-->

१७.पुस्तके स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाचवी मराठी | Pustake swadhyay prashn uttare 5th marathi

१७.पुस्तके स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

पुस्तके  5वी मराठी पाठ १७  स्वाध्याय प्रश्न उत्तरे / पुस्तके इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / इयत्ता पाचवी विषय मराठी पुस्तके स्वाध्याय / पुस्तके प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पुस्तके स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.

स्वाध्याय

 

प्र.१. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .


(अ)      पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात, असे कवितेत म्हटले आहे?

 उत्तर:     पुस्तके युगायुगांच्या, वर्तमानाच्या आणि भूतकाळाच्या तसेच माणसांच्या जगाच्या, एकेका क्षणाच्या तसेच जिंकल्याच्या आणि हरल्याच्या, प्रेमाच्या आणि कडवटपणाच्या गोष्टी पुस्तके सांगतात.


(आ)   पुस्तके तुमच्याजवळ का राहू इच्छितात?

उत्तर:     पुस्तकांमध्ये युगायुगांच्या गोष्टी आहेत, वर्तमानकाळ आणि भूतकाळातील प्रत्येक क्षणाच्या गोष्टी या पुस्तकांत आहेत, हार – जीत तसेच प्रेमाच्या कटुतेच्या गोष्टी पुस्तकांत आहेत, पुस्तकांमध्ये परीकथांबरोबर रॉकेटचे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र देखील आहे. या सर्व गोष्टी पुस्तकांना मुलांना सांगायच्या आहेत म्हणून पुस्तके मुलांजवळ राहू इच्छितात.

 

पुस्तके  5वी मराठी पाठ १७  स्वाध्याय प्रश्न उत्तरे पुस्तके इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी पुस्तके स्वाध्याय पुस्तके प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पुस्तके स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Pustake swadhyay prashna uttare Pustake question answer Pustake prashn uttar  5th standard Marathi question answers

(इ) आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे, असे कवीला का वाटते?

उत्तर:     पुस्तकांना काही गोष्टी सांगायच्या असतात, पुस्तकांमधून पाखरे चिवचिवतात, पुस्तकातील अक्षरे सळसळ करतात, पुस्तकांतून झरे गुणगुणतात, पुस्तके परीकथा ऐकवतात, रॉकेट चे तंत्र आणि विज्ञानाचा मंत्र या पुस्तकांत आहे. पुस्तकांची दुनियाच निराळी आहे त्यांमध्ये ज्ञानाचा खजिना आहे. म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे, असे कवीला वाटते.

 

प्र.२. 'पुस्तकें ' या कवितेतील खालील गोष्टी काय करतात, ते लिहा. उदा . , पाखरं -चिवचिवतात .

(अ ) आखरं

उत्तर: सळसळतात


(आ)        निर्झर

उत्तर: गुणगुणतात

 

प्र.३. कवितेच्या ओळी पूर्ण करा.

(अ)     पुस्तकं सांगतात .............

...............................................

...............................................

.....................भूतकाळाच्या

उत्तर: पुस्तकं सांगतात गोष्टी

युगायुगांच्या.

माणसांच्या जगाच्या,

वर्तमानाच्या-भूतकाळाच्या.

 

(आ) तुम्ही नाही का  .............

...............................................

...............................................

.....................इच्छितात.

उत्तर: तुम्ही नाही का ऐकणार

गोष्टी पुस्तकांच्या?

पुस्तके काही करू इच्छितात,

तुमच्याजवळ राहू इच्छितात.

 

(इ) पुस्तकांत पाखर   .............

...............................................

...............................................

.....................ऐकवतात.

उत्तर: पुस्तकांत पाखर चिवचिवतात.

पुस्तकांत आखर सळसळतात.

पुस्तकांत निर्झर गुणगुणतात.

पुस्तकं परीकथा ऐकवतात.

 

(ई) पुस्तकात रॉकेटचे .............

...............................................

...............................................

..................... भरारी आहे !

उत्तर: पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे,

पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे.

पुस्तकांची दुनिया न्यारी आहे,

ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे!


प्र.४.पुस्तकांचे जग वेगळे असते, याबद्दल शिक्षक , पालक , मित्रांशी चर्चा करा. लिहा.

उत्तर:      पुस्तकांचे जगच वेगळे असते या जगात खूप काळांपासून घडत आलेल्या गोष्टी सांगितलेल्या असतात. पुस्तके आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगात घेऊन जातात. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जगाची, माणसांची माहिती अवगत होते. पुस्तकाच्या जगात कधी हसायला होत तर कधी आश्चर्यचकित करून टाकतात. अशा प्रकारे पुस्तकांचे जग वेगळे असते.

