१४. महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास | Savinay Kaydebhang Chalval Swadhyay

Maharashtra Rajyachi Nirmiti Swadhyay Iyatta 8vi  | महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय इयत्ता ८वी  इतिहास


प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.


(१) १ मे १९६० रोजी ........... राज्याची निर्मिती  झाली.

(अ) गोवा

(ब) कर्नाटक

(क) आंध्रप्रदेश

(ड) महाराष्ट्र

उत्तर: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती  झाली.

 

(२) मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव .......... यांनी मांडला.

(अ) ग.त्र्यं.माडखोलकर

(ब) आचार्य अत्रे

(क) द.वा.पोतदार

(ड) शंकरराव देव

उत्तर: मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला.

 

(३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून .......... यांनी जबाबदारी स्वीकारली.

(अ) यशवंतराव चव्हाण

(ब) पृथ्वीराज चव्हाण

(क) शंकरराव चव्हाण

(ड) विलासराव देशमुख

उत्तर: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली.

 
इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी महाराष्ट्र राज्याची निर्मिती धडा चौदावा स्वाध्याय  8vi Maharashtra Rajyachi Nirmiti prashn uttare Itihas swadhyay 8th Maharashtra Rajyachi Nirmiti swadhyay

प्र.२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.


(१) संयुक्त महाराष्ट्र समिती ची स्थापना करण्यात आली.

उत्तर:

१) मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता.

२) ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली.

३) हे आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहचवण्यासाठीच संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.

 

(२) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती.

उत्तर:

१) या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती.

२) प्रबोधनकेसरीसकाळनवाकाळनवयुगप्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले.

३) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली.

४) बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मावळा’ या टोपणनावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवले.

५) लोकशाहीर अण्णाभाऊ साठेशाहीर अमर शेख व शाहीर द.ना.गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.

        म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपात्रांची भूमिका महत्वाची होती असे म्हणावे लागेल.

 

प्र.३. टीपा लिहा.


(१) संयुक्त महाराष्ट्र परिषद

उत्तर:

१) २८ जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र एकीकरण परिषद’ भरली.

२) या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा. यात मुंबईमध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला.


(२) संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान

उत्तर

१) १) मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता.

२) ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली.

३) हे आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहचवले.

४) ज्या वेळी मुंबई महाराष्ट्राला मिल्नार्णाही हे स्पष्ट झाले, त्यावेळी प्रचंड जनआंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात १०६ जन हुतात्मा झाले.

५) पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या १०६ सुपुत्रांचे ‘हुतात्मा स्मारक’ मुंबईत फ्लोरा फाऊंटनजवळ उभारले.

६) १ नोव्हेंबर १९५६ ला द्‌विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर १९५७ साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले.

७) या निकालावरून मतदार द्‌विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेतहे स्पष्ट झाले.

 

प्र.४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 उत्तर:

इयत्ता आठवी इतिहास स्वाध्याय pdf महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता आठवी महाराष्ट्र राज्याची निर्मिती धडा चौदावा स्वाध्याय  8vi Maharashtra Rajyachi Nirmiti prashn uttare Itihas swadhyay 8th Maharashtra Rajyachi Nirmiti swadhyay


**********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.