१०. सुगंधी सृष्टी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी | Sugandhi srushti swadhyay prashn uttare 6vi marathi.

इयत्ता सहावी विषय मराठी सुगंधी सृष्टी स्वाध्याय सुगंधी सृष्टी स्वाध्याय इयत्ता सहावी. Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare
Admin

१०. सुगंधी सृष्टी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

  इयत्ता सहावी मराठी पाठ ७ स्वाध्याय प्रश्न उत्तरे / सुगंधी सृष्टी  प्रश्न उत्तरे / इयत्ता सहावी मराठी सुगंधी सृष्टी   प्रश्नउत्तरे / इयत्ता सहावी विषय मराठी सुगंधी सृष्टी  स्वाध्याय / सुगंधी सृष्टी   स्वाध्याय इयत्ता सहावी.

स्वाध्याय

प्र. १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)     सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता, असे लेखकाने कशाला म्हटले आहे?

उत्तर: लेखकाने एका डब्यात मोगऱ्याचे रोप लावले होते. हातभर उंचीचे रोप झाल्यावर त्याच्यावर एक कळी मोहरली होती. लेखक ती कळी फुलेपर्यंत रोज कुंडीपाशी जात असे. एके संध्याकाळी सहाच्या सुमाराला त्या कळीची एक पाकळी वाजूला झाली थोड्याच वेळात दुसरी पाकळी , मग इतरपाकळ्या येऊ लागल्या. या प्रसंगाला  सुगंधी पेटीचा एक खणच उघडत चालला होता असे लेखक म्हणतो.

 

(आ)     निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते?

उत्तर: हिरव्यागार छडीवर निशिगंधाची फुले एका पाठोपाठ एक लागलेली असतात. फुले दिसायला डौलदार असतात. निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही. आपला रंग, आपला गंध, आपला डौल लपवत नाहीत. म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते.

 

(इ)   लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे?

उत्तर: गुलाबाचा रुबाब इतर फुलांपेक्षा वेगळाच असतो. गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही, पाणी कमी झालेले देखील चालत नाही. खत देखील वेळच्या वेळी घालावे लागते, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे. अशी सर्व त्या झाडाची निगा राखल्यानंतरच गुलाबाचे फुल फुलते. एकदा गुलाब फुलू लागला कि सारे श्रम माणूस विसरून जातो. गुलाबाचे ज्याप्रमाणे रंग वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे गंध देखील वेगवेगळे असतात. असे लेखकाने गुलाबाचे वर्णन केले आहे.

 

(ई)      लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जाताना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते?

उत्तर: पावसाळी आभाळात ढग दाटून आले आणि त्यातून पाण्याचा वर्षाव सुरु झाला की पारिजातकाच्या झाडाला अंगोपंगांतून हिरवे रोमांच फुटतात. सकाळी पारिजताकाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतो. जणू साऱ्या भूमीवर वृक्षराजाची उदारताच अंथरलेली आहे. कोठे पाउल ठेवावे हेच समजत नाही म्हणून लेखकाला पारिजातकाखालून जाताना पुण्यवान भूमीवरून जाण्यासारखे वाटते.

इयत्ता सहावी विषय मराठी सुगंधी सृष्टी  स्वाध्याय सुगंधी सृष्टी   स्वाध्याय इयत्ता सहावी. Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Sugandhi srushti swadhyay सुगंधी सृष्टी   स्वाध्याय इयत्ता सहावी. Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Sugandhi srushti swadhyay Sugandhi srushti  swadhyay path prshn uttare


प्र. २. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

(अ)        तुम्हांला कोणकोणती फुले जास्त आवडतात? ती का आवडतात?

उत्तर: मला कमळ, गुलाब, चाफा, इत्यादी फुले आवडतात . निळेशार कमळ माझे मन मोहून टाकते. गुलाबाचा सुंगंध आणि त्यचा गुलाबी , लाल रंग मला खूप आवडतो. चाफ्याच्या फुलाचा सकाळी येणारा सुवास मला आवडतो.

 

(आ)     तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे?

उत्तर: फुलांचे अस्तित्व हे काही मर्यादित कालावधीसाठी असते. परंतु जेव्हा फुले उमलतात तेव्हा थोड्या कालावधीसाठी का होईना पण सर्वांच्या मनावर राज्य करतात.सर्वांना आनंद देऊन जातात. परोपकार करणे, इतरांना आनंद देणे हा अनमोल संदेश फुलांनी माणसाला दिला आहे.

