शेरास सव्वाशेर स्वाध्याय इयत्ता तिसरी मराठी | Sheras Savavasher swadhyay pdf
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) नानाकाका आनंदाने का
डोलत होते ?
उत्तर: नानाकाकांनी वाऱ्यावर डोलणारे पिकलेल्या भाताचे पिक पहिले त्यामुळे नानाकाका
आनंदाने डोलत होते.
(आ) सर्वच उंदीर
पिंपापाशी का धावत आले ?
उत्तर: तळलेल्या भाज्यांचा खमंग
वासामुळे सर्व उंदीर पिंपापाशी धावत आले.
(इ) झाडाच्या आडोशाला
कोण लपून बसले होते ?
उत्तर: झाडाच्या आडोशाला नानाकाका
लपून बसले होते.
इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी विषय मराठी स्वाध्याय | इयत्ता तिसरी मराठी स्वाध्याय pdf
प्र. २. तर काय झाले असते ?
(अ) नानाकाकांनी उंदीर
पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर .......
उत्तर: नानाकाकांनी उंदीर
पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर सर्व उंदीर पिंजऱ्यात अडकले असते.
(आ) नानाकाकांच्या शेतात
साप असते तर ......
उत्तर: नानाकाकांच्या शेतात साप
असते तर सापांनी सगळे उंदीर खाल्ले असते.
(इ) नानाकाकांच्या शेतात
उंदीर नसते तर
उत्तर: नानाकाकांच्या शेतात
उंदीर नसते तर नानाकाकांच्या शेताची नासाडी झाली नसती.
(ई) नानाकाकांच्या शेतात
मांजर असते तर
उत्तर: नानाकाकांच्या शेतात
मांजर असते तर मांजराने सगळे उंदीर खाल्ले असते.
प्र. ३. खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा व लिहा.
(अ) अधीर होणे.
उत्तर: बाबांनी आणलेले नवीन कपडे
पाहण्यासाठी माझा छोटा भाऊ अधीर झाला.
(आ) फस्त करणे.
उत्तर: मांजरीने टोपातले दुध फस्त
केले.
(इ) सामसूम होणे.
उत्तर: रात्र झाल्यावर सगळीकडे सामसूम
होते.
(ई) कूच करणे.
उत्तर: गणपती सुट्टीत गावाला जाण्यासाठी
राज ने भल्या पहाटे गावाकडे कूच केले.
(उ) कपाळावर हात मारणे.
उत्तर: इस्त्री करताना शर्ट जळालेला
पाहून बाबांनी कपाळावर हात मारला.
(ऊ) युक्ती सफल होणे.
उत्तर: शहरातील चोरांना पकडण्यासाठी
पोलिसांनी वापरलेली युक्ती सफल झाली.
Sheras Savavasher Questions & Answers | 3ri marathi Sheras Savavasher | iyatta tisri marathi swadhyay
प्र. ४. खालील शब्दांच्या सुरुवातीला
'अ' लावून नवीन शब्द तयार करा.
(अ) धीर
उत्तर: अधीर
(आ) शक्य
उत्तर: अशक्य
(इ) स्वस्थ
उत्तर: अस्वस्थ
(ई) प्रकाशित
उत्तर: अप्रकाशित
शेरास सव्वाशेर झाले प्रश्न उत्तरे | शेरास सव्वाशेर झाले इयत्ता तिसरी स्वाध्याय
Teesri marathi swadhyay pdf | Sheras Savavasher swadhyay pdf
प्र. ५. 'शेरास सव्वाशेर' यासारख्या शब्दसमूहांना म्हणी म्हणतात. तुम्ही ऐकलेल्या, वाचलेल्या अशा म्हणी सांगा.
उत्तर:
1) नाचता येईना अंगण वाकडे.
2) चोराच्या मनात चांदणे.
3) कानामागून आली नि तिखट झाली.
4) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
5) नाकापेक्षा मोती जड.
प्र. ६. खालील शब्दांत लपलेले
शब्द शोधा, लिहा.
(अ) नासाडी
उत्तर: नाडी, साडी.
(आ) कपाळावर
उत्तर: वर, कर, पाव, पाक, पार,
पावर.
प्र. ७. नानाकाकांनी उंदीर
मारण्याचा प्रयत्न केला, पण उंदरांनी भजी फस्त करून त्यांचीच
फजिती केली; म्हणजे उंदीर शेरास सव्वाशेर ठरले. तुम्ही
वाचलेल्या एखाद्या गोष्टीत कुणी शेरास सव्वाशेर ठरले आहे का ? अशी गोष्ट वर्गात सांगा.
उत्तर:
गोष्ट : "सिंह आणि
उंदीर"
एकदा
जंगलात एक सिंह झोपला होता. तेव्हा एक छोटासा उंदीर त्याच्या अंगावरून खेळत होता.
सिंह रागावून त्याला पकडतो आणि मारणारच असतो, तेव्हा उंदीर विनवणी
करतो – “मला सोडून द्या, कधी तरी मी तुमची मदत करीन.” सिंहाला
हसू येतं आणि तो त्याला सोडतो.
काही
दिवसांनी सिंह शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकतो. तो गर्जना करू लागतो. ते ऐकून तोच
छोटा उंदीर येतो आणि आपल्या धारदार दातांनी जाळं कुरतडून सिंहाला सोडवतो.
अशा
प्रकारे छोटा उंदीरच मोठ्या सिंहाला मदत करून शेरास सव्वाशेर ठरतो.
************