14. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Muldravye Sanyuge Aani Mishrane Swadhyay Prashn Uttare

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा चौदावा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Muldravye Sanyuge Aani Mishrane Swadhyay इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा 14
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान मूलद्रव्येसंयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Muldravye Sanyuge Aani Mishrane


प्र. 1. माझे सोबती कोण-कोण आहेत?


अ’ गट

‘ब’ गट (उत्तरे)

1. स्टेनलेस स्टील

उ. संमिश्र

2. चांदी

ऊ. धातू

3. भाजणीचे दळण

इ. मिश्रण

4. मीठ

आ. संयुग

5. कोळसा

ई. मूलद्रव्य

6. हायड्रोजन

अ. अधातू

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १४ मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय इयत्ता सातवी  ७std science question answer in Marathi medium pdf  ७vi vidnyan Muldravye Sanyuge Aani Mishrane swadhyay

प्र. 2. Zn, Cd, Xe, Br, Ti, Cu, Fe, Si, Ir, Pt या संज्ञांवरून मूलद्रव्यांची नावे लिहा.

उत्तर:

Zn: झिंक

Cd:कॅडमियम

Xe: झेनॉन

Br : ब्रोमिन

Ti : टीटॅनियम

Cu : कॉपर

Fe: आयर्न

Si: सिलिकॉन

Ir : इरिडीअम

Pt : प्लॅटिनम

 

प्र. 3. पुढील संयुगांची रेणुसूत्रे काय आहेत?

हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडिअम क्लोराईड, ग्लुकोज, मिथेन.

उत्तर:

हायड्रोक्लोरिक आम्ल : HCl

सल्फ्युरिक आम्ल : H2SO4

सोडिअम क्लोराईड  : NaCl

ग्लुकोज : C6H12O6

मिथेन : CH4

std science question answer in Marathi medium pdf | vi vidnyan Muldravye Sanyuge Aani Mishrane swadhyay

प्र. 4. शास्त्रीय कारणे लिहा.


. लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते.

उत्तर:

        पदार्थ वेगळे करण्यासाठी घुसळणे ही पद्धत वापरली जाते.  ताकामध्ये लोण्याचे कण विखुरलेले असतात. ताक घुसळल्याने केंद्र अप्सरी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक गोळा बनतो. म्हणून लोणी काढण्यासाठी टाक घुसळले जाते.


. रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यं त चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.

उत्तर:

        पदार्थांच्या दोन गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत केला जातो. पदार्थाची

वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला

चिकटून राहण्याची त्याची क्षमता .

        पाणी हे द्रावक असल्याने ते वेगाने वर चढते. पाण्यातील मिश्रणाचे घटकपदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळण कागदाला चिकटून राहतील . पाणी मात्र गाळण कागदाला चिकटून राहणार नाही. म्हणून रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यं त चढते, तेव्हा मिश्रणातील घटकपदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात.


. उन्ह्याळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून आलेले कापड गुंडाळले जाते.

उत्तर:

        पाणी साठवण्याच्या भांड्याला गुंडाळलेले कापड हे ओले असते. उष्णतेमुळे ओल्या कापडातील पाण्याचे बाष्पीभवन होते. हे बाष्पीभवन होत असताना ते  भांड्यातील पाण्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते. म्हणून उन्ह्याळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून आलेले कापड गुंडाळले जाते.

प्र. 5. फरक स्पष्ट करा.

अ. धातू आणि अधातू


धातू

अधातू

१.धातू वर्धनीय असतात.

१. अधातू वर्धनीय नसतात.

२.धातूंना चकाकी असते.

२. अधातू चकाकी नसते.

३.धातूंना तन्यता असते.

३. अधातू तन्यता नसते.

४.धातू हे उष्णता व विजेचे सुवाहक असतात.

४. अधातू हे उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात.

५.सामान्य तापमानात धातू हे स्थायू अवस्थेत असतात (अपवाद: पारा)

५.सामान्य तापमानात अधातू हे स्थायू  किंवा वायू अवस्थेत असतात (अपवाद: ब्रोमिन द्रव)

६)सोने, लोखंड , पारा.

