आम्ही जाहिरात वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi Batami Vachato swadhyay pdf
आम्ही जाहिरात वाचतो.
प्र. १.
जाहिरात कशाची आहे ?
उत्तर:
जाहिरात बालनाट्याच्या प्रयोगाबाबत आहे.
प्र. २.
बालनाट्याचे नाव काय आहे ? बालनाट्य कोणत्या दिवशी आहे ?
उत्तर:
बालनाट्याचे नाव चौकस चिंगी आणि घोरणारा मासा. हे बालनाट्या २२ एप्रिल या दिवशी आहे.
प्र. ३. या
नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?
उत्तर: या नाटकाचे
दिग्दर्शन रजनी चिपलककट्टी यांनी केले आहे.
प्र. ४. नाटक
कोणासाठी आहे ? ते कशावरून कळते ?
उत्तर: नाटक लहान
मुलांसाठी आहे. हे जाहिरातीच्या पहिल्याच ओळीवरून समजते. या मुलांनो या रे या,
लवकर सारे नाटक पाहा !
इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
तिसरी मराठी प्रश्न उत्तर
प्र. ५. ज्या
दिवशी वर्तमानपत्रात जाहिरात आली, त्या दिवशी कोणता वार व तारीख असेल
? ते कशावरून कळते ?
उत्तर: ज्या दिवशी
वर्तमानपत्रात जाहिरात आली, त्या दिवशी शुक्रवार असेल व तारिक २१ एप्रिल असेल. हे उड्या
शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी प्रयोग आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे काल शुक्रवार
व २१ तारिख असणार हे समजते.
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | आम्ही जाहिरात वाचतो स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Aamhi jahirat Vachato swadhyay
प्र. ६. आजच
तिकीट खरेदी करा, असे जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल ?
उदया तिकीट खरेदी केले तर चालेल का ?
उत्तर: तिकीटविक्री
नाट्यगृहावर २१ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत चालू असणार आहे. त्यामुळे तिकीट आजच खरेदी
करा असे सांगण्यात आले आहे. उद्या तिकीट खरेदी करू शकत नाही कारण तिकीटविक्री नाट्यगृहावर
२१ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत चालू असणार आहे.
प्र. ७. सुमी
तिकीट घ्यायला गेली. तिकीट देताना तिथले काका म्हणाले, "येताना टोप्या घालून या." त्यांनी टोप्या घालून यायला का सांगितले
असेल ?
उत्तर: बालनाट्याचा
प्रयोग दुपारच्या वेळेत असल्याने बाहेर उन असणार त्यांमुळे उन्हापासून बचाव व्हावा
यासाठी तिकीट देताना तिथले काकांनी टोप्या घालून यायला सांगितले.
Aamhi jahirat Vachato questions & Answers | 3ri marathi Aamhi jahirat Vachato | iyatta tisri marathi swadhyay
प्र. ८.
प्रत्येक तिकिटावर चिवडा-पाकीट मोफत मिळणार आहे. तुम्हांला चिवडा आवडतो का ? चिवड्याऐवजी काय मिळालेले तुम्हांला जास्त आवडेल ?
उत्तर: मला चिवडा
खूप आवडतो. परंतु चिवड्याऐवजी पॉपकोर्न मिळालेले जास्त आवडतील.