22.वडिलांस पत्र इयत्ता सहावी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Vadilans patra swadhyay prashna uttare sahavi marathi

इयत्ता सहावी विषय मराठी वडिलांस पत्र स्वाध्याय वडिलांस पत्र स्वाध्याय इयत्ता सहावी. Vadilans patra eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi
Admin

22.वडिलांस पत्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे .

वडिलांस पत्र प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी वडिलांस पत्र प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी वडिलांस पत्र स्वाध्याय - वडिलांस पत्र स्वाध्याय इयत्ता सहावी.

स्वाध्याय

 

प्र. १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)           राजगडाला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ असेका म्हणतात?

उत्तर: १)राजगड किल्ला हा जुना, दुर्लक्षित, ओसाड परंतु बळकट आहे.

२)हा किल्ला अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे. म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात.

३) छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा गडावर मोहिमांची आखणी केली , आणि हा गड राजधानीचे ठिकाणही होते म्हणून राजगडला  गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते.


हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी मराठी प्रश्न उत्तरे 


(आ)        शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली?

उत्तर: शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. ‘१६४६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकेच नव्हे तर तो अतिउंच असून अवघड अशा डोंगरावर आहे.’जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे ‘राजगड’. अशी माहिती शिक्षकांनी राजगडाबाबत मुलांना दिली


इयत्ता सहावी मराठी पाठ २१ स्वाध्याय प्रश्न उत्तरे वडिलांस पत्र प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी वडिलांस पत्र प्रश्नउत्तरे इयत्ता सहावी विषय मराठी वडिलांस पत्र स्वाध्याय वडिलांस पत्र स्वाध्याय इयत्ता सहावी. Vadilans patra  eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Vadilans patra  swadhyay Vadilans patra  Vadilans patra  swadhyay path prshn uttare
(इ)    राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळेआहेअसे का म्हटलेअसावे?

उत्तर: राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्‍चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे.


(ई)     मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली?

उत्तर: राजगड  किल्ल्याची उंची सर्वांत जास्त आहे. याचा घेर बारा कोसांचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले.  राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले. अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना राजगडाविषयी पुरवली.


(उ)     समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा का जाणवला?

उत्तर: राजगडाचे दुरून निरीक्षण केले असता , मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला. पंख्याची तीन पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या दिसतात. या कारणामुळे समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा  जाणवला.


 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल  प्रश्न उत्तरे 


(ऊ)    राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत?

उत्तर: राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी  स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधाऱ्या रात्रीत होणारी गुप्त खलबते राजगडाने ऐकली. महाराजांच्या केलेल्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफझलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते. महाराज आग्र्‍याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच.’ या ऐतिहासिक घटना राज गडाने पहिल्या आहेत.

 

प्र. २. समीर असे का म्हणाला असावा?


(अ)   महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे.

उत्तर: भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप किल्ले आहेत. म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे, असे समीर म्हणाला असावा.


(आ)    किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हतं.

उत्तर: समीरने राजगडाचे आगळेवेगळे भौगोलिक स्थान पहिले . उत्तरेला असलेली गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्व दिशेला असणारा  पुणे-सातारा रस्ता तर पश्‍चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. सृष्टिसौंदर्य समीरने पहिले आणि तो त्यात हरखून गेला. म्हणून किल्ल्याहून मला परतावंसं वाटत नव्हत असे समीर म्हणाला.


 

(इ)    मला एक फलक खूप आवडला.

उत्तर: एका फलकावर लिहिले होते, ‘या गडावर नेताजी पालकर, तानाजी

मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. त्यामुळे समीर ला तो एक फलक खूप आवडला.


(ई)       आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे.

उत्तर: समीर च्या शिक्षकांनी महिती देताना सांगितले की, जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये भारतातील राजगड किल्ल्यांची प्रत्रीकृतीचा चा देखील त्यात समावेश आहे. असे तो म्हणाला. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.