 

(इ)     या पाठात गुलाबाला राजेश्री तर निशीगंधाला गुलछडी म्हटले आहे, का ते सांगा.

उत्तर: गुलाबाचा रुबाबा इतर फुलांपेक्षा काही वेगळाच असतो. जणू काही त्याचा एखाद्या राज्याप्रमाणे थाट असतो म्हणून गुलाबाला राजेश्री म्हटले आहे. निशीगंधाच्या दांड्यावर एकामागोमाग एक अशी फुले फुलू लागतात. हिरव्यागार छडीवर हरीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले एखाद्या गुलछडी सारखी वाटतात . म्हणून निशीगंधाला गुलछडी म्हटले आहे.


प्र. ३. पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा.

उत्तर: सकाळी सकाळी मी आमच्या अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली गेलो. झाडाखाली फिरत असताना माझ्या कानावर हाक मारल्याचा आवाज आला. आजूबाजूला कोणीही नव्हते तेव्हा लक्षात आले की , माझ्याशी पारिजातकाचे झाडच बोलत आहे. ते पुढे माझ्याशी बोलू लागले. माझ नाव पारिजातक खूप जण मला प्राजक्त या नावानेदेखील ओळखतात.  माझ्या सुवासिक फुलांनी मी साऱ्यांचे मन मोहून टाकतो. माझा सुगंध सर्वांना हवा हवासा वाटतो. माझी फुले अगदी पांढरीशुभ्र असतात आणि त्याला केशरी रंगाचा देठ अगदी शोभून दिसतो. रोज सकाळी मी तुझ्या अंगणात फुलांचा छडा अंथरतो. माझ्या सुगंधाने तुम्हांला झालेला आनंद पाहून माझ्या मनाला प्रसन्नता मिळते. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा असाच निखळ राहूदे असे मला कायम वाटते.


(अ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(अ) बिऱ्हाड – कुटुंब

(आ) मोठी – भव्य

(इ) सुवास – सुगंध

(ई) कष्ट – श्रम

 

(आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) निरुपाय x  उपाय

(आ) पांढराशुभ्र x काळाकुट्ट

(ई) उदार x कंजूष

(इ) प्रसन्न x अप्रसन्न


Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare / Iyatta sahavi Vishay Marathi Sugandhi srushti swadhyay / Sugandhi srushti  swadhyay path prshn uttare

(इ) खालील शब्दाला ‘दा’ प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा.

उदा., दहा - दहादा, पाच - पाचदा

(अ) एक – एकदा

(आ) शंभर – शंभरदा

(इ) हजार – हजारदा



(ई) डौल-डौलदार यांसारखे ‘दार’ प्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा.

उत्तर: घरदार, डेरेदार, ऐटदार, टुमदार, बहारदार, हवादार.

 

(उ) खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

(अ) घसघशीत

वाक्य : यावर्षी राजूने व्यवसायात घसघशीत नफा मिळवला.

 

(आ) रांगडा

वाक्य : भैरू पहिलवान शरीराने रांगडा आहे.


(ई)     उदारता

वाक्य: उदारता हा गुण प्रत्येकाने अंगी बाणवायला हवा.


(उ)    टिपून मारणे

वाक्य: नेमबाजीच्या स्पर्धेत राजू ने समोर ठेवलेल्या लक्ष्यावर टिपून बाण मारला.

 

(ऊ) या पाठात रंगांच्या अनेक छटा आल्या आहेत. उदा., पांढरा, तकतकीत पांढरा, पांढरेशुभ्र,पांढुरका. याप्रमाणे तुम्हांला माहीत असलेल्या रंगांच्या विविध छटा लिहा.


(अ) हिरवा – हिरवागर्द , हिरवागार

(आ) लाल – लालभडक , लालबुंद.

(इ) काळा – काळाकुट्ट, काळाभोर

(ई) पिवळा – पिवळसर , पिवळाधम्मक.

 

(ए) खालील शब्द पाहा.

वास-वास्तव्य, वास-गंध.