६)हायड्रोजन, ऑक्सिजन

 

आ. मिश्रणे आणि संयुगे


मिश्रणे

संयुगे

१. वेगवेगळी मूलद्रव्येकिंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रण तयार होते.

१. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुग होय.

२.मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात.

२.संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या भौतिक पद्धतीने वेगळी करता येत  नाहीत.

३.मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात.

३. संयुगातील गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात.

४.उदा.: हवा, स्टील.

४.उदा.: मीठ , साखर , पाणी.

 

इ. अणू आणि रेणू


अणू

रेणू

१.अणू म्हणजे मूलद्रव्याचा सर्वात लहान कण होय.

१.दोन किंवा अधिक अणूंपासून रेणू बनतो.

२.अणू मध्ये मुलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात.

२.रेणूला स्वतःचे गुणधर्म असतात.

३.अणूचे विभाजन करणे सहज शक्य नसते. त्यांचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात.

३. रेणूचे त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजन करता येते.

४.अणू एकत्र असल्यास रेणू बनतो.

४.रेणू एकत्र आल्यास उत्पादन बनते.


ई. विलगीकरण व ऊर्ध्वपातन


विलगीकरण

ऊर्ध्वपातन

१. एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात.

१.द्रावणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी उर्ध्वपातन ही पद्धत वापरतात.

२.विलगीकरण पद्धतीमध्ये उष्णता द्यावी लागत नाही.

२.या पद्धतीमध्ये उष्णता द्यावी लागते.

 

प्र. 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.


अ. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात?

उत्तर:

1. निवडणे, वेचणे, गाळणे, चाळणे, पाखडणे, संप्लवन, चुंबक फिरवणे इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात.

2.   निवडणे किंवा वेचणे पद्धतीमध्ये मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात.

3.   द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे.

4.  मिश्रणातून कमी-अधिक आकाराचे पदार्थ वेगळे कण्यासाठी चाळणे ही पद्धत योग्य आहे.

5.  मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरवून ते कण वेगळे केले जातात.

6.   आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो?

 

आ. आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये (धातू व अधातू), संयुगे, मिश्रणे वापरतो?

उत्तर:

१)   धातू मूलद्रव्ये : सोने, चांदी, लोह, तांबे.

२)   अधातू मूलद्रव्ये : ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन .

३)   संयुगे : मीठ, तेल, साखर.

४)   मिश्रणे : साबण, संमिश्र ( स्टील , पोलाद)

 

इ. दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो?

उत्तर:

        थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही . त्यसाठी आवश्यक असणारे उपकरण घरात नसते. अपकेंद्री पद्धतीचा वापर करून  ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात.

        या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे टाक करणे. परंतु ताक करत असताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही. त्याऐवजी रवीचा वापर केला जातो. रवीच्या सहाय्याने लोण्याचे कण एकत्र केले जातात. यात लोण्याचे कण केंद्र अप्सरी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात.

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा 14 | मूलद्रव्येसंयुगे आणि मिश्रणे स्वाध्याय इयत्ता सातवी

ई. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो? का?

उत्तर:

        उर्ध्वपातन : अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी उर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो. तसेच द्रवानामधून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील उर्ध्वपातन करतात. या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते.

        विलगीकरण : एकमेकांत न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीने वेगवेगळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात.

        केरोसीन आणि पाणी यांचे मिश्रण याच पद्धतीने वेगळे करता येते.

 

उ. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल.

उत्तर:

        उर्ध्वपातन पद्धतीमध्ये सर्व उपकरणे व्यवस्थितपणे मांडली पाहिजेत . संघननी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे. चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विलगिकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव पदार्थ खाली गळू लागतात. तसेच वेगळे झालेले दरव पदार्थ तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे तोटी उघड-बंद करता आली पाहिजे.

********

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.