(३) इतिहासलेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात?

उत्तर: लेखकांची चिकित्सक वृत्ती, त्यांचा नि:पक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू इतिहास लेखनात लेखकांचे महत्वाचे असतात.

Itihasachi sadhane swadhyay 7vi] - Itihasachi sadhane swadhyay prashn uttar

प्र. ३. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा.


(१) भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने

उत्तर: अलिखित साधने


(२)  स्मारके, नाणी, लेणी, कथा

उत्तर: कथा


(३)   भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे

उत्तर: मंदिरे


(४) ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके

उत्तर: तावरीखा

Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf - Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


प्रश्न ४. संकल्पना स्पष्ट करा.


(१)    भौतिक साधने

उत्तर: किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले इत्यादी वस्तू किंवा वास्तु त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ‘भौतिक साधने’ असे म्हणतात. भौतिक साधनांमुळे  आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते.


(२) लिखित साधने

उत्तर: पूर्वीच्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फर्माने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण-समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची ‘लिखित साधने’ असे म्हणतात. 


(३)  मौखिक साधने

उत्तर: लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके इत्यादी कोठेही लेखीस्वरुपात आढळत नाही. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. मौखिक साधनांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.


तिहासाची साधने धडा पहिला स्वाध्याय - इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी


प्रश्न ५. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा.

उत्तर: होय, ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते.

            ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते. ही साधने अस्सल असणे गरजेचे असते. लेखकाचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हित संबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. केवळ लिखित पुरावा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्या वेळच्या इतर समकालीन साधनांशी त्या माहितीची सांगड बसणे आवश्यक असते. ऐतिहासिक  साधने तपासून घेणे गरजेचे असते. या साधनांची किंवा वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते. याआधी विश्वासार्ह ठरलेल्या गोष्टींशी पडताळून घ्यावा लागतील. असे केले नाही तर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात. म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते.

 

६. तुमचे मत लिहा.


(१)   शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.

उत्तर: दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात. शिलालेख हे कोरलेले असल्यामुळे त्यामधील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखांमुळे शिलालेख हा इतिहासलेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो.


(२) मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

उत्तर: जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे कहाण्या, दंतकथा, मिथके अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती, विचार, लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते. मौखिक साहित्य हे पाठांतराच्या रुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते. या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात.

**********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.