२१.या काळाच्या भाळावरती ६वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Yaa kalachya bhalavarti swadhyay prashn uttare 6vi marathi

इयत्ता सहावी मराठी या काळाच्या भाळावरती प्रश्नउत्तरे इयत्ता सहावी विषय मराठी या काळाच्या भाळावरती स्वाध्याय या काळाच्या भाळावरती स्वाध्याय 6vi
Admin

२१.या काळाच्या भाळावरती स्वाध्याय प्रश्न उत्तरे

इयत्ता सहावी विषय मराठी या काळाच्या भाळावरती स्वाध्याय - या काळाच्या भाळावरती स्वाध्याय इयत्ता सहावी. - Yaa kalachya bhalavarti  eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi yaa kalachya bhalaavarti

स्वाध्याय

 

प्र. १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)        नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकाणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे?

उत्तर: नवीन स्वप्ने स्वप्ने साकार करण्यासाठी कमी सांगत आहे की, तू या काळाच्या भाळावर तुझ्या कर्तुत्वाच्या तेजाचा टीला लाव . तुझ्या कष्टातून या ठिकाणी मानवतेचा मळा फुलव. रोज तू नवीन स्वप्ने पहा. तुझ्या स्वप्नापर्यंत जाणाऱ्या वाटेवर काटे असले तरीही तू पुढे जात राहा. कितीही संकटे आले तरीही मागे फिरू नको  अंधाराला दूर करून सगळीकडे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड. असे प्रयत्न कवी स्वप्ने साकार करण्यासाठी सांगत आहेत.


(आ)     पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते?

उत्तर: काट्यांमधल्या वाटांमधुन जेव्हा तू चालत पुढे पुढे जाशील तेव्हा या वाटा तुला पाऊस भरल्या नभाकडे अलगद घेऊन जातील. तुझ्या स्वप्नापार्यंत पोहचवण्यास मदत करतील,तेव्हा उन्हाच्या झाला सरून जातील आणि पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते.


हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी मराठी प्रश्न उत्तरे 


(इ)   नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे?

उत्तर: नवीन दिशा शोधल्यावर त्या वाटांवरून नवीन वारे , नवीन उषा सापडतील. तुझ्या कार्यातून धरणीवर असणाऱ्या शिळा शिळा गाउदेत.

 
इयत्ता सहावी मराठी पाठ २१ स्वाध्याय प्रश्न उत्तरे या काळाच्या भाळावरती प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी या काळाच्या भाळावरती प्रश्नउत्तरे इयत्ता सहावी विषय मराठी या काळाच्या भाळावरती स्वाध्याय या काळाच्या भाळावरती स्वाध्याय इयत्ता सहावी. Yaa kalachya bhalavarti  eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi yaa kalachya bhalaavarti swadhyay ya kalachya bhalavarti ya kalachya bhalavarti  swadhyay path prshn uttare

प्र. २. ‘आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा’ या ओळीचा अर्थ सांगा.

उत्तर: नवीन तरुण पिढीने अपार कष्ट  करून नवविचारांची बाग फुलवायला हवी. अथक परिश्रम घेऊनच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे. तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा, अशी कवीची अपेक्षा आहे.

 

Iyatta sahavi Vishay Marathi yaa kalachya bhalaavarti - swadhyay ya kalachya bhalavarti - ya kalachya bhalavarti  swadhyay path prshn uttare


प्र. ३. मानवतेचे कार्य केलेल्या एका व्यक्तीच्या कार्याची माहिती आठ-दहा वाक्यांत लिहा.

उत्तर: समाजसुधारक : लोकमान्य टिळक (१८५६-१९२०)

जन्म - २३ जुलै १८५६

जन्मठिकाण- चिखलगाव, ता. दापोली , जि . रत्नागिरी .

कौटुंबिक पार्श्वभूमी - वडील : गंगाधरपंत । आई : पार्वतीबाई

लोकमान्य टिळकांचे पूर्ण  गंगाधर टिळक असे होते. त्य्नाचे  केशव असे होते. त्यांचे वडील गंगाधरपंत मराठी शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांच्या आईचे त्यांच्या वयाच्या  ,तर  वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झले. आई- वडिलांचे छत्र हरपल्याणारे पुढे त्यांचा सांभाळ तहाचे काका गोविंदपंत यांनी केला.

शिक्षण -

१८७३ मध्ये बाळ गंगाधर टिळक मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.

