४.सजीवांतील पोषण स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान | Sajivantil poshan swadhyay 7th general science

सजीवांतील पोषण स्वाध्याय इयत्ता सातवीसजीवांतील पोषण प्रश्न उत्तरेस्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf७std science answer
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान सजीवांतील पोषण स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 सजीवांतील पोषण  स्वाध्याय इयत्ता सातवी - सजीवांतील पोषण प्रश्न उत्तरे - इयत्ता सातवी सामान्य विज्ञान चौथा धडा स्वाध्याय

1. अन्नप्रकारांनुसार वर्गीकरण करा.

वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कवके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचीड.

उत्तर:

शाकाहारी प्राणी

मांसाहारी प्राणी

मिश्राहारी प्राणी

स्वच्छताकर्मी

विघटक

गाय, हरीण, शेळी, म्हैस.

वाघ, सिंह, बेडूक.

चिमणी, मानव, झुरळ.

गिधाड

मृतोपजीवी

परजीवी

जीवाणू, कवके.

गोचीड

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा चौथा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा ४  सजीवांतील पोषण  स्वाध्याय इयत्ता सातवी  सजीवांतील पोषण प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान चौथा धडा स्वाध्याय  ७std science question answer in Marathi medium pdf  ७ class science question answer in Marathi ४th  lesson  ७th std science question answer Maharashtra board in Marathi

2. योग्य जोड्या जुळवा.

 

‘अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

1. परजीवी वनस्पती

ड. अमरवेल

2. कीटकभक्षी वनस्पती

क. ड्रॉसेरा

3. मृतोपजीवी वनस्पती

अ. भूछत्र

4. सहजीवी वनस्पती

ब. दगडफूल

 

 std science question answer in Marathi medium pdf -  class science question answer in Marathi ४th  lesson] - th std science question answer Maharashtra board in Marathi'


3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

 

अ.सजीवांना पोषणाची गरज का असते?

उत्तर:

१.सजीवांना काम करण्यासाठी उर्जा आवश्यक असते.

२.सजीवांच्या शरीराची वाढ व विकास होण्यासाठी तसेच

३.पेशींची झीज भरू काढण्यासाठी व उती दुरुस्त करणे.

४.शरीराला रोगांपासून वाचवणे इत्यादी कार्यासाठी सजीवांना पोषणाची गरज असते.

 

 

आ. वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर:

१.वनस्पती स्वत:ला लागणारे अन्न स्वतः तयार करतात.

२.जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य (Chlorophyll) व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात.

३.या क्रियेलाप्रकाशसंश्लेषण’ (Photosynthesis) म्हणतात.

 

इ. परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा.

उत्तर:

१.ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात.

२.उदाहरणार्थ, बांडगूळ, अमरवेल इत्यादी.

३.हरितद्रव्येनसल्याने अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतींवरच अवलंबून असते, म्हणून तिला संपूर्ण परपोषी वनस्पती म्हणतात.

४. परपोषी वनस्पतींचे दोन प्रकार पडतात अ)अर्धपरजीवी: या प्रकारातील वनस्पती आधारासाठी मोठ्या वृक्षावर अवलंबून असतात. या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतात. उदा: बांडगुळ. आ)संपूर्ण परजीवी: या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य नसते त्यामुळे त्या संपूर्णरित्या आश्रयी वनस्पतींवरच अन्नासाठी अवलंबून असतात. उदा.: अमरवेल.

5.कीटकांचे भक्षण करून जगणाऱ्या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती म्हणतात. उदा.: घटपर्णी, ड्रोसेरा.

६.मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषापाचे विघटन करून पोषकद्रव्ये तयार करतात. उदा: कवकवर्गीय सजीव.

 

ई. प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे/पायऱ्या स्पष्ट करा.

उत्तर:

प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे/पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत.

१.अन्नग्रहण - अन्न शरीरात घेणे.

2. पचन - अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे यास ‘अन्नपचन’ असे म्हणतात.

3. शोषण - पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे.

4. सात्मीकरण - शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती केली जाणे.

5. उत्सर्जन - पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकले जातात.

 

 

उ. एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते?

उत्तर:

अमिबा, युग्लीना, आणि पॅरामेशिअम हे  एकपेशीय सजीव एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया करतात.

 

4. कारणे लिहा.

 

अ. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.

उत्तर:

कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपली अन्नाची गरज भागवतात. कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटक भक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.

 

आ. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

उत्तर:

फुलपाखरू फुलातील रस शोषते, त्यासाठी त्याला नालीसारखी लांब सोंड असते. या सोंडीच्या सहाय्याने ते अन्नग्रहण करते.

 

5. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषणपद्धतीनुसार ओघतक्ता तयार करा


 

 

 
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा चौथा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा ४  सजीवांतील पोषण  स्वाध्याय इयत्ता सातवी  सजीवांतील पोषण प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान चौथा धडा स्वाध्याय  ७std science question answer in Marathi medium pdf  ७ class science question answer in Marathi ४th  lesson  ७th std science question answer Maharashtra board in Marathi


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा चौथा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा ४


6. विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.


अ.आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो,म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का?

उत्तर:

1.आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करत असलो, तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी तयार केलेल्या अन्नपदार्थांपासूनच बनवतो.

२. जसे गहू, कडधान्य, तांदूळ, अंडी इत्यादी.

३. आपण वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही.

 

 

आ. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का?

उत्तर:

१)स्वयंपोषि सजीवांची संख्या जास्त असते कारण,

२)जर स्वयंपोषी सजीवांची संख्या कमी झाली तर त्यावार अवलंबून असणारे परपोषी सजीव देखील नष्ट होतील.

३)म्हणून अन्नसाखळीमध्ये परपोषी सजीवांपेक्षा स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते.

 

इ. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का?

उत्तर:

१.वाळवंटी भागात स्वयंपोषी सजीव कमी संख्येने आढळतात. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असण्रे परपोषी सजीव देखील कमी संख्येने आढळतात.

२. ज्या ठिकाणी अन्नाची कमतरता असते त्या ठिकाणी खाणाऱ्या सजीवांची संख्या कमी असते.

३. समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्लवक जीव असतात.

४. त्यांच्यावर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून वाळवंटी भागापेक्षा समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात.

 

ई. हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?

उत्तर:

१)वनस्पतीच्या हिरव्या भागात हरितद्रव्य असते त्यामुळे वनस्पतीच्या हिरव्या भागांत अन्न तयार होते.

२) हिरव्या भागांव्यातिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत हरितद्रव्य नसल्याने त्या भागात अन्न तयार होत नाही.

 

उ. बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते?

उत्तर:

१)परजीवी प्राणी हे अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात.

२)बाह्य परजीवी प्राणी  इतर प्राण्याच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात. उदा. उवा, गोचीड, ढेकुण.

३) अंतःपरजीवी प्राणी शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात.  त्यामुळे आपले कुपोषण होते. बाह्य परजीवी प्राण्यांमुळे आपल्या आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

   **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.