९.वारली चित्रकला स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता ६वी मराठी | Varali chitrakala swadhyay question answers 6vi marathi

वारली चित्रकला प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी वारली चित्रकला प्रश्नउत्तरेIyatta sahavi Vishay Marathi Varali chitrakala swadhyayVarali chitraka
Admin

९.वारली चित्रकला स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

वारली चित्रकला   इयत्ता सहावी मराठी पाठ ७ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - वारली चित्रकला   प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी वारली चित्रकला   प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी वारली चित्रकला   स्वाध्याय - वारली चित्रकला  स्वाध्याय इयत्ता सहावी.

स्वाध्याय

प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.


(अ)        महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून दिसून येतो?

उत्तर: वारली चित्रे, मुखवटे, लाकडी कोरीव काम, धातुकाम, मृणमुर्ती, वाद्य, पाषाण मूर्थी, शिकारीची साधने इत्यादी गोष्टींतून महाराष्ट्रातील आदिवासी कलांचा समृद्ध वारसा दिसून येतो.


(आ)     आदिवासी लोक चित्रे काढताना कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात?

उत्तर: आदिवासी लोक चित्रे काढताना तांदळाच्या पिठात पाणी ओतून तयार केलेले द्रव, बांबूच्या काड्या, हळद, कुंकू, रंगीत फुले, झाडांचा चिक इत्यादी साहित्याचा वापर करतात.


(इ)            वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात?

उत्तर: वारली चित्रकार झाडे रंगवताना झाडाच्या मुळाकडून वर शेंड्यांपर्यंत रंगवतो. त्यातून झाड उगवण्याची भावना प्रकट होते.


(ई)            वारली चित्रकाराने पाकळ्या व फांद्यांच्या आकारांतून काय घेतले?

उत्तर: वारली चित्रकाराने पाकळ्या आणि फांद्यांच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली.


(उ)           वारली चित्रकला समजून घेण्यासाठी काय करावे लागते?

उत्तर: वारली चित्रकला समजून घेण्यासाठी वारली प्रदेशांत छोट्या छोट्या वस्त्यांत फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो.

Varali chitrakala eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Varali chitrakala  swadhyay - Varali chitrakala swadhyay path prshn वारली चित्रकला   इयत्ता सहावी मराठी पाठ ७ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - वारली चित्रकला   प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी वारली चित्रकला   प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी वारली चित्रकला   स्वाध्याय - वारली चित्रकला  स्वाध्याय इयत्ता सहावी.


प्र. २. थोडक्‍यात उत्तरे लिहा.


(अ)        वारली चित्रकलेत कोणकोणत्या विषयाला धरून भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत?

उत्तर:     वारली चित्रकलेत धार्मिक विधी,  लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवनाचे रेखाटन आढळते. त्यामध्ये आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांवरून वारली चित्रकलेमध्ये भित्तिचित्रे रेखाटलेली आहेत.


(आ)     वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मांडतात?

उत्तर: वारली चित्रकार हे झाडे रंगवत असताना कायम सुरुवातीला मुळापासून सुरुवात करतात आणि झाडाच्या शेंड्याकडे शेवट करतात. त्यामधून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होत असते. इतर चित्रकार झाड रेखाटत असताना नेमके उलटे रेखाटतात.  वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. अशा प्रकारे वारली चित्रकार त्यांच्या चित्रकलेतून जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन मांडतात.

 

प्र. ३. शाळेच्या किंवा वर्गाच्या भिंतींवर चित्रेकाढायची आहेत. त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल?

उत्तर: 

१) पाण्याचा अपव्यय टाळा.

२) राष्ट्रीय प्राणी पक्षी

३) देशाचे नकाशे

४) वाहतुकीचे नियम

५) थोर व्यक्तिमत्व

 

प्र. ४. वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असे का म्हटले असेल?