१८७७ मध्ये त्यांनी गणित विषयात बी.ए.  एल. एल . बी. ची  मिळवली.

वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या  त्यांनी शरीरसौष्ठव प्राप्त केले.

कार्य -

शैक्षणिक कार्याद्वारे टिळकांनी  कार्याला सुरवात केली.

 त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह १ जानेवारी १८८० रोजी पुण्यामध्ये 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापन केली .

४जानेवारी १८८१ मध्ये 'केसरी ' या मराठी दैनिकाची  तर २ जानेवारी १८८१ मध्ये 'मराठा' या इंग्रजी दैनिकाची सुरुवात केली.

२ जानेवारी १८८५ मध्ये आगरकर आणि विष्णुशात्री चिपळूणकर यांच्या साथीने डेक्कन एडुकेशन सोसायणीच्या 'फर्ग्युसन कॉलेज ' ची स्थापना केली.

तरुणांमध्ये रात्रभवना जागृत करण्यासही टिळकांनी १८९३ मध्ये गणेशोत्सवाची तर १८९५ मध्ये शिवजयंती ची सुरवात केली.

 

प्र. ४. तुमची इतरांना मदत होईल, असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा.

उत्तर: माझी इतरांना मदत होण्यासाठी मी समाज सेवक बनून समाजाची सेवा करेन . समाजसेवक बनल्यामुळे मला समाजातील लोकांच्या समस्या समजतील त्यांचे प्रश्न समजतील आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन.


 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल  प्रश्न उत्तरे 

इयत्ता सहावी मराठी पाठ २१ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - या काळाच्या भाळावरती प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी या काळाच्या भाळावरती प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी या काळाच्या भाळावरती स्वाध्याय

प्र. ५. कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो, तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता?

उत्तर: १) देशातील अंधश्रद्धा नष्ट व्हावी २) विषमता पूर्णपणे नष्ट व्हावी ३) जातीभेद नष्ट व्हावेत ४) सर्वांची स्वप्ने पूर्ण व्हावीत.५) सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा ६) राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावे.

 

प्र. ६. खालील तक्त्यात ‘अ’ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत. ‘ब’ गटात ओळींचा अर्थ लिहा.

उत्तर:

(अ)        सूर्यफुलांच्या फुलवी बागा

उत्तर: सूर्यफुले ज्या प्रमाणे सूर्याचे प्रतिक असतात जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवत असतात त्याच प्रमाणे तू उजळून तुझा प्रकाश सर्व घराघरांत पसरू दे असे कवीला वाटते.

 

(आ) काट्यांमधल्या वाटांमधुनि
 चालत जा तू पुढे पुढे

उत्तर: काट्यांमधल्या वाटांमधून म्हणजेच अडचणीच्या मार्गांमधुन तू पुढे पुढे चालत राहा. स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणीवर आत मात करून पुढे पुढे जात राहा.

 

(इ) अंधाराला तुडवित जाऊन
 घेऊन ये तू नवी पहाट

उत्तर: जीवनात येणाऱ्या दुखः रुपी अंधाराला तू तुझ्या पायदळी तुडवत जा आणि नवीन विचारांची पहाट घेऊन ये.


 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी सामान्य विज्ञान  प्रश्न उत्तरे 


(ई) उंच आभाळी घेऊन झेपा
काढ शोधूनी नव्या दिशा.

उत्तर: उंच आभाळात भरारी मारून म्हणजे उच्च विचारांच्या आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे.

 

खेळूया शब्दांशी:


(अ) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा.


(अ) कपाळ = भाळ

(आ) प्रयत्न =  यत्न

(इ) आकाश = आभाळ

(ई) पृथ्वी = धरा

(उ) सकाळ = उषा

(ऊ) दगड = शीळा

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र   प्रश्न उत्तरे 

(आ) कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा.

(१) टिळा  = मळा

(२)  करी   = घरी

(३) खळखळा = पाणकळा

(४) धरणी = करणी

(५) देऊन = जाऊन

(६) पहाट = ललाट

(७) दिशा = उषा

(८) नेतील = जातील

खेळूया शब्दांशी.


विचार करून सांगूया.


(ई)   ‘कणाकणाला’ म्हणजे प्रत्येक कणाला अशा प्रकारचे इतर शब्द शोधून लिहा.

उत्तर: १) घराघराला- प्रत्येक घराला.

