एकदा गंमत झाली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Ekada Ganmmat Zali swadhyay pdf
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) तुम्ही
टाळ्या केव्हा वाजवता ?
उत्तर:
आनंदाच्या क्षणी, मी टाळ्या वाजवतो.
(आ) नदीचे
पाणी आणखी केव्हा वाढते ?
उत्तर:
डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह नदीला येऊन मिळतात तेव्हा नदीचे पाणी आणखी वाढते.
प्र. २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) झाडं
मात्र................ पानांनी टाळ्या वाजवू लागतात.
उत्तर: झाडं
मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात.
(आ) एखाद्या
डोंगरात नदीचा...........होतो.
उत्तर: एखाद्या
डोंगरात नदीचा उगम होतो.
प्र. ३. कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
(पुढेपुढे, छोटेछोटे, तरंगत तरंगत, गारगार,
उंचउंच)
(अ)
..................वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली.
उत्तर: गारगार
वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली.
(आ) झाडाच्या ............शेंड्यांबर
हिरवीगार टोकदार पानं.
उत्तर: झाडाच्या
उंचउंच शेंड्यांबर हिरवीगार टोकदार पानं.
(इ) पिंपळाची दोन
पानं ............... .................खिडकीतून आत आली.
उत्तर: पिंपळाची
दोन पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली.
(ई) नदी ......................जाऊ
लागते.
उत्तर: नदी पुढेपुढे
जाऊ लागते.
(उ) बाजूच्या शिरा
म्हणजे..................ओहोळ.
उत्तर: बाजूच्या
शिरा म्हणजे छोटेछोटे ओहोळ.
प्र. ४. या
पाठात एकच शब्द दोन वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत,
उदा., उंचउंच. असे आणखी शब्द सांगा.
उत्तर:
1.
लहान लहान
2.
वाहत वाहत
3.
गप्प गप्प
Ekada Ganmat Zali Questions & Answers | 3ri marathi Ekada Ganmat Zali | iyatta tisri marathi swadhyay
प्र. ५. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) सरळ x वाकडे
(आ) लांब x जवळ
(इ) पुढे x मागे
(ई) लहान x मोठे
(उ) शांत x अशांत
(ऊ) हसली x रडली.
प्र. ६. पाठात
'टोकदार' शब्द आलेला आहे. त्यासारखे शब्द बनवा.
उत्तर:
(अ) रुबाब – रुबाबदार
(आ) समजूत – समजूतदार
(इ) धार – धारदार
(ई) पाणी –
पाणीदार
(उ) चमक –
चमकदार
तिसरी मराठी प्रश्न उत्तर | एकदा गंमत झाली स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | एकदा गंमत झाली प्रश्न उत्तरे
प्र. ७. शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा.
(अ) अलगत
उचलणे.
उत्तर: सावकाश
उचलणे
(आ) एकटक
पाहणे.
उत्तर: एकाच जागी
नजर लावून पाहणे.
(इ) मोरपीस
फिरवल्यासारखे वाटणे.
उत्तर: आनंददायी
स्पर्श व्हावा तसे .
(ई) सुखावणे
उत्तर: आनंद होणे.सुखावणे.
(उ) दंग असणे
उत्तर: गुंग असणे,
मग्न असणे.
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी विषय मरा| ठी स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
प्र. ८. मनुली
पानांकडे एकटक पाहू लागली, तसे तुम्हांला कोणकोणत्या गोष्टींकडे
एकटक पाहावेसे वाटते ?
उत्तर:
· संध्याकाळचा सूर्यास्त – आकाशातील रंग बदलताना पाहण्यात एक वेगळाच मोह असतो.
· समुद्राच्या लाटा – सतत येणाऱ्या-जात असलेल्या लाटांकडे पाहणे मनाला खूप प्रसन्न करतं.
· फुल उमलताना – कळी हळूहळू उमलून फुल बनताना पाहणे एक नाजूक अनुभव असतो.
· आकाशातील चंद्र-तारे – रात्रीच्या शांत आकाशाकडे पाहताना वेळेचाही विसर पडतो.
· पुस्तकातील सुंदर चित्र – कल्पनेच्या दुनियेत घेऊन जाणारे.
प्र. ९.
पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनुलीला सुचली. तशी
तुम्हांला नदीबद्दल माहिती सांगण्यासाठी कोणती कल्पना सुचते, ते सांगा.
उत्तर:
नदी
डोंगरात उगम पावते. ती वाटेत वाहताना अनेक लहान ओढ्यांना भेटते. हे ओढे जणू लहान
रस्त्यासारखे असतात. जसे लहान रस्ते येऊन मोठ्या रस्त्याला मिळतात, तसेच हे ओढे नदीला मिळतात. त्यामुळे नदीचा प्रवाह वाढतो आणि ती आणखी मोठी
होते. शेवटी जसा मोठा रस्ता एखाद्या मोठ्या शहरात जाऊन मिळतो, तशी नदी शेवटी समुद्राला मिळते.
*********