(उ)     आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का?

उत्तर: राजगडासारख्या  भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीर चा  ऊर अभिमानाने भरून आला. आपल्या पुरातन वास्तूंत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. तो जाणून अजून जाणून घेण्याची इच्छा समीर च्या मनात निर्माण झाली त्यामुळे मोठ्या सुट्टीत आपण एक किल्ला बघण्याचे ठरवूया का? असा प्रश्न समीरने बाबांना विचारला.


(ऊ)    आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते.

उत्तर: समीर शिक्षणासाठी घरापासून दूर वसतीगृहात राहतो. वसतीगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हाताच्या जेवणाची चव नसावी, म्हणून आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला.

 

Vadilans patra  eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Vadilans patra  - swadhyay Vadilans patra  - Vadilans patra  swadhyay path prshn uttare

प्र. ३. बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात? त्यांतील तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा.

उत्तर: बस्थानाकावर प्रवाशांसाठी ध्वनीक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना या मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांतून दिल्या जातात. त्यांपैकी मला आवडलेल्या सूचना.

१)    स्वच्छता राखा. २)  आपल्या सामानाची काळजी आपण स्वतः घ्या. ३) अनोळखी व्यक्तींच्या हातात समान देऊ नका. ४) धुम्रपान करू नका.

 

प्र. ४. राजगडाने कार्य पाहिले, खलबते ऐकली असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे. खालील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळींत वर्णन लिहा.

उत्तर:

घर : या घराने पूर्वजांपासून सर्व पिढ्यांना आसरा दिला आहे. घरात राहणाऱ्यांचे उन्हा पावसापासून रक्षण केले आहे.

छत्री: या छत्रीने पावसाच्या दिवसांत पावसाचे थेंब स्वतःवर झेलून मला पावसात भिजण्यापासून वाचवले आहे. उन्हाळाच्या दिवसांत स्वतः उन्हाचे चटके सहन करून मला सावली दिली आहे.

पाटी: या फळ्याचा रंग जरी काळा असला तरीही त्याने आजवर कित्येक मुलांचे भविष्य उज्वल केले आहे. कितीतरी चांगली माणसे घडवली आहे.

तबला: स्वतः हातांचे वजन सहन करून स्वतःमधून सुंदर नाद निर्माण करून सर्वांना संगीताचा आनंद देतो.

 

प्र. ५. राजगडाची वैशिष्ट्येदिलेल्या तक्त्यात लिहा.

उत्तर:

राजगडाची वैशिष्ट्ये

जुना

दुर्लक्षित

बळकट

अतिउंच

बळकटप्र. ६. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ-दहा वाक्यांत वर्णन करा.

उत्तर: रायगड किल्ला.

                मी सुट्टीच्या दिवसांत कुटुंबासोबत रायगड किल्ल्याला भेट दिली. रायगड किल्ला चढून जाण्यासाठी डोंगरातून असलेली पायवाट चढावी लागते. डोंगरावर जायला रोप-वे ची सुविधा आहे परंतु पायी चालत जाताना आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य नीटपणे न्हाहाळता येते. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. या किल्ल्यावर टकमक टोक, गडावरील बाजार पेठ, पाण्याचा हत्ती तलाव यांसारखी ठिकाणे पाहायला मिळतात. ज्या ठिकाणाहून हिरकणी गवळण आपल्या मुलाच्या काळजीपोटी गडावरून उतरून खाली आली तो हिरकणी बुरुज याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे.

 

प्र. ७. समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा.

उत्तर:               ३० नोव्हेंबर २०१६


चिरंजीव समीर,

अनेक आशीर्वाद,

तुझे पत्र मला मिळाले. राजगडाच्या सहलीचे वर्णन वाचून माझ्या डोळ्यांसमोर राजगडाची प्रतिमाच उभी राहिली. तुला ऐतिहासिक ठेवा जपण्यात आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्यास खूप आवड असलेली पाहून मला तुझा अभिमान वाटला. तुमच्या शाळेने अशा प्रकारची सहल आयोजित करून खूप मोलाचे कार्य केले आहे. तुझी मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेटी देण्याची कल्पना खूप छान आहे. आपण मोठ्या सुट्टीत ही योजना नक्की अंमलात आणू. खूप अभ्यास कर . आनंदी रहा.

