11.कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी | Kathin samay yeta questions and answers 5th standard

11.कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

5वी मराठी पाठ ११ स्वाध्याय प्रश्न उत्तरे , कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे , कठीण समय येता इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे , इयत्ता पाचवी विषय मराठी कठीण समय येत स्वाध्याय,  कठीण समय येता प्रश्न उत्तरे , ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कठीण समय येता , कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.


स्वाध्याय

 

5वी मराठी पाठ ११ स्वाध्याय प्रश्न उत्तरे , कठीण समय येता५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कठीण समय येता.कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Kathin samay yeta swadhyay prashna uttareKathin samay yeta question answer Kathin samay yeta prashn uttar  5th standard Marathi question answers स्वाध्याय प्रश्न उत्तरे , कठीण समय येता इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे , इयत्ता पाचवी विषय मराठी कठीण समय येत स्वाध्याय,  कठीण समय येता प्रश्न उत्तरे , ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कठीण समय येता , कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.

 

प्र.१. का ते सांगा.

 

(अ)        पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले.

उत्तर: गाडी उलटल्याने बैलांच्या गळ्याला एकाएकी फास बसला होता. पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवला नसता तर बैल प्राणाला मुकले असते. म्हणून पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडवून मग ते तरुण गाडीवानाकडे वळले.

 

(आ)    गाडीवान व्याकूळ होऊन गाडीभोवती फिरत होता.

उत्तर: बैलगाडीचा अपघात झाल्यानंतर गाडीवानाला त्याच्या बायकोचा ठावठिकाणा लागत नव्हता. म्हणून गाडीवान व्याकूळ होऊन गाडीभोवती फिरत होता.

 

(इ)            मोटरसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला.

 उत्तर: बैलगाडीचा अपघात होऊन एक बाई त्या बैलगाडीखाली दाबून गेली होती. तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलणे गरजेचे होते. आणि हे काम मुलांच्या मदतीने लवकर करता येईल म्हणून मोटारसायकलवरून आलेला एक तरुण शाळेत जाऊन गुरुजींना भेटला.

 

(ई)           गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती.

उत्तर: अपघातानंतर मुलीची आई निपचीत पडली होती. आणि तिचा श्वासही गुदमरला होता. हे पाहून गाडीवानाची मुलगी आईकडे भेदरलेल्या नजरेने पाहत होती.

 


५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कठीण समय येता.कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.
Kathin samay yeta swadhyay prashna uttareKathin samay yeta question answer
Kathin samay yeta prashn uttar  5th standard Marathi question answers


प्र.२. तीन - चार वाक्यांत उत्तरे लिहा.

 

(अ)         गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली, हे त्या दोन तरुणांनी कसे ओळखले असेल?

 उत्तर: गाडीचा अपघात होऊन गाडी एका बाजूला पूर्ण कलली होती. गाडीवान आपल्या जखमी मुलीला उचलून घेऊन गाडीभोवती बायकोला हाक मारत फिरत होता. पण त्याची बायको त्याला सापडत नव्हती. हे त्या दोन तरुणांनी पहिले. तेव्हा गाडीवानाची बायको उसाच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली हे त्या दोन तरुणांनी ओळखले.

 

(आ)      शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे का निघाले?

 उत्तर: गाडीवरून आलेल्या एका तरुणाने शाळेत जाऊन गुरुजींना घडलेल्या अपघाताबाबत सांगितले आणि अपघातात गाडीखाली अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी मुलांची मदत मागितली. मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तरी त्या बाईचा जीव वाचू शकेल ही तरुणाने केलेली विनंती ऐकून त्या अपघातामध्ये अडकलेल्या बाईचा जीव वाचवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन लगेच घटनास्थळाकडे निघाले.

 

(इ)           गाडीवानाला हुंदके का आवरत नव्हते?

उत्तर: कर्जाच्या आणि उसनवारीच्या ओझ्याखाली खचलेल्या गाडीवानाला भविष्याची काळजी वाटत होती. या प्रसंगात त्याला खूप जणांनी मदत केली. त्याची अपघातात बायकोही वाचली.परंतु या अपघाताचा त्याला धक्का बसल्याने गाडीवानाला हुंदके आवरत नव्हते.