 

प्र.५.तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे , यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?

उत्तर:     पाठपुस्तके चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी ती नवीन असतानाच त्यांना कागदाचे आवरण घालू. पुस्तके हाताळताना काळजीपूर्वक हाताळू.

 

Pustake swadhyay prashna uttare
Pustake question answer
Pustake prashn uttar 
5
th standard Marathi question answers

प्र.६. पुस्तक तुमच्याशी बोलते आहे, अशी कल्पना करा. आठ ते दहा वाक्ये लिहा.

उत्तर:  एके दिवशी अभ्यास करत असताना माझ्या कानावर हाक  आली आजूबाजूला पहिले तर कोणीच दिसत नव्हते. तेवढ्यात पुन्हा एकदा हाक आली तेव्हा चक्क पुस्तकच माझ्याशी बोलत होते ते पुढे बोलू लागले. अरे मित्रा मी पुस्तक बोलत आहे. तुझ्या शाळेत कायम तुझ्या बरोबर असतो. माझ्यातून तुम्हाला ज्ञान मिळते. कधी कधी मी तुम्हांला हसवतो कधी कधी तुम्हांला इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी सांगत असतो तर कधी भविष्यात घडणाऱ्या बदलांचा संकेत तुम्हांला देत असतो. अरे मित्रा तू जसे आजपर्यंत मला जपून नीटनेटके ठेवले आहेस तसेच यापुढे ही ठेवशील ना? माझी साथ तू कधी सोडणार नाहीस ना? मलाही तुझ्यासारखा मित्र खूप आवडतो. तुझी माझी मैत्री अशीच राहूदे. चल मी खूप वेळ तुझ्याशी बोलत बसलो. आत्ता तु माझे वाचन कर.

 

प्र.७. तुम्हांला कोणत्या प्रकारच्या गोष्टींची पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा.

उत्तर:     १) परीकथा २) चातुर्यकथा ३) शौर्य कथा ४) आत्मकथा ५) विनोदी कथा ६)साहसाच्या गोष्टी ७) वैचारिक गोष्टी  ८) पुराण कथा इ. कथांची पुस्तके मला वाचायला आवडतात.

 

प्र.८. तुम्ही वाचलेल्या किमान पाच पुस्तकांसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती लिहा.

हा तक्ता पाहताना मोबाईल आडवा करा. 

पुस्तकाचे नाव

लेखक / कवी

विषय

आवडलेली वाक्य

नवे शब्द

गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत

प्यारेलाल  

आत्मचरित्र

महात्मा पदवीपेक्षा सत्य मला अनंत प्रिय आहे.

पतित, वज्राघात.

समाज सुधारक

डॉ. सदानंद मोरे

चरित्र

विद्येविना माती गेली | मतीविना नीती गेली | नीतिविना गती गेली | गतिविना वित्त गेले | वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले |

वित्त, शुद्र.

इसापनीती

सौ. रेचलगडकर

बोधकथा

समृद्धी व संस्कृती यांचे अतूट नाते असते

अचर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

• विचार करा. तुमचे मत सांगा.


१.      छापलेले पुस्तक व ई - पुस्तक यांपैकी तुम्हांला कोणते पुस्तक वाचायला आवडेल? का?

उत्तर:     मला छापलेले पुस्तक वाचायला आवडते. कारण छापलेले पुस्तक वाचताना ते हातात घेवून नीट वाचता येते.


२.     तुम्हांला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल , की ई - पुस्तकांच्या मदतीने? का?

उत्तर:     मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल. कारण शिक्षक पुस्तकातील मजकूर आम्हांला अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात. त्यामुळे आमच्या संकल्पना अधिक चांगल्या होतात.

३.     तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला दयावे की नाही ? का?

उत्तर:  आपले पुस्तकं वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यायचे कारण त्यामुळे ते पुस्तक वाचणाऱ्याच्या ही ज्ञानात भर पडेल, त्यालाही काही गोष्टी नव्याने समजतील.


 स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


पुस्तके  5वी मराठी पाठ १७  स्वाध्याय प्रश्न उत्तरे
पुस्तके इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता पाचवी विषय मराठी पुस्तके स्वाध्याय
पुस्तके प्रश्न उत्तरे
५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पुस्तके स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.
Pustake swadhyay prashna uttare
Pustake question answer
Pustake prashn uttar 
5
th standard Marathi question answers