                कळावे.

                                      तुझे बाबा

 

 

 

(अ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.

(अ)   वसतिगृहातले      (आ) भारतातील  (इ)   राजधानी

उत्तर:

(अ)   वसतिगृहातले : गृह, वसति, गृहातले, वसले, हात, हाव, हास.

(आ)  भारतातील : भारत, भाल, रती , भारती, ताल, तीर , लता.

(इ)    राजधानी : राज, राधा, जनी, धारा, नीरा, नीज, धरा.

 

इयत्ता सहावी विषय मराठी वडिलांस पत्र स्वाध्याय - वडिलांस पत्र स्वाध्याय इयत्ता सहावी. - Vadilans patra  eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Vadilans patra 

(अ)        खालील शब्दांना दायी, शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा.

उत्तर:

(अ)   गौरव : गौरवशाली .

(आ) आराम:  आरामदायी

 (इ) सुख: सुखदायी  

(ई) भाग्य : भाग्यशाली

(उ) आनंद : आनंददायी

(ऊ)वैभव : वैभवशाली

 

आपण समजून घेऊया.

वर्तमानकाळ आणि भूतकाळाप्रमाणेच भविष्यकाळाचेही चार उपप्रकार पडतात.

 साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ.

 

  • खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) मी खूप शिक्षण घेणार.

(२) नंदिनी सायकल चालवणार.

(३) मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार.


वरील वाक्यांतील सर्व क्रियापदे भविष्यकाळातील आहेत.

 

  • खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) वैमानिकाने विमान चालवले असेल.

(२) प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल.

(३) वाहनचालकाने गाडी गॅरेजमध्ये ठेवलेली असेल.

वरील वाक्यांतील चालवले असेल,  मिळालेले असेल, ठेवलेली असेल ही या  क्रियापदांवरून क्रिया भविष्यकाळात पूर्णहोणार आहे असे दर्शवतात. हा पूर्णभविष्यकाळ आहे.


  • खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) तो निबंध लिहीत असेल.

(२) गाडी प्लॅटफॉर्मवर आलेली असेल.

(३) श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल.

        वरील वाक्यांतील लिहीत असेल, आलेली असेल, जिंकलेली असेल या क्रियापदांवरून भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो, म्हणून ती वाक्ये अपूर्ण भविष्यकाळातील आहेत.

 

  • खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.

(१) सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील.

(२) पक्षी चिवचिवाट करत राहतील.

(३) साहिल कविता रचत राहील.

            वरील वाक्यांतील म्हणत राहील, करत राहतील, रचत राहील या क्रियापदांवरून भविष्यकाळात क्रिया सुरू राहतील, अशी रीती (प्रथा) सांगितल्यामुळे इथे तो रीती भविष्यकाळ आहे.

 

  • खालील सारणी पूर्ण करा.

काळ

सामान्य

अपूर्ण

पूर्ण

रीतिकाळ

वर्तमान

मधुबाला तबला वाजवते.

मधुबाला तबला वाजवत आहे.

मधुबालाने तबला वाजवला आहे.

मधुबाला तबला वाजवत असते.

भूतकाळ

मधुबालाने तबला वाजवला.

मधुबाला तबला वाजवत होती.

मधुबालाने तबला वाजवला.

मधुबाला तबला वाजवत होती.

भविष्यकाळ

मधुबाला तबला वाजवेल.

मधुबाला तबला वाजवत असेल.

मधुबालाने तबला वाजवलेला

असेल.

मधुबाला तबला वाजवत असेल.

 

 हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.