उत्तर: वारली चित्रकला आजकाल टी-शर्ट, कुर्ता , साडी, बेडशिट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यांवर देखील रेखाटलेली दिसते . त्याचप्रमाणे घराच्या भिंती , घराची अंतर्गत सजावट यांसाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणवर वापर केला जातो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नाही तर परदेशांत देखील उमटली आहे. म्हणून वारली चित्रकला आता वारली समाज्याच्या बाहेर पडली आहे असे म्हंटले असेल.

 

(अ) हे शब्द असेच लिहा.

पशुपक्षी, पाषाणमूर्ती, प्रमाणबद्ध, शास्त्रशुद्ध, उदयोन्मुख, संस्कृती, इंद्रधनुष्य, सृष्टीला, चित्राकृती, भित्तिचित्रे, अर्धवर्तुळ, भौमितिक

उत्तर: पशुपक्षी, पाषाणमूर्ती, प्रमाणबद्ध, शास्त्रशुद्ध, उदयोन्मुख, संस्कृती, इंद्रधनुष्य,सृष्टीला, चित्राकृती, भित्तिचित्रे, अर्धवर्तुळ, भौमितिक


इयत्ता सहावी विषय मराठी वारली चित्रकला   स्वाध्याय - वारली चित्रकला  स्वाध्याय इयत्ता सहावी. - Varali chitrakala eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Varali chitrakala  swadhyay

(इ)     ‘घरदार’ या शब्दासारखे पाठातील जोडशब्द शोधून लिहा.

उत्तर: पशुपक्षी , नदीनाले, वृक्षवेली, आजूबाजू, सात-आठ, छोट्या-छोट्या, पांढराशुभ्र, आगळेवेगळे.

 

(इ) खालील शब्दांची फोड करा.

 उदा., धातुमूर्ती = धातूची मूर्ती.

उत्तर:

मृण्मूर्ती = मातीची मूर्ती

पाषाणमूर्ती=पाषाणाची मूर्ती

सुवर्णमूर्ती= सुवर्णाची मूर्ती


·       खालील शब्दसमूहातील नाम व विशेषण यांचे सारणीनुसार वर्गीकरण करा.

पिवळसर गुलाब, मोठा चेंडू, मसालेदार भाजी, लालचुटूक कळी, स्वच्छ रुमाल, टवटवीत चेहरा, निळेशार पाणी, रागीट घोडा.

 

नाम

विशेषण

गुलाब

पिवळसर

चेंडू

मोठा

भाजी

मसालेदार

कळी

लालचुटूक

रुमाल

स्वच्छ

चेहरा

टवटवीत

पाणी

निळेशार

घोडा

रागीट




  •  खालील वाक्यांत मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा.

(पांढरे, प्रचंड, भव्य, जाडेभरडे, आंबट)

१. समुद्रात प्रचंड  लाटा उसळतात.

२. तिच्या अंगावर जाडेभरडे  कपडे होते.

३. मला पांढरे  फूल आवडते.

४. मी खाल्लेी संत्री आंबट  होती.

५. आबासाहेबांनी भव्य वाडा बांधला.

Varali chitrakala eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Varali chitrakala  swadhyay - Varali chitrakala swadhyay path prshn uttare

·       पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.


१.    चित्रात एकूण किती मुले आहेत?

उत्तर: तीन

२.    चित्रात किती मांजरे आहेत?

उत्तर: एक

३.    मांजराच्या कितीपट मुले आहेत?

उत्तर: तीन पट

४.    घरावर किती कौले आहेत?

उत्तर: घरावर अनेक कौले आहेत.


·       खाली दिलेल्या वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला.

(अ) अहमद कुठे गेला आहे?

(आ) ढग खूप गर्जत होते, पण पाऊस पडला नाही.

(इ) शर्वरी आंबा खाते.

(ई) बापरे! केवढी मोठी ही गुहा.

(उ) प्रामाणिक ,हुशार ,मेहनती मुले सर्वांना आवडतात.


हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.


✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.