३.धार्मिक समन्वय स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Dharmik samanvay swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra .

3.धार्मिक समन्वय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

 

धार्मिक समन्वय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - धार्मिक समन्वय या पाठाचा स्वाध्याय - पाठ तिसरा धार्मिक समन्वय स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी - इयत्ता सातवी इतिहास गाईड

प्रश्न १. परस्परसंबंध शोधून लिहा.


(१) महात्‍मा बसवश्वेर : कर्नाटक, संत मीराबाई : .....

उत्तर: महात्‍मा बसवश्वेर : कर्नाटक, संत मीराबाई :राज्यस्थान


(2) रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू: .....

उत्तर: रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू: पूर्व भारत


(3)   चक्रधर : .......... , शंकरदेव: ............

उत्तर: चक्रधर : महाराष्ट्र  , शंकरदेव: आसाम

 

धार्मिक समन्वय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी धार्मिक समन्वय या पाठाचा स्वाध्याय पाठ तिसरा धार्मिक समन्वय स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इयत्ता सातवी इतिहास गाईड धार्मिक समन्वय धडा तिसरा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी Dharmik samanvay swadhyay 7vi Dharmik samanvay swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

प्रश्न २.खालील तक्ता पूर्ण करा.

 

 

प्रसारक

ग्रंथ

(१) भक्ती चळवळ

कबीर

तुलसीदास

मन्मथ स्वामी

महाकवी सूरदास

मीराबाई

कबीर दोहावली

रामचरितमानस

परमरहस्य

सूरसागर

पदे-भक्तीरचना

(२) महानुभाव पंथ

चक्रधर स्वामी

चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ

 १)महदंबा – धवळे

२)म्हाइंभट– लीळाचरित्र

३)नरेंद्र– रुक्मिणीस्वयंवर

(३) शीख धर्म

गुरुनानक

गुरुग्रंथसाहिब

 

 

Dharmik samanvay swadhyay 7vi - Dharmik samanvay swadhyay prashn uttar - Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf - Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers


प्रश्न ३. लिहिते व्हा.


(१) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले.

उत्तर:

१)   संत कबीर यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्‍वर मानले.

२)   सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण दिली.

३)   त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतील कट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले.

४)   संत कबीर यांनी जाती, पंथ, धर्म यांवरून माणसा-माणसांत कधीही भेदभाव केला नाही.

म्हणून संत कबीर हे भक्ती चळवळीत विख्यात संत म्हणून उदयास आले.




(२) महात्‍मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम.

उत्तर:

१)   महात्‍मा बसवेश्वरांनी जातिभेदाला विरोध केला. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले.

२)   आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले.

३)   सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री- पुरुष सहभागी होऊ लागले.

४)   आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली.

५)   महात्‍मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला ‘परमरहस्य’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.


प्रश्न ४.    खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा.

 

गु

रु

गो

विं

सिं

रु

रा

मा

नं

सू

दा

ना

से

सं

ही

पं

सा

बी

रो

रं

पु

प्र

रु

न्म

स्वा

मी

रा

बा

 

उत्तर:

१)   गुरुगोविंदसिंग

२)   सूरदास

३)   मीराबाई

४)   गुरुनानक

५)   मन्मथ स्वामी

६)   रामानंद

७)   गोरा

८)   पंप

९)   रोहिदास

१०)    कबीरसेना

११) पुरंदरदास

  **********


हे देखील पहा: 

इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......

स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.