१०.आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान | Aapatti vyavsthapn swadhyay 7th general science

आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सातवी आपत्ती व्यवस्थापन प्रश्न उत्तरेइयत्ता सातवी सामान्य विज्ञान दहावा धडा स्वाध्यायAapatti vyavsthapn swadhy
Admin

 

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान आपत्ती व्यवस्थापन  स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सातवी आपत्ती व्यवस्थापन प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान दहावा धडा स्वाध्याय Aapatti vyavsthapn swadhyay prashn uttare


 

1. आमच्यातील वेगळे कोण आहे?

 

अ. दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात.

उत्तर: रेल्वे अपघात.

 

आ. अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, त्सुनामी.

उत्तर: अवर्षण

 

इ. शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड.

उत्तर: टोळधाड

 

ई. पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे.

उत्तर: ज्वालामुखी


इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा दहावा    स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १०  आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय इयत्ता सातवी  आपत्ती व्यवस्थापन प्रश्न उत्तरे  इयत्ता सातवी सामान्य विज्ञान दहावा धडा स्वाध्याय  Aapatti vyavsthapn swadhyay prashn uttare  ७std science question answer in Marathi medium pdf  ७ class science question answer in Marathi १०th  lesson  ७th std science question answer Maharashtra board in Marathi


 

2. सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय !

 

अ. दुष्काळ

उत्तर:

१.पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे.

2. स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे योग्य नियोजन करणे.

3. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, तसेच वृक्षतोड थांबवणे.

4. हवामानांतील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे.

 

 

आ. वीज पडणे

उत्तर:

१.     वीज चमकत असताना मैदानात, झाडाखाली उभे राहू नये. तसेच उंच ठिकाणी, झाडावर चढू नये अशा ठिकाणी वीज पडण्याचा जास्त धोका असतो.

२.      विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नये.

३.      गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका.

४.     प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका.

५.     पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.

६.     घरावर तडितरक्षक बसवावा.

 

इ. वादळे

उत्तर:

१.     वादळाने झाडे इमारतीवर पडून नुकसान होते , त्यामुळे अशी  झाडे नियमित छाटा व नुकसान टाळा.

२.     आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवा.

३.     तुम्ही स्वतः बाहेर असलात, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.

४.     गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीजपुरवठा खंडित करा.

५.     घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या.


 Aapatti vyavsthapn swadhyay prashn uttare std science question answer in Marathi medium pdf ७ class science question answer in Marathi १०th  lesson th std science question answer Maharashtra board in Marathi



ई. ढगफुटी

उत्तर:

१. ढगफुटी झाल्यास मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी आसरा घ्यावा.

२.डोंगरपायथ्याशी, नदीकिनारी तसेच समुद्रकिनारी जाणे टाळावे.

३.ढगफुटीच्या काळात आपण सुरक्षित घरात आसरा घ्यावा.

 

3. सत्य की असत्य ते सकारण सांगा.

 

अ. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते.

उत्तर: असत्य

 

आ. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये.

उत्तर: सत्य  

 

इ. ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे.

उत्तर: असत्य

 

ई. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो.

उत्तर: सत्य

 

 इयत्ता सातवी सामान्य विज्ञान धडा दहावा   स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान गाईड pdf इयत्ता सातवी सामान्य विज्ञान स्वाध्याय धडा १०


4. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

 

अ. त्सुनामी म्हणजे काय? ती कशी निर्माण होते?

उत्तर:

१.महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना ‘त्सुनामी लाटा’ म्हणतात.

२.जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात.

३.महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते, परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात.

४.या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते.

 

आ. ढगफुटी म्हणजे काय?

उत्तर:

१.काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीकडील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. परिणामी त्या ढगांत वाफेचा अधिक साठा होतो. २.शीघ्र संघनन क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलिमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो याला ढगफुटी म्हणतात.

 

इ. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा.

उत्तर:

१.शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात, त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते.

2. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते.

3. अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो.

4. उष्ण वायूमुळे तापमान वाढते.

5. उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात.

 

 

ई. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते  उपाय आहेत?

उत्तर:

१.     वीज चमकत असताना मैदानात, झाडाखाली उभे राहू नये. तसेच उंच ठिकाणी, झाडावर चढू नये अशा ठिकाणी वीज पडण्याचा जास्त धोका असतो.

२.      विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नये.

३.      गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका.

४.     प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका.

५.     पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.

६.     घरावर तडितरक्षक बसवावा.

 

5. महाराष्ट्रामध्येआपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत?

उत्तर:

१.नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून बचाव पथके आपत्तीच्या ठिकाणी तैनात केली जातात.

२.आपत्तीच्या काळात काम करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

३.आपत्ती व्यवस्थापन विभातर्फे आपत्तीबाबत च्या पूर्वसूचना जनतेला देण्यात येतात.

४.भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना १९७६ रोजी केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रात देखील पूरनियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

५.महापुराच्या परीस्थित किंवा वादळाच्या आपत्तीत सापडलेली तसेच दरडींच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाते.

 

6. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल? का?

उत्तर:

१.घरावर वीज पडू नये म्हणून घरावर तडीतरक्षक बसवू घेऊ .

२.आपत्तीच्या काळामध्ये खाण्यासाठी कोरडे, सुके अन्नपदार्थ जे लवकर खराब होत नाहीत असे पदार्थ साठवून ठेवू.

३.आपत्तीच्या काळात प्रथोमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेटी तयार ठेवू.

४.आपत्तीच्या काळात वीज खंडित होते अशा वेळी प्रकाशासाठी विजेरी किंवा कंदील तयार करून ठेवू.

५.पावसाच्या आधी घराचे छप्पर, दारे, खिडक्या व्यवस्थित आहेत ना याची खात्री करून घेऊ.

६. वादळा सारख्या आपत्तीमध्ये घरावर झाडाच्या फांद्या पडू नयेत म्हणून घरासाठी धोकादाय असणाऱ्या फांद्या कापून टाकू.

 **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.