4. पाणी किती खोल स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Paani Kiti Khol Swadhyay Tisari Marathi

पाणी किती खोल इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Paani Kiti Khol swadhyay pdf Paani Kiti Khol swadhyay तिसरी मराठी प्रश्न उत्तर
Admin

पाणी किती खोल स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Paani Kiti Khol  swadhyay pdf

पाणी किती खोल  प्रश्न उत्तरे पाणी किती खोल इयत्ता तिसरी स्वाध्याय Teesri marathi swadhyay pdf Paani Kiti Khol swadhyay pdf


प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

 

(अ) म्हशीला काय चावता येत नव्हते ?

उत्तर: म्हशीला कडबा चावता येत नव्हता.

 

(आ) पाणी कमी आहे, असे कोणाचे म्हणणे होते ?

उत्तर: पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते.


(इ) झाडावरून कोण हाक मारत होते ?

उत्तर: खारूताई झाडावरून हाक मारत होती.


(ई) खारूताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली ?

उत्तर: नदीला खूप पाणी असल्यामुळे खारूताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली.

 

(उ) नदी पार केल्यावर रेडकाने काय केले ?

उत्तर: नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीच्या दिशेने गेले.

 

इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf | पाणी किती खोल  स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी

प्र. २. कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा.


(अ) "आता मी खरंच म्हातारी झालेय."

उत्तर: असे म्हैस रेडकाला म्हणाली.

कारण, तिला कडबा चावता येत नव्हता.

 

(आ) "गुडघ्याइतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील."

उत्तर: असे बैल रेडकाला म्हणाला.

कारण, बैलाच्या मते नदीत कमी पाणी होते.

 

(इ) "वाहून जाशील. मागे फिर."

उत्तर: असे खारूताई रेडकाला म्हणाली.

कारण ,खारूताईच्या मते नदीत खूप पाणी होते.

 

(ई) "मग तुला घाबरायचं काय कारण ?"

उत्तर: असे म्हैस रेडकाला म्हणाली.

कारण, म्हैस खारूताईपेक्षा मोठी व उंच होती.

 

(उ) "मला सहज जाता येईल."

उत्तर: असे रेडकू स्वतःशीच म्हणाले.

कारण, म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता.

 

Paani Kiti Khol swadhyay | Paani Kiti Khol Questions & Answers
3ri marathi Paani Kiti Khol | iyatta tisri marathi swadhyay


प्र. ३. जोड्या जुळवा.

उदा., कडबा – पेंढी


'' गट

'' गट (उत्तरे)

(१) लाकडाची

(आ) मोळी

(२) मेथीची

(इ) जुडी

(३) पुस्तकांचा

(अ) गठ्ठा

 

 

प्र. ४. या पाठातील संवाद वर्गात सादर करा. हे करताना त्या-त्या प्राण्याचा आवाज काढा,

 

प्र. ५. रेडकाची गोष्ट तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर:

रेडकूची गोष्ट

म्हैस म्हातारी झाली होती. तिला कडबा चावता येत नव्हता, म्हणून तिने आपल्या नातवाला, रेडकाला, नदीपलीकडच्या कडबाकुट्टीवरून कडबा कापून आणायला सांगितले. नदीकाठाशी आल्यावर रेडकूला पाण्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि तो घाबरला. तेव्हा जवळच चरत असलेल्या बैलकाकांनी त्याला सांगितले की नदीचं पाणी त्यांच्या गुडघ्याइतकंच आहे, त्यामुळे ते आरामात जाऊ शकतो.

रेडकू धैर्य एकवटून नदीजवळ आला. पाण्यात पाय टाकणार इतक्यात झाडावर बसलेली खारुताई म्हणाली, "कालच माझी मैत्रीण वाहून गेली, पाणी खूप आहे, मागे फिर." हे ऐकून रेडकू घाबरला आणि माघारी निघून गेला.

रेडकू परतल्यावर म्हैस त्याला म्हणाली, "सकाळीच गाढवदादा नदी पार करून आले. बैलकाका उंच आहेत आणि खारुताई बुटकी आहे. तू खारुताईपेक्षा उंच आहेस, त्यामुळे घाबरू नकोस." म्हशीच्या या शब्दांनी रेडकूच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला.

नवीन धैर्य घेऊन रेडकू नदीकाठाशी गेला, पाण्यात शिरला आणि सुरक्षितपणे नदी पार केली. तो गाणं म्हणत कडबाकुट्टीकडे निघाला आणि आनंदाने कडबा घेऊन परतला.

 

प्र. ६. खालील प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात, अशी कल्पना करून वर्गात संवाद सादर करा.

मांजर, कुत्रा, सिंह, साप.

उत्तर:

पात्रे: राज (एक मूल), मांजर, कुत्रा, सिंह, साप

राज : नमस्कार प्राण्यांनो! आज राज  तुमच्याशी गप्पा मारणार आहे. सुरुवात करुया मांजरीपासून.

राज : ए मांजरी, तू दिवसभर काय करतेस?

मांजर: मी  गोड झोपते, दूध पीते, आणि खेळते. उंदीर पकडणं हे माझं आवडतं काम आहे.

राज : वा! तू खरंच चपळ आहेस. आता बघुया कुत्रा काय म्हणतोय.

राज : कुत्र्या, तू घराचं कसं रक्षण करतोस?

कुत्रा: मी सतत सावध असतो. कुणी अनोळखी आला की भुंकतो. माझ्या घराला कोणी धक्का लावू शकत नाही!

राज : खरंच! तू तर घराचा खरा रक्षक आहेस. आता बघुया जंगलाचा राजा सिंह काय सांगतो.

राज : सिंहराजा, तू इतका धाडसी कसा?

सिंह: मी जंगलातला राजा आहे. माझं गर्जन ऐकून सगळे घाबरतात. पण मी  फक्त भक्षक नाही, मी  जंगलाचं संतुलनही राखतो.

राज : छान! तू खूप समजूतदार आहेस. शेवटी, सापाशी थोडं बोलुया.

राज : सापा, तुला सगळे का घाबरतात?

साप: मी  फक्त तेव्हाच चावतो जेव्हा कोणी मला त्रास देतो. मी शांतपणे राहतो. सगळे मला समजून घेत नाहीत, म्हणूनच घाबरतात.

राज : अरे वा! म्हणजे तू वाईट नाहीसच!

राज : धन्यवाद प्राण्यांनो! आज तुमच्याशी बोलून खूप मजा आली!

सर्व प्राणी: आम्हालाही! पुन्हा भेटूया!

 

 

प्र. ७. नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्याइतके, गाढवाच्या पोटापर्यंत, तर रेडकाच्या गुडघ्याच्या थोडे वर होते. समजा, नदीमधून खालील प्राणी चालले आहेत. त्यांच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी येईल किंवा ते बुडतील, ते विचार करून लिहा.

म्हैस     : पाणी गुडघ्याइतके

जिराफ : पाणी गुडघ्याच्या थोडे खाली.

हत्ती    : पाणी गुडघ्याइतके

उंट     : पाणी गुडघ्याच्या थोडे खाली.

कुत्रा    : पाणी गळयापर्यंत

मांजर  : पाण्यात बुडेल

उंदीर   : पाण्यात बुडेल

साप    : पाण्यात बुडेल

बेडूक : पाण्यात बुडेल

मासा  : पण्यात पोहता येते.


***************

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.