२)क्षणाक्षणाला – प्रत्येक क्षणाला

३)दारादाराला – प्रत्येक दाराला.

४)पानापानाला – प्रत्येक पानाला.

५)पावलापावलाला- प्रत्येक पावलाला.

६) झाडाझाडाला – प्रत्येक झाडाला

 

प्र. ७. नवी स्वप्ने, नवी पहाट, नव्या दिशा हे शब्दसमूह कवितेत आलेले आहेत. हे शब्दसमूह कोणत्या अर्थाने आले आहेत ते लिहा.

उत्तर:

१)    नवी स्वप्ने – उज्वल भविष्य

२)   नवी पहाट – नवे आयुष्य नवी आशा.

३)   नव्या दिशा – नवे मार्ग


प्र. ८. या कवितेत कवी माणसाला नवीन काही करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तसे तुम्हांला घरातील व्यक्ती कोणत्या गोष्टींसाठी कसे प्रोत्साहन देतात? ते लिहा

उत्तर : मी एक उत्तम प्रकारचा खेळाडू व्हावे  म्हणून मला माझ्या कुटुंबातील माणसांनी खेळाची प्रक्टिस व्हावी म्हणून खेळासाठी आवश्यक असणारे साहित्य नवीन घेऊन दिले. माझ्यासाठी खेळ शिकविण्यासाठी एका प्रशिक्षकाची नेमणूक केली  आहे.अशा पद्धतीने मला माझ्या घरातील व्यक्ती गोष्टींसाठी प्रोत्साहन देतात.

 

इयत्ता सहावी मराठी या काळाच्या भाळावरती प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी या काळाच्या भाळावरती स्वाध्याय - या काळाच्या भाळावरती स्वाध्याय इयत्ता सहावी. - Yaa kalachya bhalavarti  eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi yaa kalachya bhalaavarti - swadhyay ya kalachya bhalavarti

आपण समजून घेऊया.


पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.


(१) सकाळी मुलांनी प्रार्थना म्हटली.

(२) काल आम्ही सहलीत खूप मजा केली.

(३) केवढा मुसळधार पाऊस पडला काल.

वरील वाक्यांतील क्रियापदे भूतकाळी आहेत. सर्वक्रिया भूतकाळात घडतात म्हणून हा साधा भूतकाळ होय.

 

पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा.

(१) गिर्यारोहकाने कडा सर केला होता.

(२) आमच्या वर्गाने क्रिकेटचा सामना जिंकला होता.

(३) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते.

वरील वाक्यांमधील क्रियापदांच्या रूपावरून सर्व क्रिया भूतकाळात पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून हा पूर्ण भूतकाळ होय.

 

पुढील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा.

(१) शंतनू क्रिकेट खेळत होता.

(२) जॉन चित्र काढत होता.

(३) मीना ग्रंथालयात पुस्तक वाचत होती.

 क्रियापदाच्या निरीक्षणावरून असे लक्षात येते  की वरील वाक्यांत खेळण्याची, चित्र काढण्याची, वाचण्याची क्रिया भूतकाळात अपूर्णआहे. अपूर्ण भूतकाळात संयुक्त क्रियापदांचा वापर केला जातो.

 

पुढील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा.


(१) उन्हाळ्यात ऊसतोडणी सुरू होत असे.

(२) तो नेहमी गाडीत पेट्रोल भरत असे.

(३) चंदू सनई वाजवत असे.

अधोरेखित क्रियापदावरून ऊसतोडणीची, पेट्रोल भरण्याची, सनई वाजवण्याची क्रिया भूतकाळात सतत घडण्याची रीत आहे असा अर्थ  व्यक्त होतो, म्हणून हा रीती भूतकाळ होय.

 

खालील वाक्यांत क्रियापदांची योग्य रूपे घाला.


(१) बिरबल स्वचातुर्याने सभा जिंकतो (जिंकणे)

(२) अभय गोष्टी लिहितो (लिहिणे)

(३) सायकल चालवण्यामागे वीणा पर्यावरणाचा करते (विचार करणे)

 

पुढील वाक्यांत क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला.


(१) काल पाच वाजता सोनाली शाळेतून आली  .(येणे)

(२) वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय केला .(करणे)

(३) काल नऊ वाजता सौरभ आकाशाचे निरीक्षण करत होता.(निरीक्षण करणे)

 


 हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.