१३.अन्न टिकवण्याच्या पद्धती. इयत्ता ५वी परिसरअभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Anna tikavnyachya padhati swadhyay prashn uttare 5vi

पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय अन्न टिकवण्याच्या पद्धती प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya
Admin

१३.अन्न टिकवण्याच्या पद्धती इयत्ता ५वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय - अन्न टिकवण्याच्या पद्धती प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय.


प्र.१.काय करावे बरे ?

(अ) पापड सादळले आहेत.

उत्तर: सादळलेल्या पापडांना वाळवण्यासाठी उन्हात ठेवावे. तीन –चार कडक उन्हे लागल्यावर पापड हवाबंद डब्यात ठेवावेत.

 हे सुद्धा पहा: सर्वांसाठी अन्न स्वाध्याय प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ 

(अ)       आंबा , कैरी , आवळा , पेरू अशी फळे , तर मटार , मेथी , कांदा , टोमॅटो अशा भाज्या ठरावीक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत .

उत्तर: आंब्याचा आमरस करून तो वर्षभर साठवून ठेवता येतो. कैरी आणि आवळा यांसारखी फळे वर्षभर वापरण्यासाठी ती फळे लोणच्याच्या स्वरुपात तसेच पेरू, कैरी, आवळा ही सरबतांच्या स्वरुपात वर्षभर वापरता येतात. मटार सोलून त्याचे दाणे फ्रीझ करून हवाबंद पिशवीत वर्षभर साठवता येतात. मेथीपासून ठेपले, मुठीया यांसारखे पदार्थ बनवून ते टिकवता येतात. टोमॅटो हा सॉस च्या रुपामध्ये आधी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करून. त्यानंतर त्यात हवा, पाणी शिरणार नाही याची काळजी घेतली जाते. कांदा टिकवून ठेवण्यासाठी वाळवून कोरड्या जागी साठवला जातो आणि वर्षभर त्याचा वापर केला जतो.

 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय अन्न टिकवण्याच्या पद्धती प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Anna tikvnyachya padhati questions and answers Anna tikavnyachya padhati swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

प्र.२. जरा डोके चालवा .

शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात ; परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते , असे का?

उत्तर: शेवया तयार करताना त्या जास्त काळ टिकून राहाव्यात यासाठी त्यांना कडक उन्हात वळवले जाते. त्यामुळे त्यातील पाणी निघून जाते. शेवयातील पाणी पूर्णपणे निघून गेल्याने त्या अनेक दिवस चांगल्या टिकतात. परंतु शेवयाची खीर बनवताना त्यात पाणी, दुध या गोष्टींचा वापर केला जातो. या गोष्टी जास्त काळ टिकून राहू शकत नसल्याकारणाने शेवयांची खीर लवकर खराब होते.

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 


प्र.३. चूक  की बरोबर ते सांगा . चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा .


(अ)        पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो .

उत्तर: बरोबर.


(आ)     सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले , की आपले अन्न खराब होत नाही .

उत्तर: चूक. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते.


(इ)      उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत .

उत्तर: चूक. उन्हाळ्यात वळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात.


(ई)     फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते .

उत्तर: चूक. फ्रीजमध्ये ठेवल्याने अन्नाला थंड पणा मिळतो.

Parisar abhyas bhag 1 swadhya - Anna tikvnyachya padhati questions and answers - Anna tikavnyachya padhati swdhyay prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay

 प्र.४.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

(अ)      अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते ?

उत्तर: अन्न वळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे त्याच प्रमाणे विविध परीरक्षके वापरून विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते.


(आ)     खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो ?

उत्तर: १)खरब झालेले अन्न खाल्ल्याने पोट दुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात.२) अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते.३)काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो. म्हणून आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो.


(इ)     फळांचे मुरांबे का केले जातात ?

उत्तर: वर्षातून एका हंगामात येणारी फळे जास्त काळ टिकून राहत नाहीत.  सुक्ष्मजीवांच्या प्रक्रियेमुळे ही फळे खराब होतात. अशी फळे टिकवून ठेवण्यासाठी त्यांत साखरेसारखे परीक्षके घालतात त्यामुळे ती फळे मुरंब्याच्या स्वरुपात वर्षभर टिकतात. एखाद्या हंगामात येणारी फळे वर्षभर उपलब्ध व्हावीत म्हणून फळांचे मुरांबे केले जातात.

 

(ई)परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात ?

उत्तर: भाज्या, फळे यांसारखे अन्नपदार्थ जे वर्षभर टिकवता येत नाहीत असे पदार्थ जास्त काळापर्यंत टिकवून ठेवण्यासाठी परीरक्षकांचा वापर केला जातो. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात.


(ए) मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ? ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत ?

उत्तर: १) तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, लवंगा, वेलची, जायफळ, जिरे, धणे, दालचिनी असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत. यापैकी धणे, काळीमिरी या वनस्पतीच्या बिया आहेत. तमालपत्र हे झाडाचे पान आहे. लाबंगा हे फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात.


स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.