१.पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय प्रश्न उत्तरे
पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय / पृथ्वी आणि वृत्ते याचे प्रश्न उत्तर / पृथ्वी आणि वृत्ते या पाठचा स्वाध्याय दाखवा / पृथ्वी आणि वृत्ते धडा
पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी भूगोल स्वाध्याय
स्वाध्याय
![]() |
१) पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
अ) अचूक
पर्यायासामोरील चौकटीत अशी खुण करा.
१)पृथ्वीवर पूर्व- पश्चिम आडव्या
असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?
रेखावृत्त
आंतरराष्ट्रीय वाररेषा
अक्षवृत्ते
उत्तर: अक्षवृत्ते
२) रेखावृत्ते कशी असतात?
वर्तुळाकार
बिंदूस्वरूप
अर्धवर्तुळाकार
उत्तर: अर्धवर्तुळाकार
३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते
मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते?
कोनीय अंतर
गोलार्ध
वृत्तजाळी
उत्तर: वृत्तजाळी
४) उत्तर गोलार्धात एकूण किती
अक्षवृत्ते आहेत?
९०
८१
९१
उत्तर: ९०
५) पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध
कोत्या वृत्तांमुळे तयार होतात?
०० मूळ अक्षवृत्त व
१८० ० रेखावृत्त
०० मूळ रेखावृत्त व
१८० ० रेखावृत्त
उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ते
उत्तर: ०० मूळ
रेखावृत्त व १८० ० रेखावृत्त
६) खालीलपैकी पृथ्वीगोलावरील
बिंदूस्वरूपातील वृत्त कोणते?
विषुववृत्त
उत्तर ध्रुव
मूळ रेखावृत्त
उत्तर: उत्तर ध्रुव
७) पृथ्वीगोलावर ४५०
उ. अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते.
एक
अनेक
दोन
उत्तर: अनेक
ब) पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून
खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.
१) मुळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना
समांतर असते.
उत्तर: अयोग्य . मूळ रेखावृत्त
हे अक्षवृत्तांना समांतर असते.
२) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ
एकत्रित येतात.
उत्तर: अयोग्य. सर्व अक्षवृत्ते
विषुववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत.
३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते या
काल्पनिक रेषा आहेत.
उत्तर: योग्य.
४) ८० ४| ६५||
उत्तर रेखावृत्त आहे
उत्तर: अयोग्य . ८० ४| ६५|| उत्तर अक्षवृत्त आहे.
५) रेखावृत्ते एकमेकांना समांतर
असतात.
उत्तर: अयोग्य. रेखावृत्ते
एकमेकांना समांतर नसतात.
इ)पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून
तिच्यासमोरील चौकटीत अशी खुण करा.
उत्तर:
पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी धडा पहिला स्वाध्याय / Pruthvi aani vrutte eyatta sahavi dhada pahila swadhya / Paruthvi aani vrutte prashn uttare / Pruthvi aani vrutte swadhya uttare
क) उत्तरे
लिहा.
१) उत्तर धृवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल?
उत्तर: उत्तर ध्रुवाचे अक्षांश ९०
० उ. अक्षवृत्त रेखांश अल्फा रेखावृत्त याप्रमाणे सांगता येतील.
२) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते?
उत्तर: कर्कवृत्त ते मकरवृत्त
हे अंशात्मक अंतर ४७० असते.
३) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नवे
पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.
उत्तर: ज्या देशातून विषुववृत्त
गेले आहे. त्या देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया,
केनिया, सोमालिया इत्यादी.
४) वृत्तजाळीचे
उपयोग लिहा.
उत्तर:
१)पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते
व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते.२) पृथ्वीवरील स्थान निश्चिती साठी अक्षांश
व रेखांश यांचा वापर होतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरत
आहे. ३) भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील
गुगल मप , विकीम्यापिया व इस्त्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमधे अक्षवृत्त
व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. ४) आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व
मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशा दर्शकामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
ड) पुढील तक्ता पूर्ण करा.
|
वैशिष्ट्ये |
अक्षवृत्ते |
रेखावृत्ते |
|
आकार |
वर्तुळाकार |
अर्धवर्तुळाकार |
|
माप/ अंतर |
प्रत्येक अक्षवृत्ताचे माप |
प्रत्येक रेखावृत्ताचे माप |
|
दिशा/ संबंध |
दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व |
दोन रेखावृत्तां,मध्ये |
मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या
मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
त्यांनाही अभ्यास करताना याचा
फायदा होईल.
सहावी इतर विषयांची स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
येथे क्लिक करा.











