15. पदार्थ: आपल्या वापरातील प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Padarth Aapalya Vaparatil Swadhyay Prashn Uttare

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf ७vi vidnyan Padarth Aapalya Vaparatil swadhyay इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा 7vi samanya vidnyan
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  पदार्थ: आपल्या वापरातील स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Padarth Aapalya Vaparatil 

प्र.1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(पांढरे सिमेंट, साबण, अपमार्जक, हाडांची झीज, दंतक्षय, कठीण, मृदू, पोर्टलंड, तेलाम्ल)


. पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास ............. म्हणतात.

उत्तर: पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला साहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात.


. ............. रोखण्या साठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.

उत्तर: दंतक्षय रोखण्या साठी टूथपेस्टमध्ये फ्लोराइड वापरले जाते.


. साबण हा ............. व सोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.

उत्तर: साबण हा तेलाम्ल व सोडिअम हायड्रॉक्साइडचा क्षार आहे.


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १५ पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सातवी  ७std science question answer in Marathi medium pdf  ७vi vidnyan Padarth Aapalya Vaparatil swadhyay


. संश्लिष्ट अपमार्जके ही ............. पाण्यातही वापरता येतात.

उत्तर: संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात.


. बांधकामासाठी प्रामुख्याने............. सिमेंट वापरले जाते.

उत्तर: बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते.


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा पंधरा स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्र.2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

. अपमार्ज क वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात?

उत्तर:

1)   अपमार्जकाचे रेणू हे जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे भिन्न असतात.

2)  अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात.

अशा रीतीने अपमार्जके वापरल्यास मळकट कपडे स्वच्छ होतात.


. पाणी कठीण आहे का, हे तुम्ही साबणचुऱ्याच्या साहाय्याने कसे तपासाल?

उत्तर:

        कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही. कारण त्यात जे क्षार विरघळलेले असतात, त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाह.

म्हणून साबणचुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते.


. टूथपेस्टचे महत्त्वा चे घटक कोणते व त्यांचे कार्य काय?

उत्तर:

1) कॅल्शिअम कार्बोनेट, कॅल्शिअम, हायड्रोजन, फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक आहेत.

2)   दातांवरील घाण दूर करतात.

3)   दातांना पॉलिश करण्याचे काम या घटकांमुळेच होते.

4) दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठरावीक प्रमाणातील फ्लोराइडचा उपयोग होतो.

5)  हे फ्लोराइड दातांवरील आवरण आणि हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते.

 

. सिमेंटमधील घटक कोणते?

उत्तर:

1)    सिलिका (वाळू), ॲल्युमिना (ॲल्युमिनिअम ऑक्साइड), चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिया (मॅग्नेशिअम ऑक्साइड) इत्यादी . घटक सिमेंट मध्ये असतात.


. काँक्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल?

उत्तर:

सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे.

जर सिमेंट वापरले नाही, तर

१.    स्लॅब भक्कम होणार नाही.

२.    इमारतितीच्या स्लॅब मधून पाण्याची गळती होईल.


. तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी करा.

उत्तर:

साबण, शिकेकाई, कपडे धुण्याचा सोडा, लिक्विड सोप, रिठा इत्यादी.

 

. उंची वस्त्रांसाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत?

उत्तर:

1) रिठा आणि शिकेकाई यांसारखी निसर्गनिर्मित अपमार्जके उंची वस्त्रांसाठी वापरावीत.

2)   कारण या अपमार्जाकांचा रेशमी व लोकरी धाग्यांवर आणि कपड्यांवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही.

 

. पृष्ठसक्रियता म्हणजे काय? विविध अपमार्जकांच्या पृष्ठसक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या तीन रसायनांची नावे लिहा.

उत्तर:

1)    पृष्ठभागावरील सहजरीत्या पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठसक्रियता म्हणतात.

2) पेट्रोलिअम, मेद, सल्फर डायऑक्साईड, अल्कोहोल, अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकांत पृष्ठसक्रियता येते.


प्र. 3. आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे?

पदार्थ आपल्या वापरातील स्वाध्याय इयत्ता सातवी


. नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके

उत्तर:

 सारखेपणा: दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात.

नैसर्गिक अपमार्जके

मानवनिर्मित अपमार्जके

 १.नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात.

१.मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ आहेत.

२.नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर परिणाम होत नाही.

२.मानवनिर्मित अपमार्जाकांमध्ये असलेल्या विविध रसायनांमुळे कपड्यांवर अनिष्ट परिमाण दिसून येतात.

३. नैसर्गिक अपमार्जकांमुळे जलाशयांचे प्रदूषण होत नाही.

३.मानवनिर्मित अपमार्जकांमुळे जलाशयांचे प्रदूषण होते.










. साबण व संश्लिष्ट अपमार्जक.

उत्तर:

सारखेपणा: दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात.

साबण

संश्लिष्ट अपमार्जक.

१.साबण बनवताना सोडिअम सोडिअम हायड्रॉक्साइड, तेल, मीठ इत्यादी घटकांचा वापर केला जातो.

१. संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसीन वापरले जाते.

२. कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही.

२.कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो.

३.कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो.

३.कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिमाण खूप प्रभाव्शाला असतो.

४.त्वचेवर वाईट परिणाम होत नाही.

४.त्वचेवर वाईट परिणाम होतो.


. अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण

उत्तर:

सारखेपणा : दोन्ही तेलाम्ले असतात व स्वच्छतेसाठी वापरतात.

अंगाचा साबण

कपडे धुण्याचा साबण

१.अंगाचा साबण हा मृदू असतो.

१.कपडे धुण्याचा साबण हा कठीण असतो.

२.हा तेलाम्लांचा पोटॅशिअम क्षार असतो.

२. हा तेलाम्लांचा सोडिअम क्षार असतो.

३.वैयक्तिक स्वच्छतेसाठी हा साबण वापरला जातो.

३.कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो.


. आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट

उत्तर:

सारखेपणा : दोन्ही प्रकारचे सिमेंट हे बांधकामासाठी वापरतात.

 

आधुनिक सिमेंट

प्राचीन सिमेंट

१. सिमेंट हे सिलिका (वाळू), ॲल्युमिनिअम

ऑक्साइड, चुना, आयर्न ऑक्साइड व मॅग्नेशिअम ऑक्साइड

यांच्यापासून तयार करतात

१.भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवले जात असे.

२.तुलनेने कमी टिकावू असते.

२.तुलनेने जास्त टिकावू असते.


प्र.4. कारणे लिहा.


. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.

उत्तर:

1) कठीण पाण्यात विविध प्रकारचे क्षार असतात. त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो.

2)   या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो.

            म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही.

 

. तेल पाण्यात मिसळत नाही; परंतु पुरेसा अपमार्ज क वापरला, की तेल व पाणी एकजीव होते.

उत्तर:

1)    दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात. हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. तेल आणि पाणी एकमेकांत मिसळत नाहीत परंतु अपमार्जक वापरला, की ते अशा रीतीने एकजीव होतात.


. संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत.

उत्तर:

1)      संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यामध्ये वापरता येतात.

2)     त्यांच्यामध्ये वापराच्या गरजेनुसार सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात.

त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहेत.


. बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात.

उत्तर:

1)    साबणातील अशुद्धी कधी कधी कपड्यांवर उतरू शकते. हळदीसारखे डाग कपड्यांवर पडत असतील, तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात. 


. दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.

उत्तर:

1)    माशेरीमध्ये तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो.

2)   तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे.

3)   तंबाखूच्या वापराने अनेक प्रकाराचे कॅन्सर होऊ शकतात.

म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये.

***********

std science question answer in Marathi medium pdf

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.