२. शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | shivpurvakalin bharat swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra .

इयत्ता सातवी इतिहास गाईड शिवपूर्वकालीन भारत धडा दुसरा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Shivpurvakalin bharat swadhyay 7vi
Admin

२.  शिवपूर्वकालीन भारत इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्रस्वाध्याय प्रश्न उत्तरे 

शिवपूर्वकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा स्वाध्याय - पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी

स्वाध्याय

प्रश्न १. नावे सांगा.


(१)   गोंडवनची राणी –

उत्तर: राणी दुर्गावती


(२) उदयसिंहाचा पुत्र –

उत्तर: महाराणा प्रताप


(३)  मुघल सत्तेचा संस्थापक –

उत्तर: बाबर


(४) बहमनी राज्याचा पहिला सुलतान –

उत्तर: हसन गंगू


(५)  गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल –

उत्तर: खालसा दल.

 
शिवपूर्वकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा स्वाध्याय पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास गाईड शिवपूर्वकालीन भारत धडा दुसरा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Shivpurvakalin bharat swadhyay 7vi Shivpurvakalin bharat swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

प्रश्न २. गटात न बसणारा पर्याय निवडा.


(१) सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर

उत्तर: बाबर


(२)   आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरिदशाही

उत्तर: सुलतानशाही


(३)   अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब

उत्तर: शेरशाह


प्रश्न ३.     थोडक्यात उत्तरे लिहा.


 (१)  विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली ?

उत्तर:

१)    दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्ल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले.

२)    या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी इ.स. १३३६  मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले.

३)    हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला व इ.स. १३४७ मध्ये नवीन राज्य बहमनी राज्य अस्तित्वात आले.


(२)  महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?

उत्तर:  महमूद गावानने पुढील सुधारणा केल्या:

१)    राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले .

२)    सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली.

३)    सैन्यामध्ये शिस्त आणली.

४)    जमिन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली.

५)    बिदर येथे फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली.


इयत्ता सातवी इतिहास गाईड - शिवपूर्वकालीन भारत धडा दुसरा स्वाध्याय - इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी


(३)  मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले ?

उत्तर:

१)औरंगजेबाच्या सैन्याने आसाममधील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले.

२)गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले आणि त्यांनी मुघालांविरुद्ध संघर्ष केला.

३)आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला.

त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.


प्रश्न ४.     तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा.


(१) कृष्णदेवराय

उत्तर:

१)    कृष्णदेवराय इ.स. १५०९ मध्ये विजयनगरच्या गादीवर आले. त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून घेऊन आपल्या राज्याचा विस्तार केला.

२)    बहमनी सुलतान महमूदशाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला.

३)    कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगु भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनितीविषयक ग्रंथ लिहिला.

४)    कृष्णदेवराय यांच्या करकिर्दीतच विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले


Shivpurvakalin bharat swadhyay prashn uttar - Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf - Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


(२)  चांदबिबी

उत्तर:

१)    अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांदबिबी होय.

२)    इ.स.१५९५ मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला.

३)    मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. हा किल्ला चांदबिबी ने धैर्याने लढवला.

४)    या वेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले; यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला नाही.


(३)   राणी दुर्गावती

उत्तर:

१)    चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती ही गोंडवनची राणी झाली.

२)    तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला.

३)    तिने मुघालांविरुद्ध दिलेल्या लढा महत्त्वाचा मानला जातो.

४)    अकबराविरुद्ध लढताना दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतरही तिने शरणागती पत्करली नाही. अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले.


प्रश्न ५. सकारण लिहा.


(१)  बहमनी राज्याची पाच शकले झाली.

उत्तर:

१)    महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली.

२)    विजय नगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम होऊन हे राज्य कमकुवत झाले.

३)    विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे राज्यकर्ते यावार नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे बहमनी राज्याची पाच शकले झाली.


(२)  राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.

उत्तर:

१)पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले.

२)बाबर आणी राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली.

३)बाबराच्या तोफखान्या पुढे राणासंगाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही.

४) बाबराच्या राखीव सैन्याने प्रभावी कामगिरी केली.

यामुळे राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.


(३) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले.

उत्तर:

१)    अकबराने संपूर्ण भारत स्वतःच्या एकछत्री अमलाखाली आणण्याच्या प्रयत्न केला .

२)    मेवाडच्या गादीवर असलेले राणा प्रताप यांनी याला विरोध केला.

३)     त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला.

४)    महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला.

५)    पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले.


(४)  औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.

उत्तर:

१)    औरंगजेबाने वर्चस्ववादी धोरणातून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.

२)    त्यांचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते. या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरुतेघबहाद्दर यांनी तीव्र नापसंती दर्शवली.

त्यामुळे औरंगजेबाने गुरुतेघबहाद्दर यांना कैद केले.


(५)   राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.

उत्तर:

१)    अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही.

२)    मारवाडचा राणा जसवंतसिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले.

३)    दुर्गादास राठोड याने जसवंतसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला.

४)    दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.

 

शिवपूर्वकालीन भारत धडा दुसरा स्वाध्याय - इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी - Shivpurvakalin bharat swadhyay 7vi - Shivpurvakalin bharat swadhyay prashn uttar

६. कालरेषा पूर्ण करा.

उत्तर:

शिवपूर्वकालीन भारत प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  शिवपूर्वकालीन भारत या पाठाचा स्वाध्याय  पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास गाईड  शिवपूर्वकालीन भारत धडा दुसरा स्वाध्याय  इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी  Shivpurvakalin bharat swadhyay 7vi  Shivpurvakalin bharat swadhyay prashn uttar  Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf  Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers



 





७.इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हांला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत  लिहा.

उत्तर:


मला हे माहित आहे.

·        चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती ही गोंडवनची राणी झाली.

·        तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला.

·        तिने मुघालांविरुद्ध दिलेल्या लढा महत्त्वाचा मानला जातो.

·        अकबराविरुद्ध लढताना दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतरही तिने शरणागती पत्करली नाही. अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले.

 

 **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा

 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.