 

 प्र.३. या पाठातील खालीलपैकी कोणाची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटली? का ते सांगा.

(अ) पत्रकार

(आ) शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी

(इ) मुख्याध्यापक

(ई) कारखान्याचे अधिकारी.

उत्तर: पत्रकारांची भूमिका सर्वात महत्वाची वाटली.

कारण, १) रस्त्यावर घडलेल्या अपघात पाहताच त्यांनी तिथे थांबून सर्वात आधी बैलांच्या गळ्यातील फास काढून त्यांचा जीव वाचवला. २) बैलगाडीखाली दबलेल्या बाईचा जीव वाचवा म्हणून शाळेत जाऊन गुरुजींना भेटून विद्यार्थ्यांची मदत मागितली त्यामुळे गाडीवानाच्या बायकोचा जीव वाचवता आला. म्ह्नानुल मला पत्रकाराची भूमिका सर्वात महत्वाची वाटते.

 

प्र.४. वाक्यात उपयोग करा.

प्रसंगावधान राखणे , काळजात धस्स होणे , भेदरलेल्या नजरेने पाहणे , हायसे वाटणे , डोळे पाणावणे , प्रसंगाचे गांभीर्य जाणणे , मार्गी लावणे , निपचीत पडणे.

उत्तर:

प्रसंगावधान राखणे

वाक्य: बस चालकाने  प्रसंगावधान राखल्याने पुढे होणारा अपघात टळला.

 

काळजात धस्स होणे

वाक्य: अचानक समोर आलेला वाघ पाहून राजूच्या मनात धस्स झाले.

 

भेदरलेल्या नजरेने पाहणे

वाक्य: पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेल्या शेताकडे शेतकरी भेदरलेल्या नजरेने पाहत होता.

 
हायसे वाटणे

वाक्य: परीक्षेत पास झाल्याची बातमी कळताच राजूला हायसे वाटले.

 

डोळे पाणावणे

वाक्य: खूप दिवसांनी राणीला घरी आलेले पाहून आई-बाबांचे डोळे पाणावले.

 

प्रसंगाचे गांभीर्य जाणणे

वाक्य: प्रसंगाचे गांभीर्य जाणून सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत केली.

 

मार्गी लावणे

वाक्य: बाबांनी राजूवर सोपवलेले काम राजूने मार्गी लावले.

 

निपचीत पडणे

वाक्य: खूप आजारी असल्याने राजूची आजी निपचित पडून होती.

 

 

प्र.५. पाठातील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर:

१)   कच्चे * पक्के

२)   उतार * चढण

३)   मागे * पुढे

४)   आडवी * उभी

 


प्र.६. या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल, तर त्या घटनेचे वर्णन करा.

उत्तर: रत्नागिरी जिल्ह्यातील घटना आहे. रत्नागिरी एका कंपनीतून समान घेऊन संगमेश्वर च्या दिशेने निघालेल्या ट्रकचे तीव्र उतार असलेल्या घाटात अचानक टायर पंक्चर झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाहेर जाऊन एका डोंगरावर आदळला आणि कलटला. यामध्ये ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडतच स्थानिक रहिवाश्यांनी अपघातात अडकेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत केली.

 

प्र.७. खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा.

 

बाइक, प्लीज, शॉक बसणे, फंक्चर, अँब्युलन्स.

उत्तर:

बाइक = मोटारसायकल

प्लीज = कृपया

शॉक बसणे = धक्का बसणे.

अँब्युलन्स = रुग्णवाहिका

 

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

या पाठाची प्रश्न उत्तरे खालील प्रमाणे देखील तुम्ही शोधू शकता.

इयत्ता पाचवी विषय मराठी कठीण समय येत स्वाध्याय
कठीण समय येता प्रश्न उत्तरे
५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे कठीण समय येता.
कठीण समय येता स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.
Kathin samay yeta swadhyay prashna uttare
Kathin samay yeta question answer

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.