उच्चार एकच असलेले, पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या. लिहा. त्यांचे अर्थ

उत्तर:

१.मान – शरीराचा एक भाग  १.मान – आदर

२.बोट – शरीराचा भाग  २. बोट – होडी

३.तीर – बाण  ३. तीर – किनारा


इयत्ता सहावी विषय मराठी सुगंधी सृष्टी  स्वाध्याय / सुगंधी सृष्टी   स्वाध्याय इयत्ता सहावी. / Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare / Iyatta sahavi Vishay Marathi Sugandhi srushti swadhyay

(अ) काही फुले रात्री फुलतात तर काही दिवसा फुलतात. काही फुलांची झाडे बियांपासून, तर काही खोडापासून/फांदीपासून तयार होतात. अशा फुलझाडांचे निरीक्षण करा व पुढील तक्त्यात नोंदकरा.रात्री फुलणारी फुले


रात्री फुलणारी फुले

रातराणी, निशिगंध.

दिवसा फुलणारी फुले

पारिजातक, मोगरा

बियांपासून तयार होणारी फुलझाडे

बकुल, झेंडू.

फांदी/खोडापासून तयार होणारी फुलझाडे

गुलाब, जास्वंद



(इ) तुम्हांला आवडणाऱ्या कोणत्याही तीन फुलांची चित्रे काढा.

उत्तर:

इयत्ता सहावी विषय मराठी सुगंधी सृष्टी  स्वाध्याय सुगंधी सृष्टी   स्वाध्याय इयत्ता सहावी. Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Sugandhi srushti swadhyay
गुलाब 




सुगंधी सृष्टी   स्वाध्याय इयत्ता सहावी. Sugandhi srushti eyatta sahavi swadhyay prshn uttare Iyatta sahavi Vishay Marathi Sugandhi srushti swadhyay Sugandhi srushti  swadhyay path prshn uttare
सूर्यफुल 



(ऊ)      खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. झाड, फुले, नदी ,वाट ,पाऊस,डोंगर, धरण ,पक्षी ,प्राणी.

उत्तर:     नदी किनारी एक  डेरेदार झाड होते. त्या झाडावर उन्हाळ्याच्या दिवसांत रंगीबेरंगी फुले यायची. त्या झाडाचे ते सौंदर्य पाहून पाहणारा माणूस त्या झाडाकडे पाहतच बसत असे. झाडाखालूनच गावाकडे जाणारी मुख्य वाट होती. वाटेवरून जाणारा वाटसरू या झाडाच्या सावलीत विसावा घ्यायचा . उन्हातून गाय, बैल यांसारखे प्राणी या झाडाच्या सावलीत बसून रवंथ करत बसायचे. या झाडवर अनेक पक्षी घरटे बांधण्यासाठी येत असत. गावाच्या पूर्वेला डोंगर रांगा होत्या त्यातून वाहत येणाऱ्या नदीवर एक धरण बांधले होते. पावसाळ्याच्या दिवसांत ज्या वेळी पाऊस खूप  पडल्यावर जेव्हा त्या धरणातून पाणी सोडले जायचे त्या वेळी नदी किनारी उभे असलेले झाड नदी किनाऱ्यावरील मातीची धूप थांबवायचे. 



·       खालील परिच्छेदातील संख्याविशेषणे अधोरेखित करा.

अल्लाउद्दीन व फरिदा दोघे शाळेत निघाले. वाटेत एक भेळेचे दुकान होते. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. फरिदाकडे पाच रुपयांचे नाणे होते. तिने अडीच रुपयांत शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकीट

घेतले, तर अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्यापैशांत फुटाणे घेतले. सगळे पैसे संपले. भरपूर फुटाणे आले. पसाभर फुटाणे त्याने फरिदाला दिले, तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली.


·       खालील वाक्यांतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा.

(एकेक, सहस्र, द्विगुणित, दुप्पट, पाच)

१. अविनाशला पाच भाषा येतात.

२. सूर्याच्या सहस्त्र किरणांनी जमिनीला स्पर्श केला.

३. एकेक बेडूक उड्या मारत पसार झाले.

४. आईला पाहताच तिचा आनंद द्विगुणीत  झाला.

५. भुकेच्या तडाख्यात मीनाने दुप्पट चपात्या खाल्ल्या.

 

खालील दिलेल्या विरामचिन्हांची चौकटींत नवे लिहा.

?

प्रश्नचिन्ह

.

पूर्णविराम

,

स्वल्पविराम

-

अपसरणचिन्ह

‘‘ ’’

दुहेरी अवतरणचिन्ह

‘ ’

एकेरी अवतरणचिन्ह

;

अर्धविराम

!

उद्गारवाचक चिन्ह

 

 हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.