१२.वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Vatadya Swadhyay 4th Marathi

4th standard Marathi Vatadya question answers | वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) मिनू कशाला घाबरत होती?

उत्तर: मिनू रस्त्यावरच्या रहदारीला घाबरत होती.

 

(आ) मिनूला दररोज शाळेत कोण पोहोचवत असे?

उत्तर: मिनूला तिचे बाबा रोज शाळेत पोहचवत असे

 

(इ) रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना काय म्हणतात?

उत्तर: रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंगम्हणतात.


(ई) " मिनूला रस्ता ओलांडायला मदत करणाऱ्या काकांना दिसत नव्हते . ' हे पाठातील कोणत्या वाक्यावरून कळते ?

उत्तर: समोरच्या माणसाला काका म्हणाले ‘मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का?’ या वाक्यावरून काकांना दिसत नव्हते, हे कळते.

 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा वाटाड्या वाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Vatadya answers Vatadya 4th class question answers Vatadya 4th standard Marathi questions answers Iyatta chouthi prashn uttare

प्र.२. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .


(अ) आई किंवा बाबांचं बोट धरलं , की भीती ......

उत्तर: आई किंवा बाबांचं बोट धरलं , की भीती गायब

 

(आ) माझं नाव आहे .............पण सगळे मला मिनू म्हणतात .

उत्तर: माझं नाव आहे मृणालिनी पण सगळे मला मिनू म्हणतात .

 

(इ) मिनूच्या आवाजातल्या .......... काकांना गलबलून आले

उत्तर: मिनूच्या आवाजातल्या काकांना आर्जवीपणामुळे गलबलून आले .

 

(ई) आता रस्ता क्रॉस करताना मला नाही ...........वाटणार .

उत्तर: आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार.

 

 प्र .३ , कोण , कोणाला म्हणाले ?


 (अ) " मग आज नाही आला तो ? "

उत्तर: असे काका मिनू ला म्हणाले.

 

(आ) " रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही . "

 उत्तर: असे काका मिनू ला म्हणाले.

 

(इ) " तिकडे नाही हो . इकडे , या बाजूला . "

उत्तर: असे मिनू काकांना म्हणाली.

 

प्र . ४. पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांना मराठीत काय म्हणतात ते लिहा .


(अ) प्लीज

 उत्तर: कृपया

(आ) क्रॉस

उत्तर:  ओलांडणे


(इ) टीव्ही

उत्तर: दूरदर्शन संच

 

प्र.५. स्वतःला दिसत नसूनही काकांनी मिनूला रस्ता ओलांडावला कशी मदत केली ते पाच - सहा वाक्यांत लिहा .

उत्तर:

        मिनूने काकांचे बोट पकडले व काकांनी मिनुला झेब्रा क्रॉसिंग जवळ जाऊन डाव्या-उजव्या बाजूंना येणारी वाहने नीट पाहायला झान्गितली. वाहने दूर आहेत, हे विचारून काकांनी मिनूला रस्ता ओलांडायला मदत केली.

 

 प्र. ६. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा ,


(अ) काकांनी मिनूला मदत केली , तशी तुम्ही कोणाकोणाला मदत केली ? कशी  मदत केली ?

उत्तर: काकांनी मिनूला मदत केली, तशी मी एका आजीला तिच्या हातात असणारे ओझे रस्त्याच्या पलीकडे नेऊन देण्यासाठी मदत केली.

 

(आ) अंध व्यक्ती , मुले - मुली स्वतःची कामे स्वतः करतात , म्हणजे ते स्वावलंबी असतात . तसे तुम्ही स्वावलंबी आहात का ? असल्यास- तुम्ही स्वतःची कोणकोणती कामे स्वतः करता ? नसल्यास - स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल ?

उत्तर: मी माझे स्वतःचे काम स्वतःच करतो, म्हणजे मी स्वावलंबी आहे, मी माझे स्वतःचे अंथरून घालणे व आवरणे तसेच स्वतःचे जेवण केलेले ताट स्वतः धुणे ही कामे करतो.

 

प्र. ७. तुम्ही कधी भीतिदायक सिनेमा पाहिला आहे का ? चौथीतल्या जिग्नेशने असा एक सिनेमा पाहिला . तो सिनेमा पाहताना त्याला काय वाटले ते त्याने लिहिले आहे . कंसातील योग्य शब्द वापरून त्याचे लेखन पूर्ण करा .

(कानाचा , घसा , श्वास , डोळे , कानठळ्या , छाती , जीव , पाय)


                सिनेमाच्या सुरुवातीला अगदी शांत रस्त्यावर एक मुलगा चाललेला होता . सगळं इतकं शांत होतं की आपल्या श्वास घेण्याचाही आवाज यावा आणि एकदम एक कानठळ्या  बसवणारी किंकाळी ऐकू आली . कानाचा पडदा फाटतो की काय असं वाटलं . सिनेमात एक भली मोठ्ठी घार उडत आली आणि त्या छोट्या मुलाच्या अगदी जवळून गेली . माझी छाती जास्त जोरात धडधडू लागली . आई - बाबांच्या मधे बसून मी सिनेमा पाहत होतो , पण तरीही घसा

कोरडा पडला . मध्यंतराआधीचे गुहेतल्या पाठलागाचे दृश्य पाहून तर पाय  लटलटा कापू लागले . भीतीने डोळे  पांढरे पडू लागले , पण सिनेमा पाहायचाच होता . हे सगळं पडदयावर चालतंय , काल्पनिक आहे हे माहिती होतं . तरीही मध्यंतर होईपर्यंत मी जीव मुठीत घेऊन बसलो होतो .

 

प्र . ८. खालील प्रसंग तुमच्यावर कधी आले होते का ? त्या वेळी तुम्हाला काय वाटले ? तुम्ही काय केले ?


(अ) रस्त्यावरून चालताना एखादे वाहन पाठीमागून भर्रकन आले , जवळून गेले.

उत्तर: त्यावेळी अचानक भीती वाटली, पण मी पटकन रस्त्याच्या एका बाजूला झालो.


(आ) रस्ता ओलांडताना एखादया अनोळखी माणसाने तुमचा हात पकडला . तुम्हाला त्याच्याबरोबर चालायला सांगितले .

उत्तर: सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण नंतर त्यांच्या चांगुलपणाची खात्री पटल्यावर मी त्यांच्याबरोबर रस्ता ओलांडला.

*********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.