19. चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म प्रश्न उत्तरे सातवी सामान्य विज्ञान | Chumbakiy Kshetrache Gundharma Swadhyay Prashn Uttare ७vi

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १९ चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी Chumbakiy Kshetrache Gundharma question answer in Ma
Admin

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान  चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7class science question answer Chumbakiy Kshetrache Gundharma


इयत्ता सातवी विषय विज्ञान चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १९  चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी  Chumbakiy Kshetrache Gundharma question answer in Marathi  ७vi vidnyan Chumbakiy Kshetrache Gundharma swadhyay

 

प्र.1. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा.


अ. औद्योगि क क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी.............व............. या संमिश्रांचा उपयोग केला जातो.

उत्तर: औद्योगि क क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपरमॅग अल्निको या संमिश्रांचा उपयोग केला जातो.


आ. चुंबकीय क्षेत्र............. व ............. यांमधून आरपार जाऊ शकते.

उत्तर: चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा  पाणी  यांमधून आरपार जाऊ शकते.


इ. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता............. रेषांच्या साहाय्याने दर्शवतात.

उत्तर: चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बल रेषांच्या साहाय्याने दर्शवतात.


ई. चुंबकाची खरी कसोटी ............. ही आहे.

उत्तर: चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण  ही आहे.


चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी | Chumbakiy Kshetrache Gundharma question answer in Marathi | vi vidnyan Chumbakiy Kshetrache Gundharma swadhyay


प्र.2. सांगा मी कोणाशी जोडी लावू?


‘अ’ गट

‘ब’ गट ( उत्तरे)

अ. होकायंत्र

4. सूचीचुंबक

आ. कपाटाचे दार

3. चुंबक

इ. प्रतिकर्षण

2. सजातीय ध्रुव

ई. चुंबकीय ध्रुव

1. सर्वाधिक चुंबकीय बल

 

प्र.3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


अ. कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा.

उत्तर:

एकस्पर्शी पद्धती आणि द्विस्पर्शी पद्धती या दोन कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या पद्धती आहेत.

१) एकस्पर्शी पद्धत

एका पट्टीचुंबकाचा ‘N’ ध्रुव एका पोलादी पट्टीच्या ‘अ’ या टोकापासून ‘ब’ या टोकापर्यंत घासता नेतात. ही क्रिया १५ ते २० वेळा केली असता पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व  निर्माण होते. या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात.

या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते.

२) द्विस्पर्शी पद्धत

दोन पट्टीचुंबक घेऊन त्यांचे दोन विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी टेकवून एका चुंबकीय पट्टीचा  S ध्रुव ‘अ’ या टोकाकडे आणि त्याचवेळी दुसर्या चुंबकीय पट्टीचा N ध्रुव ‘ब’ या टोकाकडे घासत नेतात. ही क्रिया १५ ते २० वेळा केली असतात पोलादी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण होते. या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धत असे म्हणतात.

या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ  टिकते.


आ. विद्युत चुंबक तयार करण्या साठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो?

उत्तर:

    विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खिळा, सुमारे १ मीटर लांब तांब्याची तार, एक बटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो.


चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी | Chumbakiy Kshetrache Gundharma question answer in Marathi | vi vidnyan Chumbakiy Kshetrache Gundharma swadhyay


इ. टीप लिहा - चुंबकीय क्षेत्र.

उत्तर:

    चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुबकीय बल कार्य करते त्या भागास ‘चुंबकीय क्षेत्र’ असे म्हणतात. चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते.


ई. होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर का केला जातो?

उत्तर:

        चुंबकाच्या गुणधर्मानुसार होकायंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबकसूची नेहमी दक्षिण-उत्तर याच दिशांना स्थिर राहते. त्यावरून दिशांचे ज्ञान होते. म्हणून होकायंत्रात चुंबकसुईचा वापर करतात.


उ. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या सहाय्याने  स्पष्ट करा.

उत्तर:

        चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या साहाय्याने दर्शवली जाते. एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लांब दिशेने किती बलरेषा जातात, त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते. ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते. त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात.

        चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेवरून समजते. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंकीय क्षेत्राची दिशादेखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असते.


4. पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशाप्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा.

उत्तर:

पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना दिशा समजण्यासाठी होकायंत्राचा वापर करत असत. या होकायंत्रात चुंबकसुई वापरलेली असे. हे चुंबकसुई एका एका तीक्ष्ण टोकावर क्षितीजसमांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते. चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण-उत्तर याच दिशेला स्थिर राहते.

एखाद्या ठिकाणाची उत्तर दिशा कोणती ही समजले की इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जिथे सगळीकडे फक्त वाळूच पसरलेली असते तेथे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समाजाने कठीण असते. अशा वेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग करता येतो